Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ही ’6′लक्षणं देतात बाळाच्या शरीरातील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे संकेत !

$
0
0

मोठ्यांप्रमाणेच एक वर्षाखालील अर्भकांमध्येदेखील व्हिटामिन-डी ची कमतरता असू शकते.बाळाला दररोज पाच मायक्रोग्रॅम विटामिन डी ची गरज असते.व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे बाळाच्या हाडांचा विकास कमी होतो.

मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या पिडीएट्रीक विभागाचे हेड डॉ.मुकेश अग्रवाल यांच्या मते विटामिन-डी ची कमतरता असणा-या अर्भकांवर उपचार करण्यासाठी व्हिटॅमिन-डी चा एक डोस त्यांना तोंडावाटे देण्यात येतो.त्यानंतर तीन आठवडयांनी त्याच्या शरीरात हे औषध किती प्रमाणात शोषले गेले आहे हे तपासण्यासाठी पुन्हा एक्स-रे काढण्यात येतो.

डॉ.अग्रवाल यांनी दिलेल्या माहीतीनुसार व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे बाळाच्या शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस च्या कमी शोषणामुळे मुडदूस हा विकार होऊ शकतो.मुडदूस हा विकार सहा ते छत्तिस महीन्यांच्या बाळांमध्ये अधिक प्रमाणात आढळणारा विकार आहे.

डॉ.अग्रवाल यांच्या सल्यानूसार अर्भकामध्ये पुढील लक्षणे आढळल्यास त्यांच्यामध्ये विटामिन डी चा अभाव असण्याची अधिक शक्यता आहे-

१. हाडांमध्ये विकृती असणे-

ज्या अर्भकांच्या पायांमध्ये बाक असतो त्यांच्यामध्ये विटामिन-डी चा अभाव असतो.तसेच त्या अर्भकांच्या पाठीचा कणा देखील सरळ नसतो.विटामिन-डी च्या कमतरतेमुळे त्यांच्या हाडांचा विकास व वाढ होऊ शकत नाही.

२. बाळाच्या टाळू मध्ये खळगा असतो-

जन्मानंतर एकोणीस महीन्यांच्या आत बाळाच्या कवठीच्या हाडांचा विकास होतो किंवा त्यांची टाळू भरुन निघते.मात्र बाळाला विटामिन-डी च्या अभावामुळे मुडदूस झाल्यास त्याची टाळू भरुन निघण्याच्या प्रकियेली विलंब होतो.अशा अर्भकांच्या डोक्याला स्पर्श केल्यास कवठीच्या हाडांचा विकास न झाल्याने व टाळू भरुन न निघाल्याने त्यांचे डोके मऊ लागते.

३. स्नायू कमकुवत असतात व त्यात वेदना होतात-

मुडदूस झाल्यामुळे अशी मुले त्यांच्या ठराविक वाढीनंतर देखील स्नायूंमध्ये वेदना होत असल्याने नीट रांगू किंवा बसू शकत नाहीत.त्याचप्रमाणे त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे  व स्वत:च्या शरीराचा तोल सांभाळणे देखील कठीण होते.त्यामुळे अशी मुले अधिक रागीट व चिडचिडी होतात. जाणून घ्या लहान मुलांना सुवर्ण भस्म देण्याचे आरोग्यदायी फायदे !

४. वारंवार इनफेक्शन होते-

डॉ.अग्रवाल यांच्या मते विटामिन डी च्या अभावामुळे अशा मुलांना वारंवार इनफेक्शन होते.जर तुमच्या बाळाला सतत सर्दी-खोकला किंवा ताप येत असेल तर त्याच्या शरीरात विटामिन डीे चा अभाव आहे का हे तपासण्यासाठी त्याच्या डॉक्टरांकडे एक्स-रे काढण्यासाठी सल्ला जरुर घ्या. हे नक्की वाचा हिंग – लहान मुलांमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय !

५. Rachitic Rosary-

आधी सांगितल्याप्रमाणे हाडांमधील विकृती हे अर्भकामध्ये विटामिन डी ची कमतरता असल्याचे एक लक्षण आहे.जर तुमच्या बाळाच्या छातीच्या बरगड्या बाहेर आल्यासारख्या वाटत असतील तर याला वैद्यकीय भाषेत Rachitic Rosary असे म्हणतात.ही समस्या विटामिन डी च्या अभावामुळे बाळामध्ये आढळते. हे नक्की वाचा मुलांच्या आहारातील या ’10′ अ‍ॅलर्जींना वेळीच ओळखा

६. बाळाचा विकास होण्यास वेळ लागतो-

विटामिन-डी च्या कमतरतेमुळे किंवा मुडदूस झाल्यामुळे बाळाच्या संपुर्ण विकासावर विपरित परिणाम होतो.जर तुमचे बाळ स्वत:चे वजन नीट सांभाळण्यास सक्षम नसेल अथवा त्याच्या पायांवर सूज दिसत असेल तर सावध रहा याचे कारण त्याच्यामधील विटामिन डीची असलेली कमतरता देखील असू सकते. जाणून घ्या बाळाला मांसाहार भरवताना या ‘७’ गोष्टींची काळजी घ्या !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>