सेक्स म्हणजे फक्त शरीरसुख नसून त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. मग सेक्सचा अधिकाधिक आनंद कसा घ्यावा आणि तो वाढवण्यासाठी नेमकं काय करावं ? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काही जणांमध्ये शीघ्रपतनाच्या समस्येमुळे तर काहींमध्ये भीतीमुळे सेक्सचा पुरेसा आनंद घेता येत नाही. मग पहा तुमच्या कोणत्या चुका या आनंदाच्या आड येतोय.
- भाज्या आणि फळं खावीत :
शाकाहारी पुरूष मांसाहारी पुरूषांपेक्षा अधिक वेळ सेक्सचा आनंद घेऊ शकतात. भाज्या आणि फळांमधून पुरेशी पोषणद्रव्य शरीराला मिळत असल्याने तुमचा स्टॅमिना वाढतो.
1. सेक्सपूर्वी केळं खाणं हितावह आहे. त्यातून मिळणार्या पोटॅशियम घटकांमुळे शरिरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. परिणामी तुम्ही अधिकवेळ सेक्सचा आनंद घेऊ शकता.
2. आवळ्यामध्ये आयर्न आणि झिंक घटकांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे नियमित आवळ्याचा रस पिणे सेक्सलाईफ़ सुधारण्यासाठीही आरोग्यदायी ठरते.
3. सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरीदेखील फायदेशीर आहे. त्यातील झिंक आणि ग्लुकोज घटक तुम्हांला फायदेशीर ठरतात.
- प्रोसेस्ड साखर टाळा:
प्रोसेस्ड साखरेचा आहारात समावेश टाळावा. यामुळे तुमचा स्टॅमिना कमी होण्याची शक्यता असते.
- धुम्रपान टाळा :
धुम्रपानामुळे शिश्नाला होणार्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. फिजिशियन आणि सेक्स थेरपिस्ट डॉ.विजयसार्थी यांच्या सल्ल्यानुसार, धुम्रपानाचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे सेक्सलाईफदेखील धोक्यात येते. तसेच धुम्रपान करणार्या पुरूषांमध्ये शीघ्रपतनाची समस्या इतरांपेक्षा दुप्पटीने अधिक असते. धुम्रपानामुळे होतात सेक्सलाईफवर गंभीर परिणाम !
- मद्यपान टाळा :
मद्यपानाचादेखील शरीरावर अपायकारक परिणाम होतो. त्यामुळे सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर अशा व्यसनांपासून दूरच रहा.
- पुरेशी झोप घ्या :
पाच तासांपेक्षा कमी वेळ झोप घेणार्या पुरूषांमध्ये टेरेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामूळे किमान 6-8 तास शांत झोप ही आरोग्यासाठी हितकारी आहे. तसेच तुमच्या सेक्सलाईफसाठीदेखील आवश्यक आहे.
- योगासनं करा :
भुजंगासन, पश्चिमोत्तासन यासारखी आसनं सेक्सलाईफ सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे तुमच्या जननेंद्रियांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो. त्यामुळे सेक्सचा आनंद घेण्यासाठी या योगासनांचा नक्कीच फायदा होतो.
- स्त्रियांना कामक्रीडेचा आनंद द्या:
सेक्सचा आनंद मिळवायचा असेल तर थोड्या संयमाची गरज आहे. थेट संभोग करण्याऐवजी कामक्रिडेलाही वेळ द्या. यामुळे तुम्ही त्यांना ऑरगॅझमचा आनंदही अधिक देऊ शकता. ( कामक्रिडा वाढवा या ‘5’ विचित्र मात्र रोचक पर्यायांनी ! )
- स्क्वीझ टेकनीकचा (squeeze technique) आनंद घ्या :
जेव्हा तुम्ही सेक्सच्या परमोच्च आनंद घेत असाल तेव्हा वेळीच थांबून ‘स्वीझ टेक्निक’चा अवलंब करा. यामध्ये यामुळे तुम्ही अधिक वेळ सेक्सचा आनंद घेऊ शकता.
- कीगल व्यायाम :
या व्यायामप्रकारामुळे इरेक्शनची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सेक्सचा आनंद वाढतो. यामध्ये तुम्ही असं समजा की तुम्ही मुत्रविसर्जन करताय पण फ्लो रोखताय. असे नियमित 10 वेळा करणे तुम्हांला फायदेशीर ठरू शकते.
- हाताचे आणि पोटाचे स्नायू बळकट करा :
बर्याच सेक्स पोजिशन्समध्ये पुरूष स्त्रियांना सावरतात. त्यामुळे स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी तुमचे मसल्स मजबूत असणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमचे मसल्स कमजोर पडणार नाहीत याची काळजी घ्या. तसेच लठठ लोकांनी नियमित व्यायाम करा. म्हणजे तुमच्या जननेंद्रियाला पुरेसा रक्तपुरवठा होतो. यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!
संबंधित दुवे
- पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या ’8′ गोष्टींचे भान !
- सेक्स गाईड – कसा घ्यावा महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना आनंद
- बाळ कसं होतं
छायाचित्र सौजन्य – Getty Images
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.