Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पोटभर खा पण जाड न होता!

$
0
0

खायला खूप आवडतंय आणि बारीकही राहायचंय! कसं शक्य आहे? तुम्हाला ही असच वाटत असेल ना! पण खास फूड लव्हर्ससाठी Nutritionist Akansha Jhalani आपल्याला सल्ला देत आहेत.  ज्यामुळे आपली खाण्याची आवड आपल्या शरीरावर दिसणार नाही.  मग जीभेचे चोचले पुरवूनही आरोग्यदायी राहण्याचा हा मंत्र नक्की जाणून घ्या.

प्लॅन करा: संतुलित आहाराचा प्लॅन करा आणि तो नियमित पाळा. पार्टी किंवा इतर कोणतेही कारण असू द्या तुम्ही फक्त हेल्थी पदार्थच खा. जर एखादा गोड पदार्थ खाण्याची किंवा नवीन ठिकाणी ट्राय करण्याची इच्छा झाल्यास जरूर खा. पण त्या सोबत तुम्ही बाकीच्या जेवणात  भाज्या, धान्य, फळे, सलाड यांचा समावेश करा. नक्की वाचा: अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांनीही , वजन ठेवा काबूत!

शरीराकडे नीट लक्ष द्या: शरीराला जे हवंय ते योग्य प्रमाणात मिळायला हवं. पण कुठे थांबायचं ते ही कळायला हवं. म्हणजेच जर तुम्हाला केक किंवा चॉकलेट खाण्याची इच्छा झाली तर ते जरूर खा. पण एक पीस खाल्यानंतर जर पोट भरलेलं वाटत असेल तर तिथेच थांबा. बॉडी काय संकेत देतेय तो लक्षात घ्या. जीवनात जेव्हा भावनिक उलथापालथ होते म्हणजेच ताण, कंटाळा, नैराश्य अशावेळी गरज नसताही खाल्ले जाते. ते टाळा. जेव्हा भूक लागेल तेव्हा जरूर खा. पण पौष्टीक आणि संतुलित पदार्थ ज्याची शरीराला गरज असते असे पदार्थ खावेत.

साधी पण महत्त्वाची बाब: आपण जेवण फक्त चवीसाठी न जेवता अन्नातील पोषकतत्वे शरीराला मिळावी म्हणून खात असतो. हे सगळ्यात आधी लक्षात घ्यायला हवे. ‘यथा अन्नम् तथा मनम्’ असे म्हटले जाते.  म्हणूनच ताजे अन्न खा आणि बघा किती फ्रेश आणि छान वाटते ते. त्यामळे अन्न ग्रहण करताना ही साधी गोष्ट नेहमी लक्षात  ठेवा.

तीव्र नियंत्रण: स्वतःवरचे नियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल बाजारात पदार्थ नव्या, आकर्षक स्वरूपात उपलबद्ध आहेत. त्याच्या मोहात न पडता आपल्या शरीराला किती गरज आहे हे लक्षात घेऊन अन्नाचे सेवन व्हायला हवे. वजनावर नियंत्रण आणण्यासाठी: परिणामकारक वजन कमी करायचयं ? मग खा – कुळीथ आणि कोकम !

सर्व पोषकतत्त्वांचा समावेश:  सर्व पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळतील असा आहार घ्या. म्हणजे एक दिवस सलाड खाल्लं तर दुसऱ्या दिवशी फळे खा. त्यामुळे तेच तेच पदार्थ खावून कंटाळा येणार नाही. बदल म्हणून जे पदार्थ तळून खाता ते उकडून खा. असे नवनवे प्रयोग करत रहा.

 

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles