लॉबस्टर किंवा झिंगा या सीफूडमध्ये मिनरल्स आणि व्हिटामिन घटक मुबलक असतात.लॉबस्टर चवीला अतिशय चविष्ट व आरोग्यासाठी उत्तम असतात. मात्र अनेकांच्या मनात या सीफूडसबाबत अनेक गैरसमज असतात.काही जण सांगतात लॉबस्टर खाणे ह्रदयासाठी चांगले आहे तर काही जण सांगतात उच्च रक्तदाबाचा विकार असणा-यांनी लॉबस्टर खाणे अयोग्य आहे. यासाठी याबाबत आमच्या तज्ञांचा हा खास सल्ला जाणून घेवूयात.
डायटीशियन आणि स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट दीपशीखा अग्रवाल यांच्या मते लॉबस्टरमधील मिनरल्स व पोषकमुल्ये शरीराला मिळण्यासाठी ते चांगल्या ठिकाणी विकत घेणे व योग्य पद्धतीने शिजवणे खुप गरजेचे अाहे.
लॉबस्टरमधील पोषक घटक-
प्रोटीन-
लॉबस्टर हा प्रोटीन मिळण्याचा एक उत्तम स्त्रोत असू शकतो.अॅथलीट लोकांना स्नायू बळकट करण्यासाठी लॉबस्टरमधील प्रोटीन अतिशय फायदेशीर ठरु शकतात.त्याचप्रमाणे लॉबस्टरमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्समुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. जाणून घ्या या ’8′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !
ओमेगा-३ फॅटी अॅसिड-
लॉबस्टरमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स पुरेश्या प्रमाणात असते.तसेच कोलेस्ट्रॉल देखील कमी प्रमाणात असल्याने ह्रदय विकारांमध्ये लॉबस्टर खाण्याचा चांगला फायदा होतो. लॉबस्टरमधील घटकांमुळे ह्रद्यांच्या धमन्यांचे कार्य सुधारते त्यामुळे ते खाणे ह्रदयासाठी हितकारक आहे. हे नक्की वाचा आठवड्यातून दोनदा मासे खा आणि हेल्दी रहा !
लो कॅलरीज-
लॉबस्टरमध्ये कमी कॅलरीज असल्याने लॉबस्टरच्या सेवनामुळे वजन कमी होते.१०० ग्रॅम लॉबस्टर मध्ये ८९ कॅलरीज असतात. लॉबस्टर खाल्याने शरीरातील ट्रायग्लिसराईडची पातळी नियंत्रित राहते.
झिंक-
PLOS ONE या सायंटिफिक जर्नल मधील संशोधनानुसार लॉबस्टर मध्ये झिंक योग्य आहे.झिंकच्या कमतरतेमुळे गोड खाण्याची इच्छा निर्माण होऊन वजन वाढते.मात्र लॉबस्टरच्या सेवनामुळे शरीरातील झिंकचे प्रमाण वाढते व गोड खाण्याची इच्छा कमी होते.तसेच झिंकच्या प्रमाणामुळे प्रतिकारशक्ती वाढते व मेंदूला चालना मिळते.
फॉस्फरस-
लॉबस्टर मधील फॉस्फरसच्या प्रमाणामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढते व दात आणि हाडे मजबूत होतात.लॉबस्टर खाल्याने अर्थ्रायटीस रुग्णांची स्नायू व सांधे दुखी कमी होते.फॉस्फरसमुळे किडनीचे कार्य देखील योग्य रितीने होते.
विटामिन बी १२-
आजकाल विटामिन बी १२ ची कमतरता असण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे.आहारात लॉबस्टरचा समावेश करुन तुम्ही तुमच्या शरीरातील विटामिनचे प्रमाण वाढवू शकता.विटामिन बी १२ च्या पुरेशा प्रमाणामुळे अल्झायमर आणि इतर न्यूरोलॉजिकल समस्या होण्याचा धोका कमी होतो.
लॉबस्टर खाण्याची योग्य पद्धत-
लॉबस्टरमधील सर्व पोषकघटक शरीराला मिळण्यासाठी ते योग्य पद्धतीने शिजवणे खुप गरजेचे आहे. उच्च तापमानावर स्टीम करणे,ग्रील करणे अथवा बेक करणे हे त्यांना शिजवण्याचे उत्तम पर्याय असू शकतात. त्याचप्रमाणे लॉबस्टर शिजवताना मीठ व तेलाचा वापर कमी प्रमाणात करा.डीप अथवा शॅलो फ्राय करुन लॉबस्टर खाणे आरोग्यासाठी हितकारक नाही.कारण त्यामुळे लॉबस्टर मध्ये तेल अधिक प्रमाणात शोषले जाते व कॅलरीज वाढतात.तसेच तळल्यामुळे लॉबस्टरमधील पोषकघटक कमी होतात.आरोग्यासाठी लॉबस्टचे सूप घेणे उत्तम पर्याय ठरु शकतो.मात्र सिझलर्स मधील रोल्स अथवा कटलेटच्या माध्यमातून लॉबस्टर खाणे आरेग्याच्या दृष्टीने अजिबात हितकारक नाही.लॉबस्टरमध्ये काही प्रमाणात टॉक्सिन्स असल्याने गर्भवती महीलांनी लॉबस्टर खाऊ नयेत.सीफूड मध्ये सोडीयमची पातळी अधिक असल्याने उच्च रक्तदाब व थायरॉईड असलेल्या रुग्णांना लॉबस्टर न खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock