आजकाल शिक्षण आणि त्याचबरोबर स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नोकरी आणि त्यातील स्थिरता महत्त्वाची आहे. त्यामुळे लग्न आणि मूल ह्या गोष्टी लांबणीवर पडतात. मग उशीरा बाळासाठी प्रयन्त करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हार्मोनल इम्बॅलन्स,वाढलेले वय या गोष्टी आपल्या गर्भार क्षमतेवर परिणाम करू शकतात.यावर मेडिकल डिरेक्टर डॉ. शोभा गुप्ता यांच्या सल्ल्यानुसार, “वयाची ३५ ओलांडल्यानंतर मुलासाठी प्रयत्न करुनही अयशस्वी होत असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.”
1. मासिकपाळीची अनियमितता: स्त्रियांमधील इन्फर्टीलिटी चे हे अगदी सामान्य कारण आहे. मासिकपाळीत अनियमितता असणे म्हणजे वेळेपेक्षा खूप आधी किंवा उशिरा पाळी येणे. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. यावर उपाय म्हणजे नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य आषोधोपचार. नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!
2. शारिरीक समस्या: पिसिओडी (PCOD), ट्युबल ब्लॉकेज यासारख्या समस्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात. पिसिओडी ही समस्या आजकाल भारतीय स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळते. त्यामुळे अनेकींमध्ये गर्भधारणेमध्ये दोष आढळून येतात. नक्की वाचा : PCOS आणि PCODच्या समस्येवर नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात का ?
3. पेल्विक इन्फ्लाम्माटरी डिसीजेस: हे इन्फेकशन लैंगिक संबंधातून पसरते. त्याचा परिणाम स्त्रियांच्या गर्भधारण क्षमतेवर होतो. प्रजनन संस्थेतील ओव्हरीज, गर्भाशय,फ्ललोपिन ट्यूब्ज अशा अनेक अवयवांवर याचा परिणाम दिसून येतो. जर तुम्ही कोणत्याही असुरक्षित लैंगिक संबंधात असाल किंवा लघवी करताना त्रास होणे, जळजळ, खाज येणे, संबंध ठेवताना खूप दुखणे अशी कोणतीही लक्षणंं आढळल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणूनच नक्की जाणून घ्या सेक्सशिवायदेखील होऊ शकते या लैंगिक आजाराची बाधा
4. थायरॉईड भारतातील अनेक स्त्रिया थायरॉईडच्या विळख्यात आहेत. त्यामुळे शरीरात होणारे बदल इन्फर्टीलिटीसाठी कारणीभूत ठरतात. नियमित थायरॉईड चेकअप आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. म्हणूनच थायरॉइडच्या या ’6′ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका !
5. वाढलेले वय प्रत्येक स्त्रीची स्वतःची अशी क्षमता असते. ठराविक वयानंतर शरीरातील अंड्यांची क्षमता कमी होते. याचा परिणाम निश्चितच गर्भधारणेवर होतो. त्यामुळे उशिरा बाळासाठी प्लॅन्स करणार असाल तर या समस्यांचा नक्कीच विचार करा आणि आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ? याबाबतचा हा खास सल्लादेखील नक्की जाणून घ्या . Read this in English Translated By –Darshana Pawar छायाचित्र सौजन्य – Shutterstock