Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या १० कारणांसाठी एक वर्षापेक्षा लहान बाळाला गायीचे दूध देऊ नका !

$
0
0

भारतात असा समज अाहे की आईच्या आणि इतर फॉर्म्युला दूधांपेक्षा गाईचे दूध बाळासाठी श्रेष्ठ आहे.त्याचप्रमाणे बाळाला करण्यात येणा-या स्तनपानाबाबतही अनेक समज-गैरसमज आढळून येतात.जर तुम्हाला असे वाटत असेल की गाईच्या दूधातील प्रोटीन आणि कॅल्शियममुळे तुमच्या बाळाचे आरोग्य सुधारेल तर हा तुमचा एक गैरसमज असू शकतो.यासाठी तुमच्या बाळाला कमीतकमी एक वर्ष तरी गाईच्या दूधापासून दूर ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो.यासाठी तज्ञांकडून जाणून घेऊयात की बाळाला एक वर्ष गाईचे दूध का देऊ नये. जाणून घ्या बाळाला मांसाहार भरवताना या ‘७’ गोष्टींची काळजी घ्या !

बाळाला गाईचे दूध न देण्याची १० कारणे-

१.इंटरनॅशनली सर्टीफाईड प्रेगन्सी,लेक्टेशन अॅन्ड चाईल्ड न्यूट्रीशन काऊंसलर आणि आमच्या पॅनल एक्सपर्ट सोनाली शिवलानी यांच्या मते गाईचे दूधात असे घटक असतात जे लहान बाळाला पचू शकत नाही व त्यामुळे त्याला अपचन देखील होऊ शकते.

२.लहान बाळ लॅक्टोज इंटॉरलंट असतात.गाईच्या दूधातील लॅक्टोज या घटकामुळे बाळाला ते दूध पचत नाही व बाळाला पचनाच्या समस्या होऊ शकतात.

३.गाईच्या दूधात लोह हा घटक कमी असतो.लोहाच्या कमतरतेमुळे बाळ अॅनिमियामुळे अशक्त होऊ  शकते.

४.गाईच्या दूधात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे लहान बाळाने गाईचे दूध सेवन केल्यास मोठेपणी त्याला लठ्ठपणाच्या समस्या वाढू शकतात.

५.नियमित लहान बाळाला गाईचे दूध दिल्यास लोहाच्या अभावामुळे लहान वयातच बाळाला कमी रक्तपुरवठयाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

६.अधिक प्रमाणात असलेले कॅल्शियम व दूधातील इतर सत्वांमुळे लोहाची कमतरता होऊन बाळाला अॅनिमिया होण्याचा धोका असू शकतो.

७.गाईचे दूध तुमच्या बाळाच्या पोटासाठी पूरक व पोषक नसल्यामुळे बाळाच्या किडनीच्या कार्यावर टॉक्सिन्स बाहेर टाकण्याच्या कामाचा अतिरिक्त दबाव पडतो.आईच्या दूधापेक्षा गाईचे दूध घेणा-या मुलांमध्ये युरीनचे प्रमाण अधिक असते.सतत शू केल्याने अशा मुलांना डिहायड्रेशन व डायरियाचा त्रास होण्याची शक्यता वाढते.

८.गाईच्या दूधाच्या अॅलर्जीमुळे काही मुलांमध्ये झाोपमोड किंवा झोप न येण्याच्या समस्या होतात.मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार गाईचे दूध पिणा-या काही मुलांमध्ये झाोप चांगली लागण्याचे बदल देखील दिसून आले आहेत.

९.गाईचे दूध बाळाला पचण्यास जड असल्याने त्यामुळे बाळाला पोटात वायू होण्याचे व वेदना होण्याची समस्या निर्माण होते.

१०.अगदी अर्भकावस्थेत गाईचे दूध पिणा-या मुलांमध्ये मोठेपणी अॅलर्जी होण्याची शक्यता निर्माण होते.

  • महत्वाची टीप-

याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारातून पूर्णपणे गाईचे दूध बंद करा.फक्त त्याला एक वर्षापर्यंत गाईचे दूध देऊ नका. तुमचे बाळ थोडे मोठे झाले की तुम्ही त्याला गाईचे दूध देऊ शकता.काही तज्ञ यासाठी दोन वर्ष बाळाला गाईचे दूध न देण्याचा सल्ला देतात.त्याचप्रमाणे बाळाला गाईचे दूध सुरु केल्यानंतर त्याला लोहयुक्त आहार देखील देण्यास सुरुवात करा कारण गाईच्या दूधात लोहाचे प्रमाण कमी असते. नक्की वाचा बाळाला मसाज करणे योग्य की अयोग्य ?

References

1: Ziegler EE. Consumption of cow’s milk as a cause of iron deficiency in infants and toddlers. Nutr Rev. 2011 Nov;69 Suppl 1:S37-42. doi: 10.1111/j.1753-4887.2011.00431.x. PubMed PMID: 22043881.

1: Kahn A, Mozin MJ, Casimir G, Montauk L, Blum D. Insomnia and cow’s milkallergy in infants. Pediatrics. 1985 Dec;76(6):880-4. PubMed PMID: 4069856.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles