आवडता नाश्ता केल्यावरही अर्धा तासाने तुम्हाला पुन्हा भूक लागते म्हणून तुम्ही एखादे चिप्सचे पाकीट उघडता.हे चिप्स खाल्यावर पुन्हा थोड्यावेळाने भूक लागली की तुम्ही फ्रिजमधला केक खाता.दिवसभर असे सतत काहीतरी खाऊन देखील तुम्हाला परत परत भूक लागतच राहते.सहाजिकच अती खाण्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची भिती वाढू लागते.तुम्हाला असा अनूभव जर सतत येत असेल तर ही एक गंभीर बाब आहे.
लक्षात ठेवा जर तुम्ही जिममध्ये खुप वेळ वर्कआऊट करत असाल किंवा खुप जास्त धावण्याचा सराव करत असाल तर तुम्हाला सतत भूक लागू शकते.शिवाय गर्भवती महीलांना सतत भूक लागणे हे स्वाभाविक आहे.एखाद्या आजारपाणातून बरे होताना शरीर पुर्ववत होण्यासाठी तुम्हाला अशी वारंवार भूक लागू शकते.यापैकी कोणतेही कारण नसताना जर तुम्हाला सारखी सारखी भूक लागत असेल तर मात्र तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे कारण हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणे असू शकते.वैज्ञानिक भाषेत या समस्येला हायपरफेजिया अथवा पॉलीफेजिया या नावाने ओळखले जाते.
जाणून घेऊयात हायपरफेजिया समस्या का व कधी निर्माण होते-
१.कधाकधी अधिक चिंता व तणावामुळे तुम्हाला ही खुप भूक लागू शकते.जेव्हा आपण ताणात असतो त्यावेळी आपला मेंदूमध्ये कॉर्टिकोट्रॉपिन-रिलीज(
२.बायपोलर किंवा मॅनिक डिप्रेशन या मनोविकारांमध्ये मेंदूमधल्या केमिकल्समध्ये असतुंलन निर्माण होते त्यामुळे भूक जास्त लागते.तसेच कधीकधी हॉर्मोन्सची कमतरता व जेनेटीक घटकांमुळे देखील खादाडपणा वाढतो.बायपोलर विकारांमध्ये मुडस्वींग होणे,एलर्जी लेवल वाढणे व भावनावश होणे या समस्या देखील होतात.तर कधीकधी डिप्रेशन मध्ये एनर्जी लेवल कमी होऊन दु:खद भावना निर्माण होतात.
३.ब्लूयेमिया या खाण्याच्या विकारामुळे देखील भूक लागण्याचे प्रमाण वाढू शकते.यामुळे खाण्यावर नियंत्रण राहत नाही.या विकारात दोन तासांच्या आत सतत भूक लागत राहते.ज्यामुळे सतत भूक लागणे किंवा जास्त प्रमाणात अन्न खाण्याची समस्या निर्माण होते.अतीप्रमाणात खाल्यामुळे उल्टी होण्याची शक्यता असते. जाणून घ्या काळीमिरी – भूक वाढवण्याचा नैसर्गिक उपाय !
४.जंत झाले असल्यास भूक जास्त प्रमाणात लागू शकते.कारण टेपवर्म हे जंत दिर्घ काळ पोटात राहतात. तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक मुल्यांवर जगतात.यामुळे तुमच्या शरीराला फक्त साखर व फॅट्स मिळतात व सहाजिकच अपु-या पोषणामुळे तुम्हाला वारंवार भूक लागते.
५.हायपोग्लाइसीमिया या रक्तातील साखरेच्या कमतरता या समस्येमुळे देखील भूक लागण्याचे प्रमाण वाढू शकते.या विकाराची भूक लागणे,थकवा,डोकेदुखी,घामाने अंग थंड पडणे,गोंधळ उडणे,चक्कर येणे अशी लक्षणे असू शकतात.ही समस्या प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केल्यामुळे शरीरासाठी उपयुक्त कॉर्बोहायड्रेट न घेतल्यामुळे,भूक लागली तरी न खाल्यामुळे त्याचप्रमाणे मद्यपानामुळे होते.या स्थितीत तुमच्या शरीरातील साखर कमी होते व काहीतरी खाल्यानंतर ती पुन्हा पुर्ववत होते.पण जर तुम्हाला यकृताचा विकार असेल तर मात्र ही समस्या बळावते व तुम्हाला वारंवार भूक लागत राहते.याचे कारण तुमचे शरीर रक्ताची पातळी खालावू नये यासाठी यकृतात साखर निर्माण करते.मात्र यकृताच्या विकारामुळे ते करणे शरीराला कढीण जाते. नक्की वाचा वजन घटवताना अवेळी लागणार्या भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स
६.टाईप २ मधूमेह या विकारामुळे देखील तुम्हाला वारंवार भूक लागू शकते.रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूक लागते हे तुम्हाला माहीत असते मात्र मधूमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे देखील भूक लागू शकते.रक्तात साखरेचे प्रमाण वाढूनही तुम्हाला वारंवार भूक लागते कारण तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी रक्तातील साखर मिळवण्यासाठी इन्शूलीनवर अवलंबून असतात.जर तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये इन्शूलीन मिळाले नाही तर ते इन्शूलीन रक्तात मिसळते पण शरीरातील पेशींना त्याचा पूरवठा होत नाही.त्यामुळे पेशींकडून मेंदूला भूक लागल्याचा संदेश पोहचतो व तुम्हाला पुन्हा भूक लागते.
