Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

चाळीशीच्या टप्प्यावर या ’5′रक्ताच्या चाचाण्या नक्की करा !

$
0
0

अवघ्या काही थेंब रक्ताच्या चाचणीमधून लैंगिक आजारांपासून थेट मधूमेह आणि तापासारख्या आजारांचे निदान करता येते. प्रत्येकाने दरवर्षी किमान हेल्थ चेकअप करताना रक्ताची चाचणी अवश्य करावी. वाढत्या वयानुसार, जीवनमानातील बदलत्या शैलीनुसार काही आजार छुप्या रितीने वाढतात. म्हणूनच वयाच्या चाळीशीच्या टप्प्यावर आल्यानंतर रक्ताची चाचणी करताना या टेस्ट अवश्य करून घ्याव्यात.

1 अ‍ॅनिमिया :शरीरात व्हिटॅमिन B12, फॉलिक अ‍ॅसिड / लोहाची कमतरता असल्यास अ‍ॅनिमियाचा त्रास जाणवतो. आहारात मिनरल्स आणि व्हिटॅमिनचा पुरेसा समावेश नसल्यास अ‍ॅनिमियाचा त्रास वाढतो.यासोबतच रोगप्रतिकारशक्ती कमजोर झाल्याने हा त्रास अधिक वाढतो. चाळीशीत आल्यानंतर हार्मोनल्सचे संतुलनही बिघडते त्यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका वाढतो. म्हणूनच रक्तचाचणींमधून व्हिटॅमिन, मिनरल्स यांचे प्रमाण  तपासा.

तुम्हांला अ‍ॅनिमियाचा त्रास आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी या टेस्ट नक्की करा -

  • Complete Blood Count (CBC)
  • Vitamin B12  test
  • Serum Iron test
  • TIBC (Total Iron Binding Capacity)
  • Transferrin Saturation/Iron Saturation test
  • Ferritin test

#2 मधूमेह : बसून काम करण्याची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयी यामधून हळूहळू टाईप2 डाएबिटिसचा धोका वाढतो. त्यामुळे वेळच्यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पहा. घरात मधूमेहाचा त्रास असल्यास, गरोदर स्त्रियांनी नियमित मधूमेहाची चाचणी करावी. नियमित व्यायाम न करणार्‍यांनी तसेच लठ्ठपणाचा त्रास असलेल्यांनी मधूमेहाची चाचणी अवश्य करावीच.

मधूमेहाचे निदान करण्यासाठी या चाचण्या नक्की करा

  • Fasting Plasma Glucose (FPG) test
  • Oral Glucose Tolerance (OGT) test
  • HbA1c or glycated hemoglobin test

# 3 थायरॉईड : तुमचं वजन जास्त असेल आणि वयाची चाळीशी पार केलेली असेल तर थायरॉईडची चाचणी अवश्य करून घ्या. या चाचण्यांमधून हायपोथायरॉईडिझम, हायपरथायरॉईडीझम, थायरॉईड कॅन्सर आणि थायरॉईडिटीसचा त्रास वेळीच ओळखता येतो.

थायरॉईडचा त्रास ओळखण्यासाठी नक्की करा या खास टीप्स

  • Thyroid Stimulating Hormone (TSH) test
  • FT4 (Free Thyroxine) test
  • FT3 (Free triiodothyronine) test
  • TPO-Microsomal antibody
  • ATA-Thyroglobulin antibody

लैंगिक आजार – हेपिटायटीस बी, हेपिटायटिस  सी किंवा एचआयव्ही चा त्रास ओळखण्यासाठी सुरवातीच्या टप्प्यावरच या टेस्ट नक्की करा. त्यानुसार हे आजार ओळखणे सोप्पे होते. तुम्ही चाळीशीतही सेक्सचा अ‍ॅक्टीव्ह आनंद घेत असल्यास वर्षातून एकदा या टेस्ट नक्की करा.या रक्ताच्या चाचणीमधून लैंगिक आजार,एचआयव्ही, हेपिटायटीस बीचा धोका ओळखण्यास मदत होते.

#5 सीबीसी :  लहान सहान तापाचे आजार, मलेरिया, टीबीसारख्या समस्यांचा धोका ओळखण्यासाठी सीबीसी फायदेशीर ठरते. तुम्हांला तशाप्रकारची लक्षणं आढळल्यास किंवा वर्षातून किमान एकदा आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष देण्यासाठी, व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शन ओळखण्यासाठी या टेस्ट फायदेशीर ठरतात.

  • RBC (Red Blood Cell) count
  • WBC (White Blood Cell) count
  • Platelet count
  • Haemoglobin count
  • Peripheral smear
  • ESR (Erythrocyte Sedimentation Rate)

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>