फ्लॉवरला उग्र वास असल्याने त्याची भाजीऐवजी थेट पुलाव किंवा बिर्याणीमध्ये केली समावेश अधिक केला जातो. पण केवळ फ्लॉवर राईसही टेस्टी पर्याय आहे. कदाचित माझ्याप्रमाणेच तुम्हीही फ्ल्वॉवर राईस हे पहिल्यांदाच ऐकलं असेल तर हा हेल्दी टेस्टी भाजीचा प्रकार तुम्ही बनवून ठेऊ शकता आणि खायच्या वेळी काढू शकता. यामुळेच झटपट तयार होणारा हा पदार्थ तुम्हीही घरच्या घरी नक्की करून बघा !!
- फ्लॉवर राईससाठी लागणारे साहित्य -
2 कप चिरलेला फ्लॉवर
1 टीस्पून चिरलेलं आलं
1 टीस्पून चिरलेलं लसूण
1/2 कप किसलेलं गाजर
1/2 कप वाफवलेले मक्याचे दाणे
½ कप मटार
2 टेबलस्पून चिरलेला कांदा
1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
1/8 टीस्पून गरम मसाला
1/8 टीस्पून हळद
1/8टीस्पून जिरं पूड
1टेबलस्पून लिंबाचा रस
चिरलेली कोथिंबीर
चवीपुरता मीठ
कृती –
- फ्लॉवर राईस साठी फ्लॉवर अगदी बारीक – बारीक स्वरूपात कापा. (तांदळाचा दाणा आणि फ्ल्वॉवरचे काप साधारणपणे समान आकाराचेच दिसतील). याऐवजी तुम्ही मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्येही ते चिरू किंवा बारीक करू शकता.
- चमचाभर तेलामध्ये कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट परता. कांदा मऊ होईपर्यंत मिश्रण हलवत रहा.
- मंद आचेवरच 1/2 कप किसलेलं गाजर, 1/2 कप वाफवलेले मक्याचे दाणे व ½ कप मटार मिसळून या भाज्या शिजायला ठेवा.
- त्यानंतर बारीक चिरलेला फ्लॉवर त्यामध्ये मिसळा. यावर हळद, गरम मसाला, जिरंपूड मिसळा. सारे मिश्रण नीट एकत्र करा.
- फ्लॉवरला थोडा शिजायला वेळ द्या. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करा. त्यामध्ये मीठ व लिंबाचा रस मिसळून मिश्रण एकजीव करा.
- गरमागरम फ्ल्वॉवर राईस खाणार असाल तर त्यावर चिरलेली कोथिंबीर पसरवा.
- नाश्त्याला, साईड डिश म्हणून किंवा अगदी चपातीसोबत तुम्ही फ्लॉवर राईसचा आस्वाद घेऊ शकता.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock