Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

रात्रीचा खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी ’10′खास टीप्स !

$
0
0

आपण ब-याचदा रात्री येणा-या खोकल्याच्या समस्येने हैरान होतो.या खोकल्यामुळे आपण नीट झोपू देखील शकत नाही.रात्री येणारा खोकला अनेक समस्यांना आमंत्रण करतो.अपुरी झोप, चिडचिड,अस्वस्थता,मूत्रमार्गातील समस्या आणि दैनंदिन कामामध्ये काही अडचणी आल्यास रात्री खोकल्याची समस्या निर्माण होते.

तुम्हाला देखील रात्री झोपताना खोकला येत असल्यास या टीप्स जरुर करा.

टीप १-झोपताना तुमचे डोके शरीरापेक्षा थोडेसे वरच्या भागी ठेवा-

खोकला हा घसा व श्वासनलिका यांच्यामध्ये असलेल्या अडथळ्यामुळे निर्माण होतो.यासाठी नेहमी झोपताना उशी घेऊनच झोपा.असे केल्याने तुमच्या घश्यामध्ये द्रवपदार्थ येणार नाहीत व तुमची खोकला येण्याची समस्या कमी होईल.

टीप २-पाठीवर झोपू नका-

काही संशोधनानूसार पाठीवर झोपल्याने झोपेतील अर्धांगवायू,स्ट्रोक,दमा आणि श्वसनक्रिया बंद होण्याची समस्या निर्माण होते.असे झोपल्यामुळे फुफ्फुसांवर ताण येतो ज्यामुळे श्वास घेण्याची क्रिया जलद होते व खोकला येतो.पोटावर झोपल्याने हा खोकला कमी होऊ शकतो मात्र जर वाढलेल्या वजनामुळे तुमचे पोट सुटलेले असेल तर तुम्ही असे झोपू शकत नाही.यासाठी कुशीवर झोपणे हाच तुमच्यासाठी एकमेव उत्तम मार्ग आहे. नक्की वाचा डाव्या कुशीवर झोपणे का ठरते फायद्याचे ?

टीप ३-झोपण्यापुर्वी व झोपताना फक्त नाकानेच श्वास घ्या-

जेव्हा सर्दीमुळे तुमचे नाक बंद होते तुम्ही स्वाभाविकच तोंडाने श्वास घेऊ लागता.ज्यामुळे हायपरवेंटीलेशन होते व खोकला येतो.झोपण्यापुर्वी नाक मोकळे करणे गरजेचे आहे.यासाठी ताठ बसा व तुमच्या हाताच्या बोटांनी नाक पकडा,तोंड बंद करा व श्वास रोखा.बसल्याजागीच थोडे मागेपुढे व्हा अथवा २० ते ३० पावले चाला.जेवढे शक्य आहे तितकाच वेळ श्वास रोखून धरा.श्वास सोडा व पुन्हा नेहमीप्रमाणे श्वास घ्या.अगदीच जमत नसल्यास तोडांच्या कडेकडील बाजूने थोडावेळ श्वास घ्या मात्र दीर्घ श्वास घेऊ नका.आरामात व शांत बसा.त्याचप्रमाणे नाकाने नेहमीप्रमाणे श्वास घेता येईपर्यंत हा व्यायाम पुन्हा पुन्हा करा. जाणून घ्या खोकल्याची ढास रात्री झोपेत का वाढते ?

टीप ४-जेवल्यानंतर कमीतकमी दोन तासांनी झोपी जा-

रात्री जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे पोटातील अॅसिड्स पुन्हा अन्ननलिका व घश्यातून मागे येतात ज्यामुळे खोकला येतो.जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय असलेल्या लोकांना या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते.त्याच प्रमाणे रात्री पचनास जड अन्न खाण्यामुळे देखील ही समस्या निर्माण होते.त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. नक्की वाचा जेवणानंतर या ’6′ गोष्टी तात्काळ करूच नका !

टीप ५-तुमचा बेडरुम स्वच्छ ठेवा-

तुमचा बेडरुम,बेड,उशी,पांघरुण नेहमी स्वच्छ ठेवा.कारण अस्वच्छतेमुळे त्यावर धुळ साठते.श्वास घेताना हीच धुळ तुमच्या नाकावाटे शरीरात जाते व तुम्हाला खोकला येतो.

टीप ६-बेडरुममध्ये ह्युमिडीफायर बसवा-

रात्री घसा कोरडा पडल्यामुळे तुम्हाला खोकला येऊ शकतो.ह्युमिडीफायरमुळे बेडरुममध्ये तुमच्या श्वसनासाठी पुरक अशी आद्रता नियंत्रित राहते.त्यामुळे घसा कोरडा होत नाही व तुम्हाला खोकला देखील येत नाही.

टीप ८ -जर तुम्हाला दूधाची अॅलर्जी असेल तर रात्री झोपताना दूध घेऊ नका-

काहीवेळा दूधाच्या पदार्थांमुळे कफ सारखे खोकला निर्माण करणारे पदार्थ निर्माण होतात.त्यामुळे रात्री असे पदार्थ खाणे अथवा दूध पिणे टाळा.पण जर तुम्हाला रात्री दूध घेतल्याने त्रास होत नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी दूध घेण्यास काहीच हरकत नाही.काही संशोधमनामध्ये दूधामुळे कफ होत नाही असे सिद्ध देखील झाले आहे.पण जर तुम्हाला या पदार्थांची अॅलर्जी असेल तर मात्र रात्री दूध न घेणेच योग्य. जाणून घ्या दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !

टीप ९-झोप येत असेल तेव्हाच झोपा-

आ़डवे झाल्यावर लगेच खोकला येत असेल तर फक्त झोप येत असतानाच झोपा उगाचच पडून राहील्याने तुम्हाला अधिक खोकला येऊ शकतो.

टीप १०-कोणत्याही वेळी झोपून रहाण टाळा-

दुपारी झोप घेतल्याने रात्री लवकर झोप येत नाही यासाठी सर्दी-खोकला झाल्यावर दुपारी झोपणे टाळा.

सर्दी,व्हायरल प्लू आणि व्हायरल इनफेक्शन मध्ये खोकला येतो हा खोकला रात्री जास्त प्रमाणात येतो.कधीकधी हे लक्षण एखाद्या गंभीर आजाराचे देखील लक्षण असू शकते.कधी ह्रदय समस्येमुळे देखील रात्री खोकला येतो.फुफ्फुसांमधील समस्येमुळे देखील खोकला येण्याचा त्रास होतो.त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. नक्की वाचा घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !

खोकल्याची समस्या गंभीर नाही म्हणुन या समस्येकडे दुर्लक्ष करु नका.कफासह खोकला असल्यास बेनाड्रील सीआर सारखी व कोरडा खोकला असल्यास बेनाड्रील डीआर सारखी औषधे घ्या.औषधामुळे तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल व शांत झोप देखील मिळेल.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>