छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
तुम्ही बाळाचा विचार करताय ? आणि त्यासाठी प्रयत्न करताय ? मग त्यासाठी आयव्हीएफ सारख्या अत्याधुनिक आणि महागड्या तंत्रज्ञानाचा पर्याय निवडण्यापूर्वी शतावरी या आयुर्वेदीक वनस्पतीचा वापर करा. शतावरीमुळे स्त्री आणि पुरूषांमधील फर्टिलीटी सुधारण्यास मदत करतात. तसेच कामवासना सुधारण्यास मदत होते तसेच गर्भधारणा होण्याचे चान्स वाढतात. यशस्वी गर्भधारणेसाठी आहारात हे बदल कराच
कशी ठरते शतावरी फायदेशीर ?
- हार्मोनल बॅलन्स सुधारतो :
रिप्रोडक्टीव्ह वयातील अनेक स्त्रियांमध्ये पॉलीसायटिक ओव्हेरियन सिंड्रोमचा त्रास असतो. यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होते. शतावरीमुळे हार्मोन्सचे असंतुलन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. तसेच मासिकपाळीतील अनियमिततादेखील सुधारण्यास मदत होते. परिणामी गर्भधारणेचेचे चान्स सुधारतात. ( नक्की वाचा : PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका ! )
- ताण कमी करतात :
फर्टीलीटीवर ताण-तणाव परिणामकारक ठरतात. यामुळे फॅलोपियन ट्युब्समध्ये ब्लॉक निर्माण होणे, ओव्हेरियन क्रिस्ट तयार होतात. शतावरीमुळे व्हाईट ब्लड सेल्सच्या निर्मीतीला चालना देतात. तसेच दाह कमी होतो, घातक टॉक्सिक घटक, टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे रक्तातील इम्युरिटीज बाहेर टाकण्यास मदत करतात.
- ऑव्हल्युशन सुधारते :
शतावरीमधील घटक इस्ट्रोजनचे प्रमाण सुधारण्यास मदत करते. परिणामी मासिकपाळीतील अनियमितता सुधारते. यामुळे ऑव्हल्युशनदेखील सुधारते. ( नक्की वाचा : अश्वगंधा – पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय )
- सर्व्हायकल मस्कसचे सिक्रेशन सुधारते :
गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होण्यामध्ये सर्व्हायकल मस्कसचे कमी प्रमाणात होणारे सिक्रेशन कारणीभूत ठरते. सर्व्हायकल मस्कस शुक्राणूंचा स्त्री रिप्रोडक्टीव्ह ट्रॅकमध्ये प्रवास होतो तसेच अंड्याशी संपर्क होण्यास मदत होते. शतावरीमुळे सर्व्हायकल मसक्सच्या कार्याला चालना मिळते आणि अंड व शुक्राणूच्या मिलनाची शक्यता सुधारते.
- विषारी घटक कमी करतात :
शतावरी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. परिणामी शरीरात आरोग्यदायी शुक्राणू आणि अंड्याचे मिलन होण्यास पोषक वातावरण निर्मिती होते. यामुळे यशस्वी गर्भधारणा होण्यास चालना मिळते.
कसे आणि किती प्रमाणात कराल शतावरीचे सेवन ?
शतावरी पावडर किंवा कॅप्सूल्सच्या स्वरूपात उपलब्ध असते. परंतू आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्ल्याशिवाय शतावरीचे सेवन करू नका. हर्बल औषधांमध्ये हेवी मेटल्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शतावरीचे सेवन प्रमाणात करा. यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !! नक्की ट्राय करा.
References:
[1] Dayani Siriwardene, S. A., Karunathilaka, L., Kodituwakku, N. D., & Karunarathne, Y. A. U. D. (2010). Clinical efficacy of Ayurveda treatment regimen on Subfertility with poly cystic ovarian syndrome (PCOS). AYU (An international quarterly journal of research in Ayurveda), 31(1), 24.
[2] Rege N N, Nazareth H M, Isaac A A, Karandikar S M, Dahanukar S A. Immunotherapeutic modulation of intraperitoneal adhesions by Asparagus racemosus. J Postgrad Med [serial online] 1989 [cited 2015 Jun 24];35:199-203.
[3] Alok, S., Jain, S. K., Verma, A., Kumar, M., Mahor, A., & Sabharwal, M. (2013). Plant profile, phytochemistry and pharmacology of Asparagus racemosus (Shatavari): A review. Asian Pacific Journal of Tropical Disease,3(3), 242-251.