Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’11′कारणांमुळे वाढतो प्रिमॅच्युअर डिलेव्हरीचा धोका !

$
0
0

आजकाल प्रिमॅच्युअर डिलीव्हरी होण्याचे प्रमाण वाढत आहे.मुंबईतील केईएम या सरकारी हॉस्पिटलच्या न्युयोनोटॉलॉजी हेड डॉ.रुचा नानावटी यांच्या मते २२ ते २४ टक्के महीलाची अकाली प्रसुती होते.हे प्रमाण गेल्या दहा वर्षांपासून वाढतच आहे.

मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या पिडीएट्रिक विभागाच्या न्युयोनोटॉलॉजी इनचार्ज व प्रोफेसर डा. सुषमा मलिक यांच्या कडून जाणून घेऊयात महिलांमधील प्रिमॅच्युअर डिलीव्हरीची ही ११ कारणे

१.दोन प्रेग्नसीमध्ये योग्य अंतर नसणे-

दोन प्रेग्नसीमध्ये कमीतकमी १८ महीन्यांचे योग्य अंतर असणे खुप गरजेचे आहे.कारण तुमच्या शरीराला विशेषत: गर्भाशयाला प्रसुती नंतर आरामाची गरज असते.त्यामुळे १८ महिन्यांच्या आधी पुन्हा गरोदर राहिल्यास प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो. जाणून घ्या प्रेगन्सीमध्ये चक्कर येण्याची कारणंं आणि उपाय

२.आयव्हीएफ उपचार-

अनेक जोडप्यांमध्ये फर्टिलीटी समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहेे.त्यामुळे अशी जोडपी बाळासाठी आधुनिक उपचार करुन घेतात.अशा प्रकारच्या उपचारानंतर होणा-या गर्भधारणेमध्ये प्रिमॅच्युअर डिलीव्हरीच्या समस्या वाढू शकते.आयव्हीएफ उपचारांमध्ये एका पेक्षा अधिक गर्भ धारण होण्याची शक्यता अधिक असते.तसेच ही गोष्ट आई व बाळ दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीने हिताची नाही. जाणून घ्या IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणेसाठी काय कराल ?

उदा.एका अर्भकाचे आदर्श वजन तीन किलो असणे आवश्यक असते.पण उपचारानंतर जर तुमच्या गर्भाशयात तीन गर्भ धारण झाले तर त्यांचे वजन प्रत्येकी एक किलो असू शकते.हे एका अर्भकाचे आदर्श वजन अजिबात नाही.त्याचप्रमाणे अशा एका पेक्षा अधिक गर्भाचे गर्भाशयात पुरेसे पोषण देखील होत नाही.त्यामुळे याचा अर्भाकाच्या प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो.

३.उशीरा गरोदर राहणे-

डॉ.सुषमा यांच्या मते स्त्रीचे गर्भवती होण्याचे योग्य वय २२ ते ३० असते.उशीरा बाळासाठी प्रयत्न करणा-या महिलांना प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो.कारण वय वाढण्यासोबत तुमच्या हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात.यामुळे तुम्हाला प्रेग्नसीमध्ये काही समस्या व प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धाोका निर्माण होतो.यासाठी तुम्ही प्रेग्नसीसाठी प्रयत्न करण्याआधी तुमच्या गायनेकालॉजिस्टचा सल्ला जरुर घ्या. हे नक्की वाचा या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

४. पोषक आहाराचा अभाव -

डॉ.सुषमा यांच्या मते फक्त गर्भधारणेसाठीच नाही तर स्त्रीने तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे असते.त्यामुळे जर तुम्हाला मुलगी असेल तर तिला तिच्या जन्माच्या पहील्या दिवसापासून योग्य आहार द्या.त्यामुळे जेव्हा ती तिच्या भविष्यात आई होण्याचा निर्णय घेईल तेव्हा तिला पोषक घटकांच्या अभावामुळे  कोणतीही आरोग्य समस्या वाढणार नाही.जर तुमचे शरीर गर्भधारणेसाठी पुरेसे सक्षम व सुदृढ असेल तर तुम्हांंला प्रेग्नसीमध्ये समस्या येत नाहीत.

५.अॅनेमिया अथवा अति वजन-

६० ते ७० टक्के गर्भवती महिला वजन अधिक असल्याने अशक्त असतात.यामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो.यासाठी तुम्ही गरोदर असताना प्रत्येक महीन्यामध्ये तुमच्या वजनावर नीट लक्ष ठेवा.त्याचप्रमाणे याबाबतीत तुमच्या डॉक्टरच्या सल्लानुसार योग्य ते सप्लीमेंट घ्या ज्यामुळे तुम्हाला डिलीव्हरीमध्ये कोणतीही समस्या होणार नाही. नक्की वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

६.ओव्हूलेशन साठी औषधे घेणे-

ओव्हूलेशन वेळेत होण्यासाठी औषधे घेतल्याने एका पेक्षा अधिक स्रीबीजांचे फलन होते.त्यामुळे सहाजिकच एका पेक्षा अधिक गर्भधारणा होण्याची शक्यता असते.या मुळे प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका वाढतो.खरेतर ही औषधे बाजारात सहज उपलब्ध असल्याने हा धोका अधिक वाढत असतो.

७ जंकफूड-

निरोगी शरीरासाठी योग्य व संतुलित आहार घेण्याऐवजी सतत जंक फूड खाल्याने प्रेगन्सीबाबत समस्या निर्माण होतात.जंकफूडमध्ये फॅट्स,साखर,मीठ जास्त प्रमाणात असल्याने तुमच्या शरीराला योग्य अशी पोषकमुल्ये मिळत नाहीत.यामुळे तुम्हाला मधूमेह,हायपरटेंशन,ह्रदयविकार या विकारांसह  प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका वाढतो. जाणून घ्या या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता

८.अल्कोहोल-

जर तुम्ही मद्यपान करीत असाल तर प्रेग्नसी दरम्यान ते करणे त्वरीत थांबवा.कारण यामुळे तुमच्या बाळाचा विकास कमी होऊ शकतो.तुम्ही केलेले मद्यपान नाळेच्या माध्यमातून तुमच्या बाळाला मिळते व त्यामुळे तुमच्या बाळाच्या वाढ व विकासामध्ये अडथळा निर्माण होतो.

९ताण-तणाव-

जेव्हा तुम्ही ताणतणावात असता तुमच्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स,कॉर्टिसोल वाढते व त्यामुळे गर्भवती महीलांच्या भूकेमध्ये देखील वाढ होते.त्तुमच्या बाळाला नाळेमधून योग्य पोषण होण्यास अडथळा येतो.तुमच्या गर्भाची व्यवस्थित वाढ व विकास होत नाही.बाळाचे वजन कमी असल्यामुळे तुम्हाला प्रिमॅच्युअर प्रसुती कळा येतात.

१०.नाईट शिफ्ट

काही कामाच्या ठिकाणी कराव्या लागणा-या नाईट शिफ्टमुळे तुमच्या जीवनचक्रात बदल होतात.यामुळे ताण वाढतो,हॉर्मोन्समध्ये बदल होतात व  प्रिमॅच्युअर डिलीव्हरीची शक्यता वाढते.

११.जर आईचा जन्म प्रिमॅच्युअर झाला असेल तर तिच्या बाळाचा जन्म देखील प्रिमॅच्युअर होण्याची शक्यता वाढते-

डॉ.सुषमा यांच्या मते तुमचा जन्म जर नऊ महीने पुर्ण होण्याआधी झाला असेल तर तुमचे बाळ देखील प्रिमॅच्युअरच जन्माला येते.यासाठी असे असल्यास प्रेगन्सीच्या पहील्या दिवसापासून योग्य आहार घ्या व डॉक्टरांकडे नियमित चेकअपसाठी जा.प्रत्येक प्रेग्नंट स्त्रीने पहील्या तिमाहीनंतर प्रत्येक महीन्याला,दुस-या तिमाहीनंतर १५ दर दिवसांनी व तिस-या तिमाही नंतर प्रत्येक आठवड्यातून एकदा गायनेकॉलॉजिस्ट कडे तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>