यशस्वी गर्भधारणेसाठी तुम्ही तुमच्या ओव्हूलेशनच्या काळात सेक्ससंबध ठेवणे खुप गरजेचे अाहे कारण दिवसांमध्ये गर्भधारणा होण्याची अधिक शक्यता असते.ओव्हूलेशनचा दिवस शोधण्यासाठी तुमच्या मासिकपाळी चक्रातील ओव्हूलेशन पिरेडवर व्यवस्थित लक्ष ठेवा.सर्वसामान्यपणे स्त्रीबीज ओव्हूलेशन नंतर १२ ते २४ तास जीवंत राहते तर शूक्राणू योनीमार्गात प्रवेश केल्यानंतर पाच दिवस जीवंत राहू शकतात.त्यामुळे ओव्हूलेशनच्या पाच दिवस आधी व ओव्हूलेशन नंतर दोन दिवस गर्भधारणा राहण्याची शक्यता अधिक असते.
तुमचा फर्टायल डे ओळखण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स-
१.मासिक पाळीच्या योग्य नोंदी करा-
जर तुम्ही प्रेगन्सीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या मासिक पाळीची नोंद करुन ठेवणे आवश्यक आहे.यासाठी तुमचा मासिक पाळीचा पहीला दिवस नोंद करुन ठेवा.त्यानंतर पुढील मासिक पाळी येईपर्यंतचे दिवस मोजा.असे प्रत्येक महीन्यामध्ये करा.यामुळे तुम्हाला तुमची मासिक पाळी किती दिवसानंतर येते ये लक्षात येईल.चांगल्या परिणामासांठी तीन ते चार महीने तुमच्या मासिक पाळीच्या नोंदी करत रहा.यामुळे तुमची मासिक पाळी नियमित आहे की अनियमित हे तुमच्या लक्षात येईल. जाणून घ्या मासिकपाळी पुढे ढकलणार्या गोळ्या घेण्यापूर्वी जाणून घ्या त्याबाबत या ’10′ गोष्टी
२.तुमच्या फर्टायल डे चा अंदाज घ्या-
सर्वसामान्यपणे नियमित मासिक पाळी असलेल्या महीलांना दर महीन्याच्या २६ ते ३२ दिवसांनी पाळी येते.नियमित पाळी असणा-या महीलांमध्ये दर महीन्याच्या ठरलेल्या दिवशी मासिकपाळी येते.अनियमित मासिक पाळी किंवा मासिकपाळीचे चक्र छोटे अथवा मोठे असणा-या महीलांना असा अनुभव येत नाही.यासाठी मासिक पाळीतील प्रत्येक चक्राच्या काळजीपुर्वक नोंदी करा.
यासाठी काही टिप्स-
- तुमच्या छोट्या मासिक पाळीच्या चक्रातून अठरा ही संख्या वजा करा उदा.जर तुम्हाला २६ दिवसांनी मासिक पाळी येत असेल अठरा वजा केल्यावर आठ हा आकडा येईल.
- मोठ्या मासिक पाळीच्या चक्रातून ११ ही संख्या वजा करा.उदा.जर तुम्हाला ३२ दिवसांनी पाळी येत असेल तर ११ वजा केल्यावर २१ हा आकडा येईल.
- मासिक पाळीच्या पहील्या दिवसापासून कॅलेंडरवर नोंद करण्यास सुरुवात करा व तुम्ही मोजलेल्या दिवसावर एक वर्तुळ करुन ठेवा उदा.२२ आणि ७ हे अंक आल्यास मासिक पाळीच्या सातव्या िदवसापासून ते २२ व्या दिवसापर्यंत तुम्ही गर्भाधारणे साठी प्रयत्न करु शकता.
शरीरातील तापमानाची नोंद ठेवा-
हॉर्मोन्समध्ये होणा-या चढ-उतारांमुळे मासिकपाळी दरम्यान तुमच्या शरीरातील तापमानामध्ये देखील बदल होतात.या दरम्यान प्रोजेस्टेरॉनच्या पातळीमुळे गर्भाशयात स्त्रीबीज फलित होत असल्यामुळे शरीरातील तापमानात देखील वाढ होते.थोडक्यात ओव्हूलेशन च्या काळात तुमच्या शरीरातील तापमान वाढते.दर महीन्याला तुमचा ओव्हूलेशनचा नेमका दिवस ओळखण्यासाठी या दिवसांमध्ये शरीरातील तापमानाच्या नोंदी करा.त्यामुळे तुम्हाला ओव्हूलेशनच्या दिवसाची योग्य निवड करता येईल.यासाठी या दिवसांमध्ये दररोज सकाळी व रात्री झोपण्यापुर्वी तुमच्या शरीरातील तापमान मोजा. नक्की वाचा यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!
तुमच्या शरीरात होणारे बदल लक्षात ठेवा-
ओव्हूलेशन ही एक शांतपणे होणारी प्रक्रिया आहे.त्यामुळे तुम्हाला या संदर्भात शरीरात अनेक बदल आढळतील.या प्रक्रियेत हॉर्मोन्स मध्ये बदल घडतात.स्त्रीबीज फर्टिलाईज होण्यासाठी योग्य जागा शोधत असते.यामुळे गर्भाशयात अनेक बदल घडत असतात.या दरम्यान गर्भाशयातून एक चिकटस्त्राव योनीमार्गे बाहेर टाकला जातो.शुक्राणूंंना योनीमार्गातून बीजांडापर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी करण्यात येणारी ही एक नैसर्गिक व्यवस्था असते. जाणून घ्या IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ?
ओव्हूलेशन कीटचा वापर करा-
अधिक चांगल्या फायद्यासाठी सुलभ अश्या ओव्हूलेशन कीटची मदत घ्या.प्रेग्नसी टेस्ट प्रमाणे ही देखील एक सोपी टेस्ट असते.या कीटमधील स्ट्रीपचा रंग बदल्यास तुमचे ओव्हूलेशन होत आहे का नाही हे तुम्हाला सहज समजू शकते.
इतर लक्षणांकडे लक्ष द्या-
ओव्हूलेशन होताना तुमच्या शरीरात देखील अनेक बदल होतात.मासिकपाळी चक्राच्या मधल्या िदवसांमध्ये ओव्हूलेशन होत असल्यामुळे तुमच्या ओटीपोटात एका बाजूला दुखू लागते,स्पॉटींग होते,स्तन मऊ होतात.
या अनेक गोष्टींची योग्य नोंद करुन तुम्ही तुमचा ओव्हूलेशन दिवस ओळखू शकता.यामुळे गर्भधारणा राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.
References:
- http://www.wikihow.com/
Determine-Your-Most-Fertile- Day-to-Conceive - http://www.whattoexpect.com/
preconception/fertility/five- ways-to-tell-you-are- ovulating.aspx
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock