Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काळवंडलेल्या जांघेपासून सुटका मिळवण्याचे ’10′घरगुती उपाय !

$
0
0

तुमच्या त्वचेचा रंग गोरा आहे मात्र  जांघेतील त्वचा काळवंडलेली दिसते. ही समस्या अनेक स्त्रियांमध्ये आढळते. एकमेकांवर पाय सतत घासले गेल्याने, वजन वाढल्याने तसेच त्या भागावर त्वचा शुष्क झाल्याने जांघांमध्ये काळसरपणा वाढीस  लागतो.  पण यापासून सुटका मिळवण्याचे  काही घरगुती उपाय आहेत. मग नैसर्गिक उपचार पद्धतीने सुटका मिळवण्यासाठी तुम्हीदेखील हे उपाय करून पहा.

1) नारळाचं तेल आणि लिंबाचा रस

फायदे:   नारळाचं तेल हायपरपिगमेंटटेशनची समस्या कमी करून त्याचे पोषण करण्यास मदत होते. तर लिंबाच्या रस  हा नैसर्गिकरित्या ब्लिचिंग एजंट असल्याने  डाग कमी होण्यास मदत होते. हा पॅक नैसर्गिकरित्या ब्लिचिंग आणि मॉईश्चरायझिंग करतो.

कसा बनवाल पॅक 

  • 3 चमचे खोबरेल तेलात अर्ध्या लिंबाचा रस मिसळावा.
  • हे मिश्रण एकत्र करून जांघामध्ये 15 मिनिटे मसाज करावा.
  • गरम पाण्याने हा पॅक स्वच्छ धुवून कापडाने जांघेकडील भाग कोरडा करावा.

2) दही आणि लिंबू

फायदे: दही त्वचेचे पोषण करण्यास तर लिंबू त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत  करतात. यामधील अ‍ॅसिडिक घटक व त्वचा नितळ करण्याची क्षमता संसर्गालादेखील दूर करतात. 

कसा बनवाल पॅक 

  • चमचाभर आंबट दह्यात अर्धा लिंबू पिळावा.
  • त्यात बेसन व हळद मिसळून पॅक तयार करावा.
  • हा पॅक जांघेत लावून काही वेळ सुकू द्यावा.
  • साध्या पाण्याने हलका मसाज करत हा पॅक काढावा.

3) साखर, मध व लिंबू

फायदे:  त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास साखर अत्यंत उपयुक्त आहे. तर मध त्वचेला ओलावा देऊन पोषण करते. लिंबाच्या रसामुळे पिगमेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत होते.

कसा बनवाल पॅक 

  • चमचाभर मध व साखरेत अर्धा लिंबू पिळावा.
  • हे मिश्रण  नीट एकत्र करून जांघांमध्ये लावावे.  साखर विरघळेपर्यंत हळूवार मसाज करा.
  • 10 मिनिटांनी हा पॅक स्वच्छ पाण्याने नीट धुवावा.

4) चंदन आणि काकडी

फायदे:  चंदन आणि काकडी दोन्ही थंड प्रवृत्तीचे असल्याने त्वचेचे पोषण करतात. यामध्ये लिंबू मिसळल्यास त्वचेवरील डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत होते.

कसा कराल पॅक -

  • काकडी सोलून किसून घ्यावी. त्यात 1 चमचा चंदन पावडर व अर्धा लिंबू पिळवा.
  • हा पॅक  जांघेत लावून काही काळ सुकू द्यावा.
  • थोड्या वेळाने पाण्याने स्वच्छ धुवावा.

‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !

5)  बदामाचं तेल, दूध व मध 

फायदे: बदामाच्या तेलामध्ये व्हिटामिन ई चे प्रमाण मुबलक असल्याने त्वचेचा रंग सुधारण्यासमदत होते. तसेच मध व दूध संसर्गाला दूर ठेवण्यास मदत करतात. व त्वचेचे पोषण करतात.

कसा बनवाल हा पॅक  

  • दोन चमचे दुधात एक चमचा मध व बदामाचे तेल  मिसळावे.
  • हे मिश्रण जांघेवर लावून काही वेळ सुकू द्यावे.
  • थोड्या वेळाने थंड पाण्याने का पॅक काढावा.

6)  ओट्स,दही आणि मध

फायदे: ओट्स डेड स्क्रिन काढण्यास मदत करते तर दह्यामुळे त्वचा मऊ होते  आणि मधातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल घटकामुळे संसर्गही कमी होतो.   

कसा बनवाल हा पॅक 

  • 1 चमचा ओट्स आणि आंबट दही एकत्र करावे. त्यात काही थेंब  मध मिसळावे.
  • हे घट्ट  मिश्रण जांघेतील त्वचेवर  लावावे. व हलका मसाज करा  म्हणजे मृत त्वचा निघण्यास मदत होते.
  • काही वेळाने तो भाग स्वच्छ करा आणि टॉवेलने तो भाग स्वच्छ पुसा.

7) बटाटा, टोमॅटो रस व मध 

फायदे:  हे रसाचे मिश्रण नैसर्गिकरित्या ब्लिचिंग एजंट असल्याने त्वचेचे पोषण होण्यास मदत होते. त्वचेवर खूपच डार्क स्पॉट असतील तर हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे. मधामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून बचाव होते. (टोमॅटो – त्वचेचे आरोग्य सुधारणारे घरगुती टोनर)

कसा बनवाल पॅक

  • बटाटा सोलून  किसून घ्यावा. त्यात टॉमेटोचा रस व चमचाभर मध मिसळावे.
  • जांघेत हे मिश्रण लावून सुकू द्यावे.
  • थोड्या वेळाने पाण्याने स्वच्छ धुवावे.

8) संत्र्याची साल व मध 

फायदे: संत्र्यामध्ये व्हिटामिन सी  मुबलक प्रमाणात आढळते तसेच तो एक ब्लिचिंग घटक असल्याने त्वचा सुधारते. व जेव्हा संत्र्याच्या सालीची पूड/रस मधात मिसळला जातो तेव्हा त्वचेच्या सार्‍या समस्या दूर होण्यास मदत होते.

कसे बनवाल हे पॅक 

  • चमचाभर मधात संत्र्याच्या सालीचा रस पिळून घ्यावा
  • नंतर साल खिसून किंवा पावडर करून मधात मिसळावी.
  • आता हा तयार पॅक जांघेत लावावा.
  • 15 मिनिटांनंतर पाण्याने हा पॅक काढून काढावा.

9) कोरफड आणि बदामाचे तेल 

फायदे :  कोरफ़ड ही  मूळातच थंड प्रवृत्तीची असल्याने  ती कोणत्याही प्रकारच्या त्वचेला आराम देते.  आणि त्यात सोबतीला बदामाचे तेल असल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. यामध्ये व्हिटामिन ईचे प्रमाण मुबलक असते.

कसा बनवाल हा पॅक 

  • 2 चमचे कोरफडीच्या गरामध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब मिसळावेत.
  • या मिश्रणाने जांघांमध्ये मसाज करावा.
  • काही वेळाने पाण्याने हा पॅक स्वच्छ करावा.

10) लिंबू, गुलाबपाणी व ग्लिसरिन 

फायदे: तुम्हांला जांघेकडील त्वचा मऊ आणि नितळ असावी असे वाटत असल्यास हा पॅक वापरा. या तिन्ही पदार्थांमुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

कसा बनवाल हा पॅक 

  • चमचाभर ग्लिसरीन व लिंबाचा रस एकत्र करा. त्यामध्ये 3-4 थेंब गुलाबपाणी मिसळा.
  • रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण जांघेमध्ये लावूनझोपावे.
  • दुसर्‍यादिवशी सकाळी आंघोळ  करताना हे मिश्रण स्वच्छ करावे.

संबंधित दुवे -

घरगुती उपायांनी दूर करा कोपरे-गुडघ्यांचा काळपटपणा !

त्वचेचे सौंदर्य वाढवायचयं मग टाळा या 6 चुका!


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Sourece  - 10 home remedies to get rid of dark inner thighs

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>