Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

उलटी व मळमळच्या त्रास वाढण्यामागील १२ कारणंं

$
0
0

कधीकधी अॅसिडीटी,मोशन सिकनेस,इनफेक्शन अशा समस्यांमध्ये मळमळ अथवा उलटी होणे हे एक सामान्य लक्षण असू शकते.मात्र वारंवार अशी मळमळ होत असल्यास तुम्हाला दैनंदिन कामे करणे देखील कठीण जाते.सतत मळमळण्याचा त्रास होत असल्यास या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका.

१.ताण-तणाव,भिती आणि चिंता-

लक्षणे-

ताण-तणाव, भीती आणि चिंता याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.यामुळे पोटाच्या व आतड्याच्या समस्या निर्माण होतात.तसेच यामध्ये मळमळ किंवा उलटी,गोळा येणे,डायरिया,बद्धकोष्ठता अाणि आतड्यांच्या इतर समस्या निर्माण होतात.ताण व भीतीचा पचन प्रक्रियेवर देखील वाईट परिणाम होतो.

उपाय-

भीतीमुळे मळमळ होणे हे एक तात्पुरते लक्षण असून परिस्थितीत सुधारणा झाल्यावर हे लक्षण आपोआप कमी होते.यासाठी ताणतणावाध्ये शांत रहा.मात्र जर बराच काळ एखादी चिंता व तणाव तुम्हाला सतावत असेल तर तुमचा हा मळमळीचा त्रास गंभीर होऊ शकतो.यासाठी योग्य वेळीच तज्ञांची मदत घ्या.

२.अती खाणे अथवा खाण्याबाबत इतर समस्या-

अती खाण्यामुळे पचन प्रक्रियेवर विपरित परिणाम होतो व त्यामुळे मळमळ देखील होते.एखादी शस्त्रक्रिया झालेल्या अथवा पचन क्रिया कमजोर असलेल्या व्यक्तीमध्ये मळमळ होण्याची समस्या वारंवार आढळून येते.

उपाय-

सर्वात प्रथम अती खाणे टाळा.जर तुम्हाला अपचन झाले तर ओटीसी अॅन्टासाईड घ्या,पुदिनाची पाने चघळा किंवा पुदिन्याचा चहा घ्या,ओवा,वेलची,बडीसोप खा.याशिवाय लिंबू,लिंबूवर्गीय फळे,लवेंडर,पुदिनाच्या तेलांची अॅरोमा थेरपी देखील तुम्ही घेऊ शकता.

३.फूड पॉयझनिंग किंवा अन्नपदार्थांमध्ये विषबाधा होणे-

तुमच्या खाण्यामध्ये असलेल्या पदार्थांमध्ये जंतूसंपर्क झाल्यास तुम्हाला फूड पॉयझनिंग होते.यामध्ये ताप,पोटात दुखणे,डायरीया,अस्वस्थता,मळमळ व उलटी ही लक्षणे आढळतात.

उपाय- फूड पॉयझनिंगमुळे डीहायड्रेशन होते यासाठी भरपूर पाणी व द्रव्य पदार्थांचे सेवन करा.फॅट्स असलेले पदार्थ,दूधाचे पदार्थ खाणे व कॅफेन आणि मद्यपान करणे टाळा.त्वरीत तुमच्या डॉक्टरांना संर्पक करा.डॉक्टर तुम्हाला यावर अॅन्टीबायोटीक्स घेण्यास देतील त्यामुळे तुमचा त्रास कमी होईल.लवकर बरे वाटण्यासाठी पूरेसा आराम करा.

४.हॅंंगओव्हर-

जर तुम्ही अती प्रमाणात मद्यपान केले तर तुम्हाला हॅंगओव्हरमुळे डोकेदुखी होऊ शकते.कधीकधी अशा लेट नाईट पार्टीज मुळे मळमळण्याचा देखील त्रास होतो.

उपाय-

मद्यपान करणे टाळा अथवा प्रमाणात मद्यपान करा.जर त्यामुळे तुम्हाला मळमळ होत असेल तर साध्या पाण्यामध्ये एक चमचा सोडा मिसळा व प्या.तसेच १ ते २ लीटर पाणा प्या ज्यामुळे तुम्हाला उलटी होईल व बरे वाटेल.

५.फूड अॅलर्जी-

जर तुम्हाला एखाद्या अन्नपदार्थाची अॅलर्जी असेल तर त्या पदार्थाच्या सेवनामुळे तुम्हाला उलटी व मळमळ होऊ शकते.त्याचप्रमाणे कधीकधी खाण्याच्या सवयींमध्ये अथवा नेहमीच्या अन्नपदार्थांमध्ये बदल झाल्यास देखील उलटी अथवा मळमळ होण्याची समस्या निर्माण होते.

उपाय-

तुमच्या आहारात अॅलर्जी असलेले पदार्थ येणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.हे पदार्थ जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांची मदत घ्या.

६.प्रेगन्सी-

प्रेगन्सीमध्ये मळमळ व उलटी हे लक्षण सामान्यत: आढळते.गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस मुळे देखील मळमळ व उलटीचा त्रास होतो.काही महीलांमध्ये ही समस्या गरोदर पणाच्या नऊ आठवड्यांपर्यत असते.१२ ते १४ आठवड्यांनी हा त्रास आपोआप कमी होऊ लागतो.काही महीलांना दिवसभरात कधीही हा त्रास होऊ शकतो.गरोदरपणात महीलांना मळमळ का होते याचे कारण अद्याप अज्ञात आहे.मात्र अॅस्ट्रोजनमुळे हा मॉनिंग सिकनेस होत असावा.काही संशोधनामध्ये गरोदर महीलांमधील हॉर्मोन्समध्ये होणा-या बदलामुळे हा त्रास होत असावा असे सिद्ध झाले आहे.त्याचप्रमाणे विटामिन बी ६ च्या अभावामुळे देखील गरोदर महीलांना मळमळीचा त्रास होतो.

उपाय-

ज्या पदार्थांचा गंध व चव घेतल्याने तुम्हाला मळमळते ते पदार्थ खाणे टाळा.उलटीमुळे पोट रिकामे राहू नये यासाठी थोड्या थोड्या वेळाने काही प्रमाणात अन्न खा.दोन जेवणामध्ये पूरेसे पाणी प्या.

७.औषध-उपचार-

काही वेदनाशामक औषधांमुळे उलटी व मळमळीचा त्रास होतो.लोह व पोटॅशियम असेलेल्या ओटीसी औषधांमुळे किंवा नॉन-स्टिरॉईडल अॅन्टी इनफ्लैमटरी औषधांमुळे,अॅस्पिरीनमुळे देखील पोटात त्रास होणे व उलटी मळमळ अशा समस्या निर्माण होतात.

उपाय-

तुम्हाला होणारी ही मळमळ त्या औषधाच्या अॅलर्जीमुळे होत नाही.तसेच अशी औषधे बदल्यास अथवा घेणे थांबविल्यास मळमळ कमी होते.मात्र अशी औषधे घेण्याची वेळ आल्यास त्यापुर्वी काहीतरी खाणे आवश्यक आहे.औषधांसोबत १ ते २ चमचे अॅन्टासाईड घेतल्यामुळे पोटाला आराम मिळू शकतो.यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

८.मायग्रेन -

मायग्रेन मध्ये प्रचंंड डोकेदुखी होते. तीव्र प्रकाश,आवाज सहन करणे अशक्य होते व त्यासोबत मळमळ व उलटीची समस्या देखील निर्माण होते.मायग्रेन मध्ये डोक्यामध्ये काही कारणामुळे दाब निर्माण होऊन सेरीब्रो-स्पायनल प्लूइडमुळे ही मळमळ व उलटी होते.

उपाय-

बाहेरच्या ताज्या हवेमध्ये जा.खिडक्या उघडा व दीर्घ श्वास घ्या.सैल कपडे घाला.यामुळे तुम्हाला आराम मिळेल.मुबलक पाणी प्या फक्त एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नका.मळमळ होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अॅन्टी नॉशिया औषधे घ्या.

९.व्हायरल गॅस्ट्रोइनट्रेटीस-

स्टमक फ्लू, व्हायरल गॅस्ट्रोइनट्रेटीस हे आतड्यातील इनफेक्शन अाहेत.वॉटरी डायरिया,पोटात क्रॅम्प,मळमळ व उलटी काही वेळा ताप येणे ही यांची लक्षणे असतात.यामध्ये रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम झाल्याने ते प्राणघातक ठरु शकते.

उपाय-

यासाठी भरपूर पाणी प्या.उलटी व मळमळीमुळे पोटातील पाणी कमी होते यासाठी भरपूर प्रमाणात द्रवपदर्थांचे सेवन करा.साखरेचे व फॅट्स असलेले पदार्थ खाणे टाळा या पदार्थांच्या सेवनामुळे परिस्थिती अधिक खराब होऊ शकते.

११.गाल ब्लेडर आणि स्वादूपिंडामध्ये दाह-

गाल ब्लेडर आणि स्वादूपिंडामध्ये दाह झाल्यामुळे उलटी व मळमळ होण्याची समस्या निर्माण होते.स्वादूपिंडातील समस्येमुळे पोटाच्या वरच्या भागात वेदना होतात तर गालब्लेडरमधील समस्येमुळे उजव्या बाजूला वरच्या भागात काही दिवस वेदना होत राहतात.मधूमेहींना या समस्या होण्याचा अधिक धोका असतो.

उपाय-

यावर वैद्यकीय उपचार करणे हाच यावर एकमेव मार्ग आहे.

१२.कॅन्सर व केमोथेरपी-

कर्करोगावर घेण्यात येणा-या केमोथेरपीमुळे उलटी व मळमळ हे साईड ईफेक्टस होतात.हा त्रास तुम्हाला देण्यात येणा-या रेडीएशन व औषधांवर अवलंबून असतो.

यकृत आणि मेंदूच्या कर्करोगावरील पहिल्या टप्प्यातील हे एक प्रमुख लक्षण अाढळून येते.यकृताच्या कर्करोगामध्ये अचानक वजन कमी होते,भूक मंदावते,आतड्यांना सूज येते ही लक्षणे आढळतात.सकाळी उलटी व मळमळ होते.हातापायाच्या संवेदना कमी होतात,शरीराचा तोल सांभाळता येत नाही.मेंदूच्या कर्करोगामध्ये यासोबत मन एकाग्र करणे कठीण होते कधीकधी स्मृतीभ्रंश होतो.

उपाय-

डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार कटाक्षाने पाळा.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>