Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

त्वचेच्या रंगानुसार कशी निवडाल लिपस्टिकची शेड !

$
0
0

आजकाल कॉलेजमधल्या तरूणी असोत किंवा कॉरपोरेटमध्ये वावरणार्‍या मुली.. प्रत्येकजण किमान मेकअपमध्ये करून बाहेर पडतेच. डोळ्यांना आयलायनर किंवा काजळ, ओठांना लिपस्टिक आणि चेहर्‍याला फाऊंडेशन, पावडर असा कमीत कमी मेकअप नियमित केला जातो. डोळ्यांचा किंवा ओठांचा यापैकी किमान एक ठळक मेकअप केला जातो. त्यामुळे जर तुम्ही रोज लिपस्टिक लावून बाहेर पडणार असाल तर ती लिपस्टिक चांगल्या दर्जाची, उत्तम ब्रॅन्डची असणं जितके महत्त्वाचे आहे. तितकीच ती तुमच्या चेहर्‍याला, त्वचेला मिळतीजुळती असणंदेखील गरजेचे आहे.

मग स्वतःच्या चेहर्‍याला, त्वचेला मिळतीजुळती लिपस्टिक आणि रंग कसा निवडावा याकरिता ALPS Group च्या Executive Director आणि ब्युटी एक्सपर्ट इशिका तनेजा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

  • गोरी त्वचा - गोर्‍यापान मुलींवर अनेक रंग खुलून दिसतात. तुमचा पाऊट अधिक सुंदर करायचा असेल तर बबलगम पिंक, कोरल, पीच, लाल किंवा ऑरेन्ज / नारंगी रंगाची लिपस्टिक निवडा. जर तुम्ही डोळ्यांनाही मेकअप करत असाल तर त्या रंगांनुसार सर्वसाधारणपणे लिपस्टिकचाही रंग निवडा.
  • कृष्णवर्णीय - यंदाच्या हिवाळ्यात तुमच्या ब्युटी किटमध्ये  मॅट स्वरूपाच्या लिपस्टीक ठेवा. थोड्या डार्क पण आकर्षित करणारे रंग निवडा. यामध्ये ब्राऊन, बर्गंडी, कॉफी, ऑक्सब्लड अशा डोळ्यांना आकर्षित करणार्‍या रंगांची निवड करा. डोळ्यांच्या मेकअप प्रमाणे लिपस्टिक निवडणार असणार तर पिंक, वॉटरमेलन पिंक अशा रंगांची निवड करा.
  • सावळा (Dusky skin) - अशा त्वचेच्या मुलींनी ब्राईट रंग निवडावेत. याकरिता बर्न्ट ऑरेंज, पिंक (fuchsia pink) या रंगाची निवड करा. डोळ्यांना प्रखर मेकअप असेल ओठांना मोकळे ठेवा.
  • गहूवर्णीय (Wheatish) - सॅलमॉन पिंक, हॉट पिंक , राईप ऑरेन्ज असे रंग ओठांचे सौंदर्य खुलवतात. पण तुम्हांला सौम्य स्वरूपाचा मेकअप ठेवायचा असेल तर कोरल किंवा लाईट पिंक रंग ठेवा.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>