Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’9′कारणांमुळे बाळ करते रडारड !

$
0
0

कधीकधी तुमचे बाळ अचानक रडू लागते आणि काही केल्या शांतच होत नाही.अशा वेळी बाळाचे आई-बाबा त्याला शांत करण्याचे निरनिराळे मार्ग शोधत असतात.तुमच्या बाळाला शांत करण्यापुर्वी ते का रडत आहे याचे कारण समजून घेणे गरजेचे आहे.बाळ रडते कारण संवाद साधण्याचे त्याच्याकडे हे एकच माध्यम असते.याशिवाय रडून ते तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते.

बाळाचे रडणे ही एक नेहमीची क्रिया असली तरी कधीकधी मात्र त्याची एखादी अडचण देखील ते रडण्यातून सांगू शकते.बाळ कधीच विनाकारण रडत नाही.त्यामुळे तुमच्या बाळाच्या रडण्याकडे कधीच दुर्लक्ष करु नका.

यासाठी जाणून घ्या तुमचे बाळ कोणत्या कारणांमुळे रडू शकते-

१.बाळाला भूक लागली असेल तर ते रडते-

बाळाच्या रडण्यामागे त्याला भूक लागली आहे हे कारण अगदी स्वाभाविक असू शकते.आपण पहातो की तान्ह बाळ संपूर्ण दिवस एकतर झोपलेले असते किंवा दूध पित असते.त्यामुळे जेव्हा तुमचे बाळ रडू लागेल तेव्हा प्रथम त्याला दूध भरवा.पोट रिकामे असल्यास ते जोरात रडण्याची शक्यता असते.पण नेहमी ते भूक लागली म्हणूनच रडेल असे देखील नाही.

२.डायपर बदलण्याची वेळ झाली की ते रडते-

दूध प्यायल्यानंतर,खेळताना अचानक जर तुमचे बाळ रडायला लागले तर प्रथम त्याचा डायपर चेक करा.ओल्या डायपर मुळे त्याला अस्वस्थ वाटू लागते आणि ते रडू लागते.त्यामुळे वेळ न काढता तो ताबडतोब त्याचा डायपर बदला.ओल्या डायपरमुळे त्याच्या नाजूक त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते.जर डायपर रोज वेळच्यावेळी नाही बदलले नाही तर तुमच्या बाळाला रॅशेस येण्याची शक्यता असते. हे नक्की वाचा बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय

३.पोटात दुखत असेल तर बाळ रडते-

पोटात दुखत असल्याच तुमचे बाळ रडून हैराण होऊ शकते.अनेकदा काही बाळांमध्ये जन्माच्या पहिल्या महीन्या पासून चार ते पाच महीन्यांपर्यंत ही समस्या जाणवते.त्यानंतर हळूहळू तुमच्या तानूल्याचा हा त्रास आपेआप कमी होतो.यासाठी स्तनपानानंतर तुमच्या बाळाला पाठीवर घेऊन ढेकर काढण्यास मदत करा.

४.जर तुमच्या बाळाला अस्वस्थ वाटत असेल तर ते रडते-

काही लोकांना असे वाटते की बाळाला कपडे अथवा दुपट््यात गंुडाळून ठेवले की त्याला अाईच्या पोटात असल्याप्रमाणे सुरक्षित व उबदार वाटते.त्यामुळे ते सतत बाळाला कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात.मात्र लक्षात ठेवा तुमच्या बाळाला याच्या अगदी उलट वातावरण गरजेचे असते.बाळाला आराम आणि  स्वस्थ वाटेल असे वातावरण आवश्यक असते.तुम्ही सर्व काही करुन देखील जर तुमचे बाळ शांत होत नसेल तर त्यांच्या अंगावर गुंडाळलेले सर्व कपडे काढून टाका.यामुळे आराम मिळाल्याने तुमचे बाळ लगेच शांत होईल.मात्र कधीकधी वातावरण अती थंड असल्यास हीच परिस्थिती अगदी उलट देखील असू शकते.त्यामुळे  ऋतूमानानूसार तुमच्या बाळाच्या पेहरावामध्ये योग्य ते बदल करा.

५.जर बाळाचे नाक सर्दीमुळे चोंदत असेल तर-

ज्याप्रमाणे सर्दी-खोकल्यामध्ये आपल्याला त्रास होतो त्याप्रमाणे तुमच्या तानुल्यालाही त्रास होऊ शकतो.नेहमी प्रमाणे श्वास घेता न आल्यामुळे त्याची चिडचिड होते व या गोष्टीला प्रतिकार करण्यासाठी ते रडू लागते.यासाठी Paediatric Vasal Drops च्या सहाय्याने त्याच्या नाकपुड्या मोकळ्या करा ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास मदत होईल.

६.जर तुमच्या बाळाला झोप आली असेल तर ते रडते-

तान्हा बाळाला स्वत:हून झोपणे कठीण जाते.जर तुमचे बाळ रडून हैराण झाले असेल तर त्याला जवळ घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करा.

७.जर तुमच्या बाळाला दूधाचे दात येत असतील तर ते रडते-

बाळाचे दात येणे ही आईसाठी एक परिक्षाच असू शकते.जर तुमचे बाळ वारंवार रडत असेल तर त्याच्या हिरड्या तपासून बघा.जर हिरड्यांवर नाजूक दात येत आहेत असे तुम्हाला जाणवले तर तुमच्या बाळाच्या हिरडयांना मसाज करा किंवा त्यांना तिथींग टॉय चावण्यास द्या.

८.त्याला निवांत रहावेसे वाटते तेव्हा  ते रडू लागते-

त्याला इतरांनी वारंवार घेणे किंवा त्याचाशी सतत खेळत बसल्याने त्याला कंटाळा येण्याची शक्यता असते.गर्दीची ठिकाणे,कर्ण कर्कश आवाज किंवा जास्त प्रमाणात केलेला प्रवास या सर्व गोष्टींमुळे देखील तुमचे बाळ कंटाळू शकते.जर असे तुमच्या लक्षात आले तर त्याला सर्वांपासून दूर अथवा बाळाच्या खोलीमध्ये घेऊन जा.यामुळे तुमचे बाळ परत आनंदी होईल. जाणून घ्या गर्भात असताना बाळ करते या ’8′ इंटरेस्टिंग गोष्टी !

९.एकटेपणा जाणवला की बाळ रडू लागते-

जवळपास अनेक लक्ष देणारी माणसे असली तरी तुमच्या बाळाला फक्त तुमच्यासोबत अधिक सुरक्षित वाटते.जर तुम्ही जास्त वेळ त्याच्यापासून दूर राहीलात तर त्याला असुरक्षित वाटून ते रडू लागते.तुम्ही जरी काही महत्वाचे काम करीत असलात तरी अशा वेळी तुम्ही तुमच्या बाळापेक्षा इतर कुठल्याही गोष्टींना महत्व देऊ नका.त्याला ताबडतोब जवळ घ्या त्यामुळे ते आपोआप शांत होईल.

तुमच्या बाळाच्या रडण्यातला गंभीरपणा कसा ओळखाल?

जर तुमचे बाळ स्वस्थ असेल,त्याला शी-शू ची काही समस्या नसेल,छान हसत-खेळत असेल आणि अशा परिस्थितीत देखील जर ते अचानक रडू लागले तर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते.असे झाल्यास त्वरीत तुमच्या Paediatrician ची अपॉन्टमेंन्ट घ्या व तपासणी साठी त्वरीत त्यांच्याकडे जा.

जाणून घ्या काय असू शकतात यामागील कारणे-

  • ताप असणे
  • त्यांच्या एखाद्या अवयवांमध्ये वेदना असू शकते.तुमचे बाळ मोठे असेल तर ते तो अवयव तुम्हाला सारखेसारखे दाखवून रडते.
  • कदाचित त्याच्या पोटामध्ये एखादी गंभीर समस्या असू शकते
  • पुरळ अथवा अॅलर्जी येत असू शकते
  • बाळ रडण्यासोबत उलटी करत असेल

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>