Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गर्भारपणात झालेला मधुमेह कसा नियंत्रित ठेवाल?

$
0
0

Gestational diabetes ही आजकाल प्रेग्नसीमधील वाढती समस्या आहे आणि जर ती वेळीच नियंत्रित केली नाही तर त्यामुळे गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रेगन्सीमध्ये रक्तातील ग्लुकोजचे असंतुलित प्रमाण Gestational diabetes होण्यास कारणीभूत ठरते. साधारणतः हे प्रमाण प्रेग्नेंसीच्या २४व्या आठवड्यानंतर वाढते किंवा बाळ झाल्यांनतर ही हा आजार उदभवू शकतो. Gestational diabetes मुळे fetal macrosomia (large babies), birth trauma होऊ शकतं. तसंच त्यामुळे बाळाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. नवमातांमध्ये  type-2-diabetes चाही धोका वाढतो. 

स्त्रियांना gestational diabetes का होतो?

Paras Bliss Hospital, Panchkula चे Consultant Gynaecology डॉ. शिवा यांच्या सल्ल्यानुसार शरीरात वाढत असलेल्या गर्भाला ग्लुकोज आणि पोषकतत्त्व मिळण्यासाठी मातेच्या शरीरात काही प्रमाणात insulin resistance तयार होतं. आईला भूक लागलेली असताना insulin resistance चं थोडसं प्रमाणात देखील गर्भाला ग्लुकोजचा पुरवठा करण्यास मदत करतं. काही वेळेस हे insulin resistance चं प्रमाण अधिक होतं आणि ते gestational diabetes होण्यास कारणीभूत ठरतं. पण हा आजार अगदी सहज नियंत्रणात येऊ शकतो. आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहू शकतं. ते आटोक्यात कसं ठेवायचं त्यासाठी जाणून घेऊया काही एक्स्पर्ट टिप्स:

तूप, बटर खाणे टाळा: दोन जीवांची असल्याने जास्त खा. असा सल्ला प्रत्येक गरोदर बाईला नक्कीच मिळाला असेल. परंतु हा आपल्याकडील मोठा गैरसमज आहे. पण त्यामुळे वाढता गर्भ आणि माता या दोघांना पोषकघटक मिळावेत म्हणून जास्त खाल्ले जाते. तूप, बटर हे आरोग्यासाठी गरजेचे असेल तरी gestational diabetes झालेलं असताना अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स (saturated fats) घेणे टाळा. डॉ. शिवा यांच्या सल्ल्यानुसार तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स ( unsaturated fats) म्हणजेच ऑलिव्ह ऑइल, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

थोडं थोडं खा: सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्री पोटभर जेवण करण्याऐवजी खाण्याचे प्रमाण कमी करून वेळा वाढावा. म्हणजे जेवणाच्या ३ भागांचे ६ लहान लहान भागात विभाजन करा. त्यामुळे वाढणाऱ्या गर्भाला सातत्याने पोषकतत्त्वांचा पुरवठा होत राहील. आणि त्याचबरोबर शरीरातील ग्लुकोजच्या अस्थिरतेला  (सातत्याने प्रमाण खाली-वर होणे) आळा बसेल. नियमित डॉक्टरांचा सल्ला घेत रहा त्यामुळे gestational diabetes नियंत्रित राहण्यास मदत होईल.

गोडाचे प्रमाण कमी करा: गोड खूप आवडत असेल किंवा ते खाण्याची सवय असली तरी त्या मोहाला बळी पडू नका. कारण गोड खाल्ल्याने शरीरातले ग्लुकोजचे प्रमाण चटकन वाढेल आणि त्याचा बाळाच्या व तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. मधुमेहींनी साखरेऐवजी ‘मध’ खावे का ?

नियमित व्यायाम करा: आपल्याकडे प्रेग्नेंसीच्या बाबतीत अजून एक गैरसमज आहे तो म्हणजे प्रेग्नसीमध्ये जास्त हालचाल किंवा व्यायाम करायचा नाही.  काही ठरविक प्रमाणात नियमित केलेल्या व्यायामाने फायदाच होतो. रोज ४० मिनिटे चालल्याने ब्लड ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. नक्की वाचा: गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !

डॉक्टरांचा सल्ला पाळा: बऱ्याच स्त्रियांना gestational diabetes या आजाराबद्दल माहिती नसते. आणि बऱ्याचजणी त्याकडे फार गंभीरपणे पाहत नाहीत. परंतु त्याबद्दल माहिती असणे आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण ग्लुकोज अधिक प्रमाणात वाढले तर त्याचा परिणाम माता आणि बाळ दोघांवर देखील होईल. सुरुवातीपासूनच डॉक्टरांचा सल्ला पाळा आणि दिलेली औषध वेळीच घ्या. जरूर वाचा:  मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

 

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles