अंड हे आरोग्यदायी असते, त्यामधून शरीराला प्रोटीन्सचा पुरवठा होतो. त्यामुळे अनेकजण नाश्त्याला अंड किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाणं पसंत करतात. मात्र हृद्यरोगींनी अंड खावे की नाही ? या बाबत अनेकांच्या मनात समज- गैरसमज आहेत. अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉल अधिक असते. तसेच व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, फोलेट(folate), रिबोफ्लेविन ( riboflavin) घटकही आढळतात.यामुळे आरोग्य सुधारायला मदत होते. म्हणूनच दररोज एक अंड खा आणि आरोग्याच्या समस्या दूर ठेवा !
मुंबईतील आहारतज्ञ आणि स्पोर्ट्स न्युट्रीशनिस्ट दीपशिखा अग्रवाल यांच्या सल्ल्यानुसार, अंड्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि कोलेस्टेरॉल अधिक असतात. त्यामुळे ते हृद्याच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरतात असा समज होऊ शकतो. तसेच रोज अंड खाणं हेदेखील त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आठवड्यातून काही विशिष्ट दिवसच अंड खावे. हृद्यरोगींनी रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी पाहूनच अंड खावे की खाऊ नये याबाबतचा निर्णय घ्यावा. ज्या हृद्यरोगींमध्ये लिपिड प्रोफाईल नियंत्रणात असते त्यांनी आठवड्यातून एक दिवस अंड्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. मात्र ज्यांचे लिपिड प्रोफाईल अधिक आहे, त्यांनी महिन्यातून केवळ एकदा अंड्याचा समावेश करावा. नक्की वाचा : गावठी की पांढरी अंडी खाणे अधिक फायदेशीर ?
हृद्याचे विकार असणार्यांनी केवळ अंड्यातील पांढरा भाग खावा असा सल्ला दिला जातो. दिवसाला केवळ दोन अंड्यातील पांढरा भाग खाणं हितकारी आहे. मात्र दीपशिखाच्या सल्ल्यानुसार, हृद्यरोगी जर अंड्याचे सेवन करणार असतील तर त्यासोबत पुरेसा व्यायाम करणंदेखील गरजेचे आहे. त्यामुळे आहारात अंड्याचा समावेश करण्यासाठी इनोव्हेटीव्ह मार्गांचा वापर करा. अधिक आरोग्यदायी पद्धतीने अंड्याचा आहारात समावेश करण्यासाठी सॅन्डव्हिचमध्ये अंड्याचा वापर करा. यासोबतच सलाड, ऑम्लेट, उकडलेले अंड अशा प्रकारामधून अंड खावे. अंड तळून केलेले पदार्थ कटाक्षाने टाळा. यामुळे शरीरात फॅट्स वाढण्याचे प्रमाण अधिक असते. परिणामी हृद्याचे विकार वाढण्याचा धोका अधिक असतो. नक्की वाचा : हृदयविकाराचा झटका आणि अॅसिडीटीमधील नेमका फरका कसा ओळखाल ?
अंड्याव्यक्तिरिक्त तुम्हांला मांसाहाराचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. लीन चिकन आठवड्यातून एकदा खाल्ल्यास ते त्याचा फार त्रास होत नाही. मात्र हॉट डॉग्स, बीफ, कोल्ड कट्स किंवा कलेजी खाणं टाळा. हृद्यरोगींनी अगदीच अंड किंवा मांसाहार खाणं टाळणे गरजेचे नाही. प्रमाणात त्याचा आहारात समावेश करा. आरोग्यदायी पद्धतीने त्याचा आहारात समावेश केल्यास तसेच सोबत व्यायाम केल्यास अंड्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock