कधीकधी खूप जेवणानंतर पोट जड होते किंवा पोटात गॅस साठल्यासारखे वाटते. वरचेवर ब्लोटिंगचा त्रास होणे, गॅस बाहेर पडणे लाजिरवाणे तर असतेच पण याचा तुमच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.रात्री भरपूर जेवणे,अपथ्यकारक अन्न खाणे, धुम्रपान करणे यामुळे पोटात वायू निर्माण होण्याची समस्या वाढते.
म्हणूनच जाणून घ्या ब्लोटींग व गॅसच्या समस्येची ही काही कारणं आणि त्यावरील उपाय
१.हाय-फायबर डायट-
ओटमील,ब्रेड,ब्रानफ्लेक्स,शि
कारणंं- मानवी आतड्यांंमध्ये फायबर पचले जात नाही व त्यामुळे या पदार्थांच्या पचनप्रक्रिये दरम्यान गॅसची निर्मिती होते.
उपाय- शरीरासाठी फायबर घटक खुप आवश्यक असल्याने तुम्ही हे पदार्थ खाणे गरजेचे असते.मात्र जर तुम्ही भरपूर फायबरयुक्त पदार्थ खाल्यामुळे तुमच्या पोटात दुखत असेल तर ते पदार्थ खाताना सावध रहा.तुम्ही आहारात भरपूर सलाड खात असाल तर फायबरयुक्त पदार्थ कमी केले तरी चालू शकतात.असे पदार्थ खाल्यावर पोट दुखत असेल तर सुरुवातीला ते कमी प्रमाणात खा व नंतर हळूहळू तुमच्या पोटाचा अंदाज घेत त्यांचे प्रमाण वाढवा.त्यामुळे तुमच्या पोटात गॅस अथवा गोळा येण्याची समस्या कमी होईल.
२.साखरेचे पदार्थ-
पेस्ट्री,कुकीज,फळांचे रस,स्वीटेंड सोडा,साखरेचे गोड पदार्थ यामुळे पोटात गोळा येण्याची समस्या निर्माण होते.
कारणे-साखरेच्या पदार्थांमुळे आतड्यामध्ये जंतू निर्माण होतात व गॅसमुळे ब्लोटींगचा त्रास होतो.
उपाय-फायबरयुक्त पदार्थांप्रमाणेच जर गोडाच्या पदार्थांमुळे पोटात गोळा येत असेल तर या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करा.
३.बद्धकोष्ठता-
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुमच्या पोटात वायू निर्माण होण्यात वाढ होते.त्याच प्रमाणे पोट कडक होते व पोटात वेदना होतात.
कारणे-पोटातील पचन व्यवस्थित न झाल्याने शौचाला वेळेवर होत नाही व बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.ज्यामुळे पोटात वायू निर्माण होतो.
उपाय-तुमच्या खाण्याच्या सवयी हळूहळू बदला,आहारामध्ये भाज्या,फळे,ड्रायफ्रुट्स अशा पाचक पदार्थांचा अधिक प्रमाणात समावेश करा.भरपूर पाणी प्या.घरगुती उपाय करा.
४.धुम्रपान-
ध्ुम्रपानाचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो.ध्रुम्रपानात धूर शरीरात जाणे व बाहेर टाकणे या क्रियेमुळे गॅसेस निर्माण होऊन पोटात गोळा येतो.
उपाय- धुम्रपान करणे आटोक्यात आणा अथवा बंद करा.त्यामुळे तुमच्या पोटात वायू होण्याची समस्या आपोआप कमी होईल.
५.अॅसीड रिफ्लेक्स-
जर तुम्हाला जेवणानंतर पोटाच्या वरच्या भागात गोळा आल्यासारखे वाटत असेल व लगेचच ढेकर येत असतील तर तुम्हाला अॅसीड रिफ्लक्स अथवा अपचनाचा त्रास असू शकतो.
कारणे- अन्नपदार्थ,पोटातील अॅसिड,पाचक रस अन्ननलिकेतून परत मागे येत असतील तर त्याला अॅसीड रिफ्लेक्स असे म्हणतात.अन्ननलिकेतून पुढे अन्न सरकण्यास अडथळा असणे,अती प्रमाणात अन्न खाणे,धुम्रपान,मद्यपान,लठ्ठपणा,
उपाय-सौम्य अपचनावर एखादे कार्बोहायड्रेड पेय अथवा अॅन्टासाइड घेतल्यास आराम मिळतो.पण जर समस्या गंभीर असेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
६.स्प्लीनीक-फ्लेक्चर सिंड्रोम-
स्प्लीहेसंबधीत गॅस समस्येला स्प्लीनीक-फ्लेक्चर सिंड्रोम असे म्हणतात.या स्थितीमध्ये पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे वेदना होतात.कधी कधी ही समस्या म्हणजे ह्रदयविकार असल्याचा गैरसमज होऊ शकतो.या समस्येमुळे पोटात गोळा येतो.
उपाय-या समस्येवर सोपा उपाय म्हणजे गॅसेस निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळणे.सोयाबीन,ब्रोकोली,कोबी,प्
७.इरीटेबल बोवल सिंड्रोम-
इरीटेबल बोवल सिंड्रोम किंवा आयबीएस या समस्येत पोटात गोळा येण्यासोबत वेदना व क्रॅम्प येतो.
कारणे-आतड्यांमध्ये इनफेक्शन अथवा ताण-तणावामुळे ही समस्या निर्माण होते.
उपाय-भरपूर अन्न खाणे टाळा,कॅफेन व कोला सारखे पदार्थ खाणे टाळा त्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळेल.वारंवार त्रास होत असल्यास एखाद्या चांगल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट कडून सल्ला घ्या.तज्ञ यासाठी तुम्हाला काही चाचण्या करण्यास सांगतील व त्यानूसार विकाराचे योग्य निदान करण्यात येईल.
८.पोटाचे विकार- पोटाचे विकार पाश्चात्य देशामध्ये व आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.गहू व त्याप्रकारच्या धान्याच्या अॅलर्जीमुळे हे विकार होतात.
कारणे-हा विकार भारतात देखील सामान्यपणे आढळतो.वैद्यकीय शास्त्रानूसार हा मल्टी-सिस्टीम डिसॉर्डर असून कोणत्याही वयात अाढळून येतो.
उपाय-संशोधकाच्या मते जुन्या पद्धतीने पिकवलेले गहू खाणे यासाठी योग्य असू शकते.
९.क्रोन्स डिसिस-
क्रोनिक इनफ्लैमेटरी बोवल डिसिस हा आतड्यांचा एक विकार आहे.पोटात दुखणे,डायरिया,वजन कमी होणे ही त्याची लक्षणे आहे.काही वेळा रुग्णांना गंभीर डायरिया,पोटात गोळा येणे,थकवा,ताप,मळमळ,उलटी व अशक्तपणा जाणवतो.
समस्या गंभीर झाल्यास-ही समस्या बळावल्यास कोलन कॅन्सर,रक्तामध्ये इनफेक्शन,ऑस्टिओपोरोसिस,गालस्टो
उपाय- या समस्येच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.योग्य वैद्यकीय उपचार घ्या.
१०.डायर्व्हटीक्युलोसिस-
डायर्व्हटीक्युलोसिस मध्ये आतड्याच्या आतल्या अस्तराला समस्या होते ही समस्या संपुर्ण आतड्याला होऊ शकते.मात्र या समस्येची कोणतीही विशेष लक्षणे दिसून येत नाहीत. डायर्व्हटीक्युलोसिस हा गंभीर विकार नाही पण जर त्यातून रक्त येऊ लागले तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
तुम्ही योग्य उपचार करीत असाल व उत्तम आहार घेत असाल पण तरीही पोटात गोळा येणे थांबत नसेल तर त्वरीत डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.कधीकधी पोटात गोळा येणे एखाद्या गंभीर आजाराचे देखील लक्षण असू शकते.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock