वजन वाढेल या भीतीमुळे आपण बटाटे खाणे नेहमीच टाळतो.आहारातील बटाटा हा पदार्थ आरोग्यासाठी इतका त्रासदायक अजिबात नाही.तुम्ही बटाटा बेक करुन की तळून खाताय व त्यासोबत इतर भाज्यांचा किती प्रमाणात वापर करताय यावर ते अवलंबून आहे.अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रीशियन या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून पाच वेळा हेल्दी रेसिपी करुन बटाट्याचे सेवन करतात त्यांचे वजन कमी झाले आहे.त्यामुळे बटाटा खाणे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरु शकते.मात्र बटाटा खाणे परत सुरु करण्यापुर्वी हा सल्ला जरुर वाचा.
१.बटाट्यामुळे तुमचे अति खाणे कमी होते-
आहारतज्ञ उर्वशी सोहनी यांच्या मतानुसार पोट भरणा-या पदार्थांमध्ये बटाटा अग्रक्रमावर आहे.दहा अपथ्यकारक पदार्थ खाण्यापेक्षा एक बटाट खाल्याने तुमचे लगेच पोट भरते.बटाटा खाल्याने पोट तृप्त झाल्याचा अनुभव आल्याने तुमचे ओवरइटींग आपोआप कमी होते.बटाट्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात व त्याच्यामधील स्टार्च या घटकामुळे पचन मंद होत असल्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले असल्या सारखे वाटते.मध्यम आकाराच्या एका बटाट्यामध्ये ४.३ टक्के प्रोटीनचे घटक असतात जे प्रमाण इतर सर्व भाज्यांपेक्षा अधिक आहे. जाणून घ्या बटाटा अशाप्रकारे खाल्ल्यास नाही वाढणार तुमचं वजन !!
२.बटाट्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात-
हेल्थीफायमी नूसार एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये १५० कॅलरीज असतात.बटाटा कसा शिजवला आहे यावर तुमच्या पोटात किती कॅलरीज जाणार हे ठरु शकते.त्यामुळे बटाटे तळून खाण्यापेक्षा ते सोयाबीनसह बेक करुन अथवा उकडून खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.
३.वर्कआऊट पुर्वी बटाटा खाल्याने तुम्हाला अधिक उर्जा मिळू शकते-
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट हा घटक उत्तम प्रमाणात असल्याने व्यायामासाठी लागणारी उर्जा त्यातून सहज मिळू शकते.स्पोर्ट मॅगझिन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार मॅरेथॉनचा सराव आणि हाय-इन्टेसिटी इन्टरव्हल ट्रेनिंग मध्ये कार्बोहायड्रेटमुळे तुमच्या कामागिरीमध्ये अधिक चांगला परिणाम दिसून येतो.या सरावामध्ये ब-याच कॅलरीज कमी झाल्यातरी तुमच्यामधील उत्तम कार्यक्षमता बराच वेळ टिकू शकते.इतर कार्बोहायड्रेट स्त्रोतांप्रमाणेच बटाट्यामध्ये असलेल्या पुरेश्या फायबरमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते.त्यामुळे व्यायाम करण्यापुर्वी बटाटा खाताना मुळीच काळजी करु नका. हे नक्की वाचा बटाटा – वजन वाढवण्याचा नाही तर ‘घटवण्या’चा उपाय !
४.कॉप्लेक्स कॉर्बोहायड्रेट मुळे वजन कमी होते-
न्यूट्रीशियन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार बटाट्यामध्ये कॉप्लेक्स कॉर्बोहायड्रेट घटक असतात त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.सहाजिकच बटाटा खाल्याने मधूमेह नियंत्रित राहण्यास व वजन कमी होण्यास मदत होते.यासाठी तुम्ही तुमच्या नेहमीच्या व्हाईट ब्रेड व व्हाईट पास्ता ऐवजी बटाटा खाऊ शकता.
बटाटा खाणे योग्य असले तरी अधिक प्रमाणात बटाटा खाऊ नये.यासाठी दिवसभरात फक्त एकदाच तुम्ही एक मध्यम आकाराचा बटाटा खात आहात याची दक्षता जरुर घ्या.
References:
[1] Jody M. Randolph, BA, Indika Edirisinghe, PhD, Amber M. Mason, BS, Tissa Kappagoda, MD PhD & Britt Burton-Freeman, Potatoes, Glycemic Index, and Weight Loss in Free-Living Individuals: Practical Implications, Journal of the American College of Nutrition PhD MSPages 375-384 | Received 21 Dec 2012, Accepted 26 Nov 2013, Published online: 10 Oct 2014
[2] Cermak NM, van Loon LJ. The use of carbohydrates during exercise as an ergogenic aid. Sports Med. 2013 Nov;43(11):1139-55. doi: 10.1007/s40279-013-0079-0. Review. PubMed PMID: 23846824.
[3] Bessesen DH. The role of carbohydrates in insulin resistance. J Nutr. 2001 Oct;131(10):2782S-2786S. Review. PubMed PMID: 11584106.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock