गोकुळाष्टमी म्हणजे भववान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ! ‘माखन चोर’ असा उल्लेख केला जाणार्या बाळकृष्णाच्या अनेक कहाण्यांमध्ये दही- तूप – लोण्याचा समावेश प्रामुख्याने आढळतो. अशा दुग्धजन्य पदार्थांमुळे फॅट वाढते हा काहींचा समज आहे. परंतू प्रत्यक्षात मात्र दही-तूप- लोणी खाणे आरोग्यदायी समजले जाते.
सेलिब्रिटी आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी देखील नियमित चमचाभर लोणी (व्हाईट बटर), तूप खाणे आरोग्यदायी असल्याचा सल्ला दिला आहे. त्यातील अॅन्टी एजिंग व्हिटामिन ए व एंझाईम्स चवीसोबतच तुमचे आरोग्यही सुधारण्यास मदत करतात. आयुर्वेदातदेखील तूपाचे मह्त्त्व दिले आहे. म्हणूनच जाणून घ्या लोण्याचे आरोग्यदायी फायदे -
- आरोग्यदायी ‘कॅलरीज’चा पुरवठा होतो :
बटरमध्ये उच्च प्रतीच्या कॅलरीज असतात. ऋजुताच्या मते, उच्च प्रतीच्या कॅलरीयुक्त आहाराची शरीराला गरज असते. 100 ग्रॅम बटरमधून 750 कॅलरीज मिळतात.
- वजन घटवण्यास मदत होते :
लोण्यामुळे वजन कमी होते. हो ! हे शक्य आहे. त्यातील लेसिथिन घटकामुळे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात फॅट साचून राहण्याची प्रक्रिया कमी होते. परिणामी तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे तुम्हांला अवेळी लागणार्या भूकेवर मात करणे शक्य होते व वजन घटवण्याची प्रकिया सुधारते.
- लहान सहान संसर्गापासून बचाव होतो :
लोण्यातील अॅन्टी-बॅक्टेरियल व अॅन्टी फंगल घटकामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. पोटातील गडबड, सर्दी-पडशाच्या त्रासापासून बचाव होतो. ऋजूताच्या मते, ‘ तुम्ही आजारी पडल्यावर तुमची आई मुगाची खिचडी आणि त्यावर तूपाची धार घालून मऊ भात देते. कारण त्यातील घटक बॅक्टेरियांचा नाश करण्यास मदत करतात.’
- तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते :
बटर हे सॅच्युरेटेड फॅटपासून तयार होते. यामध्ये कॅल्शियम, फ़ॉस्फरस, व्हिटामिन ए, व्हिटामिन डी याचा मुबलक साठा असतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
- तुम्हांला स्मार्ट आणि शार्प बनवते :
बटरमुळे मेंदूचे कार्य सुधारते. लोण्यामुळे पोषणद्रव्य शोषुन घेण्याची क्षमता वाढते. त्यामूळे आहारात लोण्याचा-तूपाचा समावेश करणे गरजेचे आहे.
- त्वचा तजेलदार बनवते :
लोण्यामध्ये मिनरल्स, अॅन्टीऑक्सिडंट्स तसेच व्हिटामिन ईचा मुबलक साठा असतो. यामुळे त्वचेचे आरोग्य आणि पोत सुधारण्यास मदत होते. यामुळे तुम्ही तजेलदार दिसण्यास मदत होते.
- कर्करोगाशी सामना करतात:
लोण्यातील फ़ॅटी अॅसिडमध्ये आरोग्यदायी घटक असल्याने कॅन्सरशी सामना करण्याची मुबलक क्षमता त्यामध्ये आढळते.
- बहूगुणी लोणी :
लोण्यामुळे अनेक आजारांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. आहारात लोण्याचा मुबलक समावेश केल्यास निद्रानाश, झोपेत बेड ओला करणे, सेक्सलाईफ सुधारण्यास मदत होते. तसेच गरोदर स्त्रियांनी लोण्याचा आहारात समावेश केल्यास बाळाचे आरोग्य सुधारण्यास तसेच प्रसुतीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- सांध्यांचे दुखणे कमी होते :
सांधेदुखीमध्ये हाडांचा ठिसूळपणा वाढतो त्यामुळे झीज होण्याचे प्रमाणही वाढते. म्हाणूनच तुमच्या आहारात तुपाचा समावेश करावा. यामुळे हाडांमधील / सांध्यांमधील वंगण वाढते.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - Butter benefits — 10 reasons why Lord Krishna’s favourite is healthy!
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.