Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गाऊट पेशन्टसाठी खास डाएट प्लॅन

$
0
0

गाऊट हा आजार शरीरात युरिक असिडचे प्रमाण वाढल्याने होतो. युरिक अ‍ॅसिड हा विषारी घटक मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. आपली किडनी मुत्राद्यारे विषारी घटक शरीरातून बाहेर टाकत असते. पण काही कारणास्तव त्याची क्षमता बिघडली की युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड चे प्रमाण वाढते आणि गाऊटचा त्रास उद्भवतो. युरिक अ‍ॅसिड हे  purine पासून बनलेले असल्यामुळे ते प्रमाण आटोक्यात आणायचे असेल तर तुमच्या आहारात purine जास्त प्रमाणात असलेल्या अन्नपदार्थांचा कमी समावेश करा.  तसेच तुमचा आहार कसा असावा याकरिता कलकत्त्याच्या आहारतज्ञ सुश्मिता दम यांनी सुचवलेला हा खास डाएट प्लॅन नक्की जाणून घ्या.

  • नाश्ता: नाश्त्यात फायबरने युक्त अशा पदार्थाचा समावेश करा. म्हशीच्या दुधाऐवजी गाईचे दूध घेणे उत्तम ठरेल. कारण त्यात कमी फॅट्स असतात. गव्हाची कणी किंवा १ चपाती आणि पातळ डाळ सकाळच्या नाश्त्यात तुम्ही घेऊ शकता.
  • मधल्या वेळेत: नाश्ता आणि जेवण यात जास्त वेळ असल्याने मधल्या वेळेतही सतत काहीतरी खात रहा.  या वेळेत तुम्ही low purine आणि व्हिटॅमिन सी युक्त फळे म्हणजेच संत्र. मोसंबी, द्राक्ष, किवी खा.
  • दुपारचे जेवण: गाऊट नियंत्रित करण्यासाठी आपले वजन कमी  करणे गरजेचे आहे. कारण अतिरिक्त वजन असणाऱ्यांना गाऊट  होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जेवणात भरपूर प्रमाणात सलाड घ्या. कार्बोहायड्रेट्स शरीरात कमी प्रमाणात जातील यावर लक्ष द्या. सलाडमध्ये कोबी, गाजर, काकडी, बीट यासारख्या लो purine भाज्यांचा समावेश करा. चपाती किंवा १ वाटी ब्राऊन राईस डाळीसोबत घ्या.
  • चहाची वेळ: ही चहाची वेळ आपण न चुकता पाळतो. पण आता चहा ऐवजी ग्रीन टी घ्या. त्यासोबत फायबरने युक्त अशी बिस्किटे तुम्ही खाऊ शकता.
  • संध्याकाळी: यावेळी लो purine भाज्यांचे सूप घ्या. भाज्यांचे सूप शक्यतो घरी बनवलेले असावे. सूप सोबत ४ बदाम आणि २ अक्रोड देखील खा. भाज्यांचे सूप आरोग्यासोबत सौंदर्यही प्रदान करते. जाणून घेण्यासाठी जरूर वाचा: नितळ त्वचा हवीय ? मग या ’10′ भाज्या व फळं अवश्य खा!
  • रात्रीचे जेवण: रात्रीचे जेवण जरा लवकरच झाले तर उत्तम. जेवणात भरपूर सलाड, चपाती किंवा १ वाटी ब्राउन राईस डाळीसोबत घ्या. लो फॅट पनीर ची भाजी किंवा वाटीभर चिकन (चिकन पीस मिडीयम साईझचे असावे.) तुम्ही घेऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी गाईचे कोमट दूध ग्लासभर प्या.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>