Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांमध्ये कसा वेगळा असतो ब्रेस्ट कॅन्सर !

$
0
0

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचा विळखा भारतभर पसरलेला आहे. अगदी तरुण वयातही या आजाराने अनेकजण त्रस्त आहेत. पाश्चात्त देशाच्या तुलनेत  भारतात कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसून येते. पाश्चात्त देशात हे प्रमाण २०% तर भारतात हे प्रमाण ५०-६०% इतके आहे. वर्षभरात सुमारे १ लाख ७० हजार महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आढळून येतो. त्यापैकी जवळपास ८० ते ९० हजार महिलांचा मृत्यू कॅन्सरने झाला आहे. या गंभीर आजारावर ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. अँथनी व्ही. यांनी काही महत्त्वाच्या बाबी समजावून सांगितल्या.

  • भारतातील अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहेत. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कन्सर असे या आजाराचे नाव आहे. हा अतिशय दुर्दम्य असा आजार असून यावरील उपचार करणे देखील कठीण आहे.  कारण कॅन्सर सेल्स मध्ये chemical receptors for estrogen and progesterone नसल्याने ते उपचाराला कमी प्रतिसाद देतात.  पाश्चात्त देशात ब्रेस्ट  कॅन्सर चे प्रमाण 12 ते 15 टक्के असून भारतात हे प्रमाण 31 ते 33 टक्के इतके आढ्ळून येते.
  • जर तुम्हाला पाहिलं बाळ विशीच्या शेवटच्या टप्प्यात आणि तिशीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होणार असेल तर तुम्हाला ब्रेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. पण जर तुम्ही १ वर्षापर्यंत बाळाला ब्रेस्टफीड केलं हा धोका कमी होतो.  नक्की वाचा : ही ’6′ लक्षणं देतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा संकेत !

काही मह्त्त्वाच्या बाबी:

१.संतुलित आहार, आणि नियमित व्यायाम हा उत्तम आरोग्याचा मंत्रच आहे . या आजारावरही एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे तसेच मद्य आणि धूम्रपान टाळल्यास या आजाराला प्रतिबंध होऊ शकतो.

२.आपल्या देशात हळूहळू कॅन्सरबद्दल ची जागरूकता वाढत आहे. तरी अजून ही नियमित तपासण्या करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. नियमित तपासण्या करून घेणे अधिक फायदेशीर ठरेल कारण त्यामुळे कॅन्सरचे निदान लवकर होण्यास मदत होईल. जर तुमच्या घरामध्ये कोणाला कॅन्सर असेल तर तुम्हाला अधिक जागरूक राहिले पाहिजे. वेळोवेळी मॅमोग्राफी किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झाम केली पाहिजे. स्वतः आपल्या आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी करा: ‘ब्रेस्ट सेल्फ एक्झाम’ – स्तनांचा कर्करोग ओळखण्याचा पहिला संकेत

Read this in English Translated By –Darshana Pawar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

३. आता नव नवीनतं त्रज्ञान  बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे आजाराचे निदान लवकर होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीराला अधिक त्रास न देता आपण आजारावर उपाय करू शकतो. त्यापैकी एक म्हणजे म्हणजे डिजिटल मॅमोग्राफी. यामुळे कॅन्सरचे निदान सामान्य पद्धतीपेक्षा अधिक जलद होण्यास मदत होते. त्यामुळे सुरवातीच्या  स्टेजला आपण त्यावर उपचार करू शकतो. तसेच अजून एक  उत्तम पर्याय म्हणजे स्टिरीओटॅक्टिक बायोप्सी. ही टेस्ट सर्जिकल बायोप्सी पेक्षा अधिक सुलभ आहे. याबद्द्ल अधिक जाणण्यासाठी: Mammography करण्यापूर्वी जाणून घ्या त्यासंबंधी या ’8′ गोष्टी !

४.छोटे ट्यूमर्स असल्यास घाबरून जाण्याची गरज नाही कारण लहान स्वरूपात असलेले ट्यूमर्स ‘व्हॅक्युम असिस्टेड’ टेक्नीकने काढू शकतो. त्याचबरोबर सर्जेरीनंतर शरीर विचित्र दिसेल अशी भीती अनेकींच्या मनात असते. परंतु आपण नवीन टेक्नोलोंजीची साथ नेहमीच आपल्याला आहे. यामुळे  मोठ्या सर्जेरी नंतर ‘मायक्रोव्हॅस्कुलर रीकन्सस्टकशन’ ही टेक्नीक वापरून आपण आपल्या शरीराचा आकार मूळ स्वरूपात ठेऊ शकतो.

References:

  1. ICMR study on Population-based Cancer Registries, 2012-14
  2. Breast Cancer Risk Profile in Indian Women: Navnit Kaur, Navneet Kaur, Amit Attam, Sudipta Saha, S. K. Bhargava, Department of Surgery and Radiology, University College of Medical Sciences & GTB Hospital, Delhi, India.   Read this in English Translated By –Darshana Pawar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>