गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील एक फार महत्वाची अवस्था असते.गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.गरोदरपणात यासाठी अनेक आरोग्य चाचण्या देखील कराव्या लागतात.एक खबरदारीचा उपाय म्हणून महीलांना गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीमध्ये धर्नुवात प्रतिबंधक लस देण्यात येते.गरोदर मातेला व तिच्या बाळाला धर्नुवाताचा धोका टाळण्यासाठी टिटॅनस टॉक्साईड(Tetanus Toxoid )किंवा टी.टी.चे लसीकरण करण्यात येते. लक्षात ठेवा धर्नुवात हा क्लॉस्ट्रिडियम टेटानी(Clostridium Tetani)नावाच्या विषाणूंच्या विषापासून होणारा एक प्राणघातक रोग आहे.त्यामुळे तुमच्या व तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हे लसीकरण जरुर करुन घ्या.
गरोदरपणात धर्नुवात प्रतिबंधक लसीकरण करणे महत्वाचे का असते?
धर्नुवाताचा माणसाच्या मज्जासंस्थेवर विपरित परिणाम होतो.धर्नुवात प्रतिबंधक लसीकरण केल्यामुळे या रोगापासून संरक्षण मिळू शकते.या लसीकरणामुळे बाळाला जन्माआधीच्या आईच्या गर्भाशयात व जन्मानंतरही काही महीने संरक्षण मिळते.धर्नुवाताचे जिवाणू माणसाच्या शरीरावरील कापणे,जळणे किंवा ओरखड्या मुळे झालेल्या मोकळ्या व उघड्या जखमेतून शरीरात प्रवेश करतात.त्यामुळे या प्राणघातक जिवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेवून त्याबाबत सावधगिरी बाळगणे नेहमीच फायद्याचे ठरु शकते.यासाठी गरोदरपणात महीलांना धर्नुवाताचे लसीकरण घेणे बंधनकारक आहेे. जाणून घ्या Pregnancy कन्फर्म करण्यासाठी मदत करतात या ’3′ टेस्ट !
गर्भवती महिलांना धर्नुवात प्रतिबंधक लसीकरणाचे किती डोस देण्यात येतात?
डॉक्टर सामान्यत: गर्भवती महीलांना गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीमध्ये धर्नुवात प्रतिबंधक लस घेण्यास सांगतात.या अवस्थेत तुम्हाला या लसीकरणाचे दोन डोस घ्यावे लागू शकतात.दुसरा डोस पहिल्या डोसनंतर चार आठवडयांनी देण्यात येतो.कधीकधी डॉक्टर तुम्हाला तिस-या तिमाही मध्ये देखील बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देतात.तुम्ही धर्नुवात प्रतिबंधकलसीकरण किती डोस घ्यावे हे फक्त तुमचे हेल्थ केअर प्रोवायडर अथवा डॉक्टरच व्यवस्थित सांगू शकतात. नक्की वाचा प्रेगन्सीमध्ये चक्कर येण्याची कारणंं आणि उपाय
धर्नुवात प्रतिबंधक लसीकरणाला काही पर्याय आहे का?
अजिबात नाही.तुमच्या बाळाला व तुम्हाला धर्नुवाताच्या प्राणघातक संसर्गापासून वाचवण्यासाठी तुम्हाला धर्नुवात प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक आहे.लक्षात ठेवा गर्भधारणेदरम्यान तुमची प्रतिकारशक्ती फार कमी झालेली असते त्यामुळे धर्नुवात प्रतिबंधक लस टाळणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.तसेच लसीकरण न करता जर प्रेगन्सीमध्ये तुम्हाला कापणे किंवा इतर कोणतीही जखम झाली तर तुम्हाला ताबडतोब वैद्याकीय मदत घ्यावी लागू शकते.त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी तुम्ही धर्नुवात प्रतिबंधक घेणे हेच तुमच्या व तुमच्या बाळाच्या हिताचे आहे. जाणून घ्या या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock