Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पपईच्या पानांचा रस ‘डेंग्यू’रुग्णांसाठी फायदेशीर !

मुंबईसह देशभरात ‘डेंग्यू’ , स्वाईन फ्ल्यू अशा आजारांनी आपलं डोकं वर  काढलं आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत  आहे.  या सोबतीला यावर उपाय म्हणून विविध घरगुती उपाय  सुचवणारे मॅसेजेसही सोशल मिडीयातून फिरत आहे. अशांपैकी एक म्हणून ‘पपईच्या पानांमुळे डेंग्यू आटोक्यात राहतो’. पण ही अफवा नसून त्यात तथ्य असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे.

  • अफवा तर नाही ना? 

सोशल मिडीयात फिरणार्‍या या मॅसेजमुळे अनेकदा लोकांना ही एक अफवा वाटते. पण वास्तवात पपईची पानं आरोग्यदायी असल्याचे सिद्ध झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ़ फ्लोरिडाचे संधोधक डॉ. नॅम डॅंग यांच्यामते, पपईच्या पानांचा रस  फायदेशीर आहे. या पानांमुळे कर्करोगाशी सक्षमतेने सामना करता येतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत  करतो. तसेच मलेरियाशी सामना करण्याची क्षमता यामध्ये आहे.

श्रीलंकन फिजिशियन डॉ. सनथ यांच्यामते कोवळ्या पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर फायदेशीर आहे. हा रिसर्च पेपर 2008 साली श्रीलंकन जर्नल ऑफ़ फॅमिली फिजिशीयन  मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.

  • कसा आहे पपई फायदेशीर ?

पपईच्या पानांमध्ये chymopapin आणि  papain  अशी महत्त्त्वपूर्ण एंजाईम्स आढळतात.  डॉ. सनथ यांच्या मते, या पानांमुळे रक्त साखळून न राहता प्रवाही होते. तसेच रक्तातील प्लेट्स काऊंट वाढवतात  व डेंग्यूमध्ये होणारे यकृताचे नुकसान टाळून त्याची कार्यक्षमता वाढवतात. (पपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !)

  • कसा घ्याल पपईचा रस ?

पपईची कोवळी पानं खुडून घ्यावीत.  त्याचे देठ काढून फक्त पानं स्वच्छ धुवून घ्यावीत.

खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये ही पानं वाटून त्याची पेस्ट करावी.  यामिश्रणामध्ये पाणी, मीठ व साखर मिसळू नये.

यानंतर आठ तासांच्या अंतराने हा रस दिवसातून दोनदा प्यावा.

रसाचे प्रमाण -

5-12 वयोगटातील मुलांसाठी – 5मिली /दिवसातून दोनदा

10 वर्षांखालील मुलांसाठी – 2.5 मिली

मध्यमावयीन लोकांसाठी  - 10 मिली / दिवसातून दोनदा

  • कोणत्या टप्प्यावर रुग्णांनी हा रस प्यावा ?

डॉ. सनथ यांच्या सल्ल्यानुसार शक्य  तितक्या लवकर हा रस घ्यावा.  डेंग्यूची लक्षण आढळल्यास / निदान झाल्यास तुम्ही लगेचच हा रस प्यायला सुरवात करू शकता.या आजारामध्ये झपाट्याने प्लेट्स कमी होतात. त्यामुळे त्या  150000  पेक्षा कमी होण्याआधीच हा रस प्यायला सुरवात करावी. कारण या आजाराची गंभीरता वाढल्यास काही अवयव निकामी होण्याची शक्यता वाढते. मग अशावेळी उपाय फायदेशीर ठरत नाहीत.

 हा एक घरगुती उपाय आहे. याचा वापर औषधोपचार टाळून करू नका. डेंग्यूचे लक्षण किंवा निदान झाल्यास त्वरित वैद्यकिय सल्ला घ्यावा. 


 

संदर्भ -

[1] 1: Otsuki N, Dang NH, Kumagai E, Kondo A, Iwata S, Morimoto C. Aqueous extract of Carica papaya leaves exhibits anti-tumor activity and immunomodulatory effects. J Ethnopharmacol. 2010 Feb 17;127(3):760-7. doi: 10.1016/j.jep.2009.11.024. Epub 2009 Dec 2. PubMed PMID: 19961915.

[2] Salutary effects of carica papaya leaf extract in dengue fever patients – a pilot study S Hettige1. Journal  of Family Physician of Sri Lanka, 2008, 29, 17-19(1)

[3] Sarala N, Paknikar S. Papaya Extract to Treat Dengue: A Novel Therapeutic Option? Annals of Medical and Health Sciences Research. 2014;4(3):320-324. doi:10.4103/2141-9248.133452.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Sourece -  Papaya leaf juice can cure dengue says Indian Doctor

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>