Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणातील ‘थायरॉईड’समस्येबाबत जाणून घ्या या ’6′गोष्टी

$
0
0

प्रेगन्सीसाठी तुमचे शरीर देखील गर्भधारणेला अनुकूल असणे आवश्यक आहे.शरीरातील अनेक अवयव व शारीरिक प्रक्रियांचा गर्भधारणेवर परिणाम होत असतो.शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत नसल्यास गर्भाधारणेमध्ये अडचण येते.हायपोथायरॉईडीजम या अवस्थेत थायरॉईड ग्रंथी शरीरात पुरेसे हॉर्मोन्स तयार करु शकत नाहीत.त्यामुळे तुम्हाला वंधत्व येऊ शकते किंवा प्रेगन्सीमध्ये धोका निर्माण होतो.हा धोका टाळण्यासाठी थायरॉईड ग्रंथीच्या कार्याबाबत ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरु शकते.

  • थायरॉईड हॉर्मोन्सच्या कमी  झालेल्या पातळीमुळे गर्भाशयाच्या कार्यात व्यत्यय येतो  व त्यामुळे प्रोजेस्ट्रेरॉन कमी प्रमाणात निर्माण होते किंवा मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात.इंडीयन थायरॉईड सोसायटीच्या माहीतीनूसार ७० टक्के पीएमएस महीलांना यामुळे थायरॉईड समस्या अथवा वंधत्वाला सामोरे जावे लागते.
  • थायरॉईड हॉर्मोन्समुळे तुमचे सेल्युलर फंक्शन नियंत्रित केले जाते.मात्र या हॉर्मोन्सच्या असतुंलनामुळे गर्भधारणेमध्ये समस्या निर्माण होतात.थायरॉईड समस्येचे वेळेवर निदान व उपचार न केल्यास वंधत्व येऊ शकते किंवा वारंवार मिसकॅरेज होण्याचा धोका वाढतो.न्यू दिल्लीच्या मदर लॅप आयव्हीएफ सेंटरच्या आयव्हीएफ एक्सपर्ट डॉ.शोभा गुप्ता यांच्या मते ८० टक्के महीलांमध्ये करण्यात येणा-या रक्त तपासणीमध्ये लो टिश्यू थायरॉईडची नोंद केली जात नाही त्यामुळे त्या महिलांवर लवकर उपचार केले जात नाहीत.
  • कमी झालेल्या थायरॉईड हार्मोन्सच्या पातळीचा परिणाम ओव्हूलेशनवर  होतो.हायपोथायरॉईड हा एक ऑटोइम्यून अथवा पिट्यूटरी विकार आहे ज्याचा गर्भधारणेवर परिणाम होतो.
  • थायरॉईड समस्येची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनूसार वेगवेगळी असू शकतात.काही महीलांमध्ये अनेक दिवस याबाबत कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.मात्र या समस्येची सर्वसाधारण लक्षणे वजन वाढणे,थकवा,बद्धकोष्ठता,स्नायू व सांधेदुखी,आळशीपणा,थंड वातावरण सहन न होणे,अनियमित मासिक पाळी,झोपेची समस्या ही असू शकतात.त्याचप्रमाणे या स्थितीत त्वच्या कोरडी व पातळ होते.केस पातळ व निस्तेज होतात.भूवयांवरील केस कमी व नखे ठिसूळ होतात.या अनेक लक्षणांसोबत या महीलांमध्ये गर्भधारणा होण्यामध्ये देखील अडचणी येतात. जाणून घ्या Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन !
  • थायरॉईड समस्येवर करण्यात येणारे उपचार प्रत्येक व्यक्तीनूसार वेगवेगळे असू शकतात.जर तुम्ही गर्भाधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर याबाबत योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या.तुमच्या शरीराच्या स्थितीनूसार गर्भधारणेत यश मिळण्यासाठी डॉक्टर तुम्हाला हॉर्मोन्स रिपलेसमेंट थेरपीचा सल्ला देऊ शकतात.यामध्ये १ ते २ महीने काही औषधांच्या मदतीने तुमची थायरॉईड हॉर्मोन्स लेवल संतुलित केली जाते.यासाठी तुमच्या वर उपचार सुरु केल्यानंतर तुम्हाला नियमित तुमची टीएसएच लेवल ती नॉर्मल होईपर्यंत तपासावी लागते. त्यानंतर ही आयुष्यभर औषध घेणे व दर सहा महिन्यांनी थायरॉईड फंक्शन तपासणे गरजेचे असते.
  • थाईरॉईड लेवल संतुलित ठेवण्यासाठी तुमचे वजन कमी करा व तुम्हाला यासाठी देण्यात येणारी औषधे नियमित व न चुकता घ्या.ताण टाळण्यासाठी व्यवस्थित झोप घ्या.थायरॉईड लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका व नियमित चेकअप करा.या सर्व गोष्टींचा तुम्हाला लवकर गर्भधारणा रहाण्यासाठी व सुलभ प्रसुतीसाठी नक्कीच चांगला फायदा होईल.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>