Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या निर्सर्गोपचारांनी कमी करा सर्दी-खोकल्याचा त्रास !

$
0
0

सर्दी व खोकला हा कोणताही विकार नाही.तर ते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती  रोगाला प्रतिकार करीत असल्याचे एक लक्षण आहे.निर्सर्गोपचारामुळे शरीरातील या संरक्षण प्रक्रियेला अधिक मजबूत करण्यासाठी चालना मिळते.ऋतूमानातील बदलामुळे होणा-या सर्दी-खोकल्यावर निर्सर्गोपचार करणे हा एक उत्तम उपाय असू शकतो.

सर्दी-खोकला झाल्यास करावेत असे काही निर्सर्गोपचार-

१.हायड्रो थेरपी-

हायड्रो थेरपी मध्ये रोग बरा करण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात येतो.हायड्रो थेरपीला कोल्ड सॉक्स ट्रिटमेंट असेही म्हणतात.यामुळे सर्दीमुळे बंद झालेल्या नाकपुड्या मोकळ्या होण्यास मदत होते.

या थेरपीसाठी तुम्हाला दोन कापडी मोजे व दोन लोकरीचे मोजे गरजेचे असतात.

हायड्रो थेरपी करण्याची पद्धत-

  • कापडी मोज्यांचा पावलाकडचा भाग थंड पाण्यात भिजवा व पिळून घ्या.
  • तुमचे पाय गरम पाण्याच्या टबमध्ये बूडवा व पाय गरम होईपर्यत त्यात ठेवा.
  • गरम पाण्यातून पाय बाहेर काढा व लगेच कोरडे करा आणि लगेच त्यावर थंड पाण्याने भिजवलेले मोजे घाला.
  • थंड पाण्याने भिजवलेल्या मोज्यांवर लोकरीचे मोजे घाला.
  • त्यानंतर लगेच झोपी जा.पाय पांघरुणात व्यवस्थित लपेटून घ्या.पाय उघडे राहणार नाहीत याची नीट काळजी घ्या.

या थेरपी मुळे तीस मिनीटात तुम्हाला बंद नाकापासून आराम मिळू शकतो.

या थेरपीच्या तत्वानूसार थंड पाणी वरवरच्या संकुचित रक्तवाहिन्यांना उत्तेजित करते.आणि  गरम पाणी रक्तवाहिन्यांना प्रवाहित करते त्यामुळे आराम मिळतो.या थेरपीमुळे रक्तप्रवाह सुधारतो,शरीराचा दाह कमी होतो व रक्तसंचय सुधारतो. नक्की वाचा सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करेल आलं-मीठाचा तुकडा !

२.नेसल इरीगेशन-

यामध्ये नाकपूड्यांच्या पोकळीतील अडथळा साफ केला जातो.योग सरावामध्ये वापरण्यात येणारे हे एक जुने तंत्र आहे.या तंत्रामुळे दोन फायदे होतात.एक म्हणजे नाकपूड्या मोकळया होतात व दुसरे म्हणजे सर्दीमध्ये जिवाणूंमुळे होणारी अॅलर्जी व दाह कमी होतो.सर्दीवर करण्यात येणारी ही एक योग्य पद्धत असल्याचे संशोधनात देखील सिद्ध झाले आहे.या पद्धतीमध्ये नाकपूड्या स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय चाचणीमध्ये प्रमाणित योग्य असे नेती भांडे वापरा.

  • आठ औन्स कोमट निर्जंतुक पाण्यामध्ये एक चर्तुर्थांश ते अर्धा चमचा नॉन  आयोडाईजड मीठ मिसळा.
  • नेती पॉट वापरण्यापुर्वी ते स्वच्छ करा.तुमचे नेटी पॉट इतरांना वापरण्यास देऊ नका.
  • नाकपूड्यांमधून पाणी व्यवस्थित प्रवाहीत होण्यासाठी तुमच्या डोक्याची स्थिती योग्य ठेवा.
  • वरच्या भागाकडील नाकपूडीच्या आतल्या भागात भांड्याची नळी हळूवार पणे घाला.तोंड उघडे ठेऊन तोंडावाटे श्वास घ्या व सोडा.
  • वरच्या दिशेतील नाकपूडीने भांड्यातील पाणी नागपूडीमध्ये घ्या व खालच्या भागातील नागपूडीने बाहेर टाका.
  • क्रिया पुर्ण झाल्यावर बोसिनमध्ये डोकेखाली करुन नाकपूड्यांमधील घाण व पाणी बाहेर काढा.दुस-या बाजूच्या नाकपूडीने  हिच क्रिया परत  करा.
  • नेती भांडे गरम पाणी व सौम्य साबणाने स्वच्छ करुन कोरडे करुन ठेवा.

३.योग्य पोषक आहार घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवा-

तुम्ही खात असलेल्या अन्नामुळे सर्दी-खोकल्याचे जिवाणू मरत नाहीत मात्र अन्नामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.त्यामुळे तुमचे शरीर रोगाला प्रतिकार करण्यासाठी मजबूत होते. जाणून घ्या हिवाळ्यात आरोग्य जपताना टाळा या १० चुका

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे आहारात या पदार्थाचा समावेळ करा-

  • विटामिन सी अधिक प्रमाणात असलेले अन्न पदार्थ-

पेरु,संत्री,लिंबू या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी असते.ब्रोकली व बेल पेपर यासारख्या भाज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळते.विटामिन सी मुळे फक्त रोगप्रतिकार शक्तीच वाढते असे नाही तर यामुळे कार्डिओ व्हॅस्क्युलर विकार व डोळ्यांचे विकार देखील कमी होतात.जर तुम्हाला सर्दी-खोकला असेल तर प्रौढांनी दिवस भरात ७५ ते ९० मिग्रॅ चा विटामिन सी डोस घेणे आवश्यक आहे.सामन्यत: डॉक्टर तुम्हाला ५०० मिग्रॅ चा डोस रोज घेण्याचा सल्ला देतात.

  • विटामिन ए आणि लोह असलेले पदार्थ खा-

विटामिन ए मुळे रोगप्रतिकार शक्तीला चालना देणा-या पांढ-या रक्त पेशींची निर्मिती होते.पांढ-या रक्त पेशी विषाणू आणि इतर रोगजनकांशी संघर्ष करुन शरीर निरोगी ठेवतात.एका चीनी संशोधनानूसार प्री-स्कुलमधल्या मुलांना विटामिन ए आणि  लोहयुक्त सप्लीमेंट दिल्यामुळे सर्दी,खोकला,ताप यापासून मुलांचे संरक्षण झाल्याचे आढळून आले आहे.बटाटा,गाजर,पालेभाज्या,बेलपेपर,मासे,लिव्हर,भोपळा,पीच,पपई,आंबा यामध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात आढळते.लोहासाठी सुकलेले जर्दाळू,कलिंगड,ब्रोकोली,पार्सली,व्हीटग्रासचा रस,शिजवलेले पालक,बीट,स्पिरुलीना,लाल पानांचे ल्यॅट्यूस,कडधान्ये,चिकन,अंड्यातील पिवळा भाग,कोळंबी या पदार्थाचा आहारात समावेश करा.

  • लसूण-

लसूण मध्ये मॅगनीज,कॅल्शियम,फॉस्फरस,सेलेनियम आणि विटामिन बी ६ व विटामिन सी असते.लसूण अॅन्टी बॅक्टेरीयल,अॅन्टी फंगल,अॅन्टी व्हायरल आणि अॅन्टी पॅरासिटीक गुणधर्म असल्याने लसूण खाल्याने जळजळ कमी होते व रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते.२ ते ३ लसूण पाकळ्यांचा रोजच्या स्वयंपाकात जरुर वापर करा.असे असले तरी संशोधकांना सर्दी टाळण्यासाठी लसुण खावे याबाबत कोणाताही अधिक पुरावा सापडलेला नाही.

प्रोबायोटीक्स-

प्रोबायोटीक्स मोठ्या प्रमाणावर खाणे शरीरासाठी हितकारक असते.पचनाचे विकार,श्वसनाचे विकार आणि व्हायरल विकारांवर ते गुणकारी असतात.त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.काही संशोधनात या पदार्थांमुळे सर्दी-खोकल्यापासून बचाव करता येतो असे आढळले आहे त्यामुळे निरोगी शरीरासाठी आहारात त्यांचा समावेश करा.

४.सर्दी-खोकल्यावर घेण्यात येणा-या औषधी वनस्पती-

Echinacea- काही संशोधनात या औषधी वनस्पतीच्या वरच्या भागाचा पौढांच्या सर्दी सुरवातीच्या  काळात चागंला फायदा होतो मात्र हा फायदा प्रत्येकवेळी आणि प्रत्येकावर होईलच असे नाही.या वनस्पतीच्या इतर भागांचाही सर्दी टाळण्यासाठी उपयोग होतो. जाणून घ्या घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम !

Elderberry-या औषधी वनस्पतीचा तापाची पुर्व लक्षणे,सर्दी,सायनस मध्ये आराम मिळतो.सर्दीवर पाच दिवस दिवसभरात चारवेळा १५ मिली इल्डरबेरीच्या सिरप घेतल्यास चांगला फायदा होतो.ही औषधी वनस्पती ताप,डोकेदुखी,स्नायू दुखी,घसा खवखवणे,खोकला यावर प्रभावी आहे.

सर्दीखोकल्यावर करण्यासारखे घरगुती उपाय-

  • तुळशीच्या पानांचा रस एक चमचा मध आणि एक चमचा आल्याच्या रसासोबत घ्या.यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.
  • एक ग्लास पाण्यात काळीमिरी व जिरे मिसळा.हे पाणी थोडयावेळ गरम करा नंतर त्यात थोडासा गुळ टाका व घ्या.या पाण्यामुळे छातीतील कफ मोकळा होण्यास मदत होईल.
  • हळदीचे दूध घेतल्याने विशेषत: लहान मुलांना घसा दुखणे व नाक गळण्यापासून चांगला आराम मिळतो.यासाठी एक ग्लास दूधामध्ये एक चिमूट हळद मिसळा.
  • सर्दी झाल्यास मुबलक पाणी प्या व हर्बल चहा घ्या.हलका आहार घ्या आणि पुरेसा आराम करा.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>