Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या हेल्दी ट्विस्टने बनवा टेस्टी पालक पनीर !

$
0
0

पालेभाज्यांमध्ये अनेक पोषकद्रव्य असतात. पण लहानमुलांच्या गळी पालेभाज्या उतरवणं हे जिकरीचे काम असते. अनेकदा पालेभाज्यांचा लहान मुलांच्या आहारात समावेश करण्यासाठी त्याला हेल्दी टेस्टी ट्विस्ट देणं गरजेचं असते. पण लहानमुलांप्रमाणेच मोठ्यांच्या आहारात पालकचा समावेश करण्यासाठी त्याला थोडं टेस्टी बनवणं गरजेचे आहे.

पालक- पनीर हा असाच एक हेल्दी टेस्टी प्रकार आहे. पनीर मध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा लो कॅलरीयुक्त पदार्थ मधूमेहींनीदेखील खाणं फायदेशीर आहे. मग हेल्दी पद्धतीने टेस्टी पालकपनीर कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी Grow Fit सेंटरच्या चीफ न्युट्रीशनिस्ट ललिता सुब्रमण्यम यांनी सुचवलेली ही खास रेसिपी नक्की घरी बनवून पहा.

 पालक पनीर साठी लागणारे साहित्य -

1कप चिरलेला पनीर

एक पालकची जुडी

1 चिरलेला कांदा

1 टीस्पून चिरलेलं लसुण

1 टीस्पून चिरलेलं आलं

1 टीस्पून लाल तिखट

1 टीस्पून धणेपूड

½ टीस्पून जिरंपूड

¼ टीस्पून हळद

चिमुटभर कसूरी मेथी

1 टीस्पून गरम मसाला

2टीस्पून तेल

चिमुटभर हिंग

1 कपभर दूध / पाणी

1 टेबलस्पून दही

 

कृती -:

पालकाची  पानं खुडून वाहत्या नळाखाली स्वच्छ धुवा.

त्यानंतर 5 मिनिटं पानं गरम पाण्यात बुडवून लगेचच थंड किंवा साध्या पाण्यात बुडवून ठेवा.

असे केल्याने पालक  पनीरला हिरवागार रंग येतो.

भिजवलेली पानं पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यांत टाका.आणि त्याची पेस्ट बनवा.

गॅसवर कढईत तेल, जिरं, लसूण, आलं आणि कांद्याची फोडणी टाकून मिश्रण नीट हलवून घ्या.

त्यावर हिंग, मसाला, हळद, कसुरी मेथी,मीठ घालून मिश्रण तांबूस होऊ द्या.

पालक पनीर करताना गॅसची आच मंद न करता त्याच हाय फ्लेमवर पालकची प्युरी टाका.

त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातील प्युरी पाणी किंवा दूध मिसळून कढईमध्ये मिसळा.

त्यानंतर चिरलेले पनीरचे काप मिसळून मिश्रण 5-7 मिनिटं ( उकळी येईपर्यंत) शिजू द्यावे.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>