परदेशी फिरायला जाताना मनात उत्सुकता असते. पण थोडी हुरहूरही वाटते. विशेष म्हणजे इंग्रजी जास्त प्रमाणात बोलले जात नसलेल्या देशात फिरायला जाताना फार काळजी घ्यावी लागते. कारण आजारपणात वैद्यकीय मदत मागताना खूप धांदल उडते. मेडिकल स्टोर शोधण्यापासून सगळंच अगदी वेळ घेणारं आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टरांनी दिलेली, आपल्याला माहित असलेली आणि सूट होणारी औषध सोबत बाळगणं केव्हाही उत्तमच.
- डोकेदुखीसाठी: प्रवासामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी होऊ शकते. तसंही हा अचानक उद्भवणारा त्रास आहे. त्यामुळे डोकेदुखीवरची गोळी सोबत असलेली केव्हाही चांगलीच.
- तापासाठी: हवामानातील बदल, प्रवास आणि पाणी, अन्नातील बदलामुळे ताप येऊ शकतो. किंवा फिवरीश म्हणजेच तापसारखे वाटू शकते. बाहेरगावी डॉक्टर शोधत बसण्यापेक्षा सोबत औषध असेल तर उत्तमच होईल.
- अलर्जीसाठी: परदेशी प्रवास म्हणजे नानाविध अन्नपदार्थ नक्कीच खावे लागणार. आणि अचानक एखाद्या पदार्थामुळे अलर्जी झाली तर काय करणार? म्हणून पर्समध्ये anti-allergy टॅबलेट ठेवा.
- Antacids: फिरायला गेल्यावर जर bloating चा त्रास झाला तर आपण नीट एन्जॉय करू शकणार नाही. विशेषतः पित्ताचा त्रास असलेल्यांनी Antacids न विसरता बॅगमध्ये ठेवा. जाणून घ्या पित्तावर घरगुती उपाय: ‘पित्ता’वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी !
- loose motions and laxative: बदलेल्या अन्न पाण्यामुळे लूज मोशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे दोन्हींसाठी औषध सोबत ठेवा.बद्धकोष्ठतेच्या समस्येवर isabghol ने फायदा होतो.
- Anti-emetic: Anti-emetic अगदी जरूर सोबत ठेवा. जर कधी उलटी सारखं किंवा मोशन सिकनेस फील झालं तर त्याचा फायदाच होईल.
- कंडोम आणि गर्भ निरोधक गोळ्या: कंडोम्स कुठेही अगदी सहज मिळत असले तरी तुमच्या सोबत तुमचा स्टॉक असल्याच बरं होईल. कारण काही ठिकाणी तुमचा ब्रँड, साईझ उपलब्ध नसू शकतो. जर तुम्ही गर्भ निरोधक गोळ्या घेत असाल तर त्या ना विसरता सोबत ठेवा.नक्की वाचा: जाणून घ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय
- जर तुम्हाला खूप दिवसांपासून सर्दी असेल तर निलगिरीचे तेल जरूर सोबत ठेवा कारण परदेशात ते उपलब्ध होणार नाही. त्याचबरोबर पेन रिलीफ स्प्रे, ointments कॅरी करा. तुमची बाकी काही औषध असतील तर ती आवश्य घ्या. आय ड्रॉप, इअर ड्रॉप बॅगमध्ये असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स न विसरता घ्या.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock