Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जाणून घ्या: व्यायामानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम?

$
0
0

व्यायामानंतर अंघोळ करणे हे शरीराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण व्यायाम करताना आलेला घाम हे जरी चांगले लक्षण असले तरी तो वेळीच स्वच्छ होणे देखील महत्त्वाचे आहे. पण अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड याबद्दल मनात शंका असेल तर V’s Fitness च्या फिटनेस एक्स्पर्ट रोशनी शहा यांनी ही शंका दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर थंड पाण्याने अंघोळ करा. कठीण व्यायामानंतर म्हणजेच delayed onset muscle soreness (DOMS)मुळे  स्नायू दुखत असतील तर बर्फासारख्या थंड पाण्याने अंघोळ करा. विशेषतः जो स्नायू दुःखात असेल तो थंड पाण्याने शेकवा. थंड पाण्यात अंघोळ करताना शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी तुमचा मेटाबोलिक रेट त्याच्या सामान्य पातळीपेक्षा ५५०% ने वाढतो. म्हणजेच तुमच्या अधिक कॅलरीज बर्न होतात. बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणे शक्य होत नसेल तर (नॉर्मल) थंड पाण्याने केलेल्या अंघोळीमुळे शरीराची ऊर्जेची गरज वाढते आणि मसल्स टोन सुधारतो. The Journal Biomedical Research International च्या अहवालानुसार थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला अँटिऑक्सिडंट (antioxidant) glutathione चा भरपूर पुरवठा होतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती  (immune system) वाढीस लागते. अधिक जाणून घेण्यासाठी नक्की वाचा: कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?

व्यायामानंतर दुसऱ्या दिवशीही अंग आखडल्यासारखे वाटत असेल तर गरम पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे स्नायू मोकळे होऊन त्यांना आराम मिळतो. जर व्यायामानंतर लगेचच Sauna मध्ये रिलॅक्स होणार असाल तर त्याचे तापमान अधिक वाढवू (overheat) नका. जरूर वाचा: गरम की थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर !

 

Reference:
[1] Sutkowy, P., Woźniak, A., Boraczyński, T., Mila-Kierzenkowska, C., & Boraczyński, M. (2015). Postexercise Impact of Ice-Cold Water Bath on the Oxidant-Antioxidant Balance in Healthy Men. BioMed Research International, 2015, 706141. http://doi.org/10.1155/2015/706141

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>