७.काही औषधांमुळे देखील भूक लागण्याची समस्या वाढू लागते.कॉर्टिकोस्टेरॉईड, साइप्रोहेप्टीडीन, ट्रायसिलीक अॅन्टी डिस्प्रेटंट मुळे देखील भूक लागण्याचे प्रमाण वाढते.
८.पीएमएस या मासिक पाळीच्या समस्येमध्ये देखील भूकेच्या प्रमाणात वाढ होते.मासिक पाळी च्याआधी पासून ते मासिक पाळीच्या १ ते २ दिवस ही समस्या निर्माण होते.यामध्ये या काळात पोट दुखणे,डोकेदुखी,डायरिया,बद्धको
९.हायपरथायरॉईडीझम व ग्रेव्ज विकारांमध्ये देखील भूक अधिक लागण्याची शक्यता असते.थायरॉईड मुळे शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढतो.त्यामुळे ओव्हर अॅक्टीव्ह थायरॉईडमध्ये हायपरअॅक्टीव्हीटी,निद्रानाश किंवा सतत भूक लागण्याची शक्यता असते.मात्र यात वजन वाढत नाही तर कॅलरीज जलद गतीने कमी झाल्याने वजन कमी होेते.
१०.प्रेडर विली सिन्ड्रोम या अानुवंशिक विकारामुळे देखील भूक वाढू शकते.या विकारामुळे भूक वाढण्यासोबत लठ्ठपणा येतो कमी उंची व मंदबुद्धीची लक्षणे आढळतात.या विकारामध्ये लठ्ठपणा येतो हे जरी सिद्ध झाले असले तरी त्यामुळे भूक का लागते हे अजून सिद्ध झालेले नाही.संशोधकांचे असे मत आहे की हे घ्रेलीन या भूक लाणा-या हॉर्मोन्सच्या पातळी मध्ये झालेल्या वाढीमुळे असे होत असावे.
११.क्रोमोसोमनल अॅबनॉर्मलीटी या आणखी एका अानुवंशिक विकारामध्ये भूक लागण्याचे प्रमाण वाढते.शरीरातील उर्जा निर्माण होणे व खर्च होणे यात असतुंलन निर्माण झाल्याने भूक वाढून जाडपणा वाढू लागतो.मेंदूमधील हायपोथॅलमस या घटकामुळे या गोष्टीचे नियंत्रण केले जाते.या घटकातील लहान केंद्रकांमुळे शरीरातील तापमान ,भूक,मूड आणि इतर कार्य सुरळीत चालतात.यातील एक केंद्र भूकेवर नियंत्रण ठेवते मात्र यामध्ये बिघाड झाल्याने तुम्हाला अतिरिक्त भूक लागते व तुम्ही अती खाऊ लागता.
१२.गर्भाशयातील प्रतिकूल वातावरणामुळे देखील भूक अधिक लागण्याची शक्यता असते.युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंड च्या संशोधकांनी याचा शोध लावला आहे.त्यांच्या संशोधनानूसार भ्रूणामुळे अधिक भूक लागण्याची शक्यता आहे.गर्भावस्थेमध्ये होणा-या कुपोषण व मेटाबलिक,हॉर्मोनल बदल हे याच कारणामुळे होत असतात.यामुळे बाळ जन्माला आल्यावरही त्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
कुटूंबव मित्रपरिवाराच्या भावनिक आधारातून या समस्येतून मार्ग काढणे सहज शक्य आहे.कधी कधी याबाबतीत समूपदेशनाचाही चांगला फायदा दिसून येतो.यासाठी जर तुम्हाला वारंवार अती भूक लागत असल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.याबाबतीत दुर्लक्ष केल्यास भविष्यात तुम्हाला गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock