योगविद्या केवळ वजन घटवण्यासाठी मर्यादीत नसून त्याचा फायदा इतर समस्यांचा त्रास कमी करण्याठीही होतो. सुडौल बांधा हे केवळ ध्येय समोर ठेवून मेहनत करू नका. त्यासोबतच तुम्हांला कम्फरटेबल वाटावे याकरिता या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा. त्याचा फायदा तुम्हांला वजन आटोक्यात ठेवण्यासोबतच तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होते.
तुम्ही इतरांपेक्षा अधिक मेहनत करत आहात – तुमचे वजन इतरांपेक्षा जास्त असेल तर ते घटवण्यासाठी तुम्ही अधिक कसोशीने प्रयत्न करता. योगाअभ्यास करताना हाताचा भार सांभाळताना, बॅकबेन्ड करताना अधिक प्रयत्न करत असल्याने अधिक कॅलरीज बर्न होण्यासाठी मदत होते.
स्लो- पेस्ड / हलक्या फुलक्या व्यायाम प्रकारांनी सुरवात करा – अनेकदा खूप वेगाने व्यायाम केल्यास अधिक वजन घटावता येते असा अनेकांचा समज असतो. परंतू पुरेसा वेळ घेऊन व्यायाम केल्यास शरीराची लवचिकता सुधारते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते. यिन योगाचा फायदा वजन घटवण्यासाठी होतो.
तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक मेहानत करू नका – व्यायाम करण्यासाठी खूपच मेहनत करू नका. तुमची क्षमता जाणून घ्या त्यानुसार तुमचा व्यायाम प्रकार, ते कितीवेळ करावे हे निवडा. एखादे आसन तुमचे मित्र मैत्रिण सहज करते म्हणून तुम्हीदेखील तितक्याच सहज करू शकाल असा समज करून आंधळेपणाने अनुकरण करू नका. सुरवातीला तज्ञाच्या मदतीने सराव करा.
एखाद्या वस्तूची मदत घ्या : स्ट्रॅप्स (straps) किंवा ब्लॉक्सची मदत घेऊन व्यायाम करा. तुमचा हात पायापर्यंत पोहचत नसेल तर स्ट्रॅप्सची मदत घ्या. वाकून तुमचा हात जमिनीपर्यंत पोहचत नसेल तर ब्लॉकची मदत घ्या. जमिनीवर फार वेळ बसणं शक्य नसेल तर चेअर योगा करा.
तज्ञ योगा टीचरची निवड करा – दिवसाची सुरवात योगाभ्यासाने केल्यास तुम्ही प्रसन्न राहता. योगा क्लास किंवा योगा टीचरची निवड करा. त्यांच्या सल्ल्यानुसार व्यायामाला सुरवात करा आणि नियमित सराव करा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock