अनेक लोकांचा असा समज असतो की स्कीन कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर अथवा इतर कर्करोगाइतका गंभीर नसतो.मात्र फोर्टीस हॉस्पिटलचे सीटीसी विभागाचे Senior Consultant Oncologist डॉ.विकास गोस्वामी यांच्या मतानुसार वर्षभरात जगभरातून ३.५ दशलक्ष लोक स्कीन कॅन्सरचे बळी पडतात.विशेषत: सुर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारा मेलनोमा हा स्कीन कॅन्सरचा प्रकार अनेक लोकांमध्ये आढळून येतो.
डॉ.प्रकाश यांच्याकडून जाणून घेऊयात स्कीन कॅन्सर अथवा मेलनोमाविषयी अधिक माहीती.
स्कीन कॅन्सर नेमका कसा होतो-
त्वचेचा कर्करोग हा सतत त्वचा सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे होण्याची शक्यता असते.मुख्यत: केसांची त्वचा,चेहरा,ओठ,कान,मान,छाती,हा
मेलनोमा या विकाराची लक्षणे कशी ओळखाल-
- त्वचेवर गडद टिपक्यांसह मोठा तपकिरी डाग येणे.
- त्वचेवर तीळ येणे.ज्यांचा रंग,आकार बदलत राहणे व त्यातून रक्त येणे.
- त्वचेवर एखादी लहान जखम होते जी वाढत जाते व तो भाग लालसर,पांढरा,निळसर किंवा काळपट निळा होतो.
- हाताचे तळवे,पायाचे तळवे,हातापायाची बोटे यांमध्ये गडद रंगाची विकृती येण्यास सुरवात होते.महीलांच्या तोंडाच्या आतील स्लेष्मल त्वचेत,नाकात,वयाजना,गुद्दद्वा
र,स्तन अथवा काखेत विकृती येते.
- फोड येतात जे तीन महिन्याहून अधिक काळ बरे होत नाहीत.
या विकाराचा कोणाला अधिक धोका असतो-
जास्त काळ सुर्यप्रकाशात फिरणारे लोक-
जे लोक दिवसभर सुर्यप्रकाशात फिरतात त्यांच्या त्वचेचा सबंध सुर्याच्या अतिनील किरणांसोबत येतो.सुर्यप्रकाशामुळे त्यांच्या त्वचेवर तात्पुरते टॅनींग लॅम्प व बूथ येतात व पूढे त्यांचे त्वचेच्या कर्करोगामध्ये रुपांतर होण्याचा धोका निर्माण होतो. जाणून घ्या नैसर्गिक उपायांनी करा, सनटॅनला करा अलविदा !
धुम्रपान करणारे-
जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर तुम्हाला त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
स्कीन पिगमेंटेशन-
स्कीन पिगमेंटेशन झाले असल्यास तुम्हाला त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असू शकतो.ज्या लोकांचे केस ब्लॉंड,लालसर अथवा तपकिरी असतात,डोळे निळे,राखाडी अथवा हिरवे असतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.उजळ रंगाची व संवेदनशील त्वचा असणा-या लोकांमध्ये देखीलही याचे प्रमाण अधिक आढळते.जर तुमच्या शरीरावर एक किंवा त्यापेक्षा अधिक पिगमेंटेशन स्पॉट असतील तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यता आहे.
फॅमिली हिस्ट्री-
जर पूर्वी कधी तुमच्या घरातील मंडळींना हा कर्करोग झाला असेल तर तुम्हाला त्वचेचा कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे.
मोल्स-
तुमच्या शरीरावर जर खुप प्रमाणात मोल्स येत असतील अशावेळी विशेषत:नवीन मोल्स येताना तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे.मोल्स हे कर्करोगाचे प्रमुख कारण असू शकते.
इतर कारणे-
रोग प्रतिकारशक्ती कमी असणे,अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रोगप्रतिकार शक्तीसाठी घेण्यात येणारी औषधे घेणारे रुग्ण ,रेडीऐशन अथवा कीटकनाशकांच्या संंपर्कात येणारे यांना या विकाराचा अधिक धोका असतो.
त्वचेच्या कर्करोगावर काय उपाय कराल-
प्रथम तुमच्या त्वचेचे नीट परिक्षण करा.आपल्या शरीरावरील मोल्स अथवा स्कीन टॅगचे परिक्षण करणे तसे अवघड असते.मात्र यामुळे ही लक्षणे आढळल्यास त्वचेच्या कर्करोगाचे निदान लवकर होणे शक्य होते.या रोगाचे निदान लवकर झाले तर उपचार करणे देखील सोपे होते.
त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी काय कराल-
- सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत सुर्यप्रकाशात फिरणे टाळा.
- पावसाळ्यात देखील चांगल्या दर्जाचे व एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लोशन लावा.
- सुर्यप्रकाशात फिरताना चांगल्या दर्जाचे सनग्लासेस,एसपीएफ १५ असेलले लीपबाम, टोपी आणि फुल स्लीव्हज असलेले अंग पुर्ण झाकणारे कपडे यांचा वापर करा.
- तुमच्या शरीरावर अनावश्यक तीळ अथवा इतर कोणतीही लक्षणे आढळतात का याची प्रत्येक महीन्याला तपासणी करा.
- वर्षातून एकदा हेल्थ केअर सेंटर्स मधून नियमित संपुर्ण शरीराचे स्कीन चेकअप करुन घ्या.
त्वचेच्या कर्करोगाबाबत काळजी कधी कराल-
पुढील लक्षणे आढळल्यास त्वरीत कर्करोग तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- त्वचेवर एखादा फोड,जखम,विकृती येणे आणि लवकर बरा न होणे.
- त्वचेवरील एखाद्या जुन्या डागाचे प्रमाण वाढू लागणे.
- त्वचेवरील डागामध्ये खाज येणे व रक्त येणे.
- मोल्समध्ये वेदना होणे.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock