झी मराठीच्या ‘शेजारी शेजारी… पक्के शेजारी’या विनोदी मालिकेनंतर अभिनेता वैभव मांगले याने काही काळ छोट्या पडद्यापासून आराम घेतला होता. मात्र त्यानंतर काही सुपरहीट सिनेमे दिल्यानंतर वैभव पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे. मात्र यावेळचा त्याचा अंदाज थोडा हटके आहे. वैभव मांगले झी मराठीवर सुरू होणार्या नव्या मालिकेत ‘स्त्रीवेशात’ दिसणार आहे. यापूर्वी काही संगीत नाटकांत आणि काही सोहळ्यांमध्ये त्याने स्त्री पात्र खुबीने रंगवली होती. ( जाणून घ्या भूषण प्रधनचा एक्स्क्लुझिव्ह फीटनेस फंडा)
फोटो सौजन्य – abp majha/ Youtube
झी मराठीवर सुरू होणार्या या नव्या मालिकेसाठी वैभव अभिनयासोबतच त्यांच्या दिसण्यावरही मेहनत घेत आहे. यासाठी त्याने डाएट आणि व्यायामाच्या साथीने 2 महिन्यांत साडेपाच किलो वजन घटवले आहे. व्यायामासाठी 30-35 मिनिटे कार्डीओ ( चालणे), वेट ट्रेनिंग आणि अॅब्सचा तो नियमित सराव करत असल्याचे एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितले आहे.
पहा या नव्या मालिकेचा प्रोमो
व्हिडीयो सौजन्य – Preetesh Rangole / Youetube channel
छायाचित्र सौजन्य - Preetesh Rangole / Youetube channel
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या