Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पॉर्नमुव्हीमूळे धोक्यात येते पुरुषांचे सेक्सलाईफ

$
0
0

पॉन व्हिडीओ बघणे हे धोक्याचे नसले तरी ते पाहण्याची सवय मात्र नक्कीच हानीकारक ठरु शकते.काही मुले अगदी लहानपणीच नकळत असे व्हिडीओ पाहतात आणि मग मात्र त्यांना पॉर्न पाहण्याची सवयच लागते.खरंतर जोडीदाराबरोबर खरा सेक्सचा आनंद घेण्यापेक्षा लोक पॉन बघणे का पसंद करतात हे एक आर्श्चयच आहे.

कदाचित काही जणांना असे वाटत असते की सेक्स करण्यापुर्वी पॉर्न बघितल्यामुळे सेक्ससाठी उत्तेजित होण्यास मदत होते.मात्र असे निर्दशनास आले आहे की असे करण्याची सवय झालेल्या लोकांना पॉर्न व्हिडीओ पाहिल्याशिवाय सेक्स करणे शक्यच होत नाही ज्यामुळे पुढे त्यांचे सेक्सलाईफ  देखील धोक्यात येते.पॉर्नमुळे मिळणारी उत्तेजना ही भावनाशून्य असते.त्यामुळे पॉर्न पाहण्याची सवय तुमच्या सेक्सलाईफवर विपरित परिणाम करु शकते.

या चार कारणांमुळे पॉर्न पाहणा-या पुरुषांचे सेक्सलाईफ धोक्यात येते.

१.पॉर्नमूळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून काल्पनिक अपेक्षा करु लागता-

जे लोक सतत पॉर्न बघतात ते सेक्स करताना त्याच्या जोडीदाराकडूनही तशीच अपेक्षा करु लागतात.पॉर्न फिल्मस या काल्पनिक किंवा स्क्रिप्टेड असतात.त्यामध्ये काम करण्या-या महिला कलाकारांनी मेकअप व काही सर्जरी केलेल्या असतात.ज्यामुळे त्या अधिक आकर्षक व सेक्सी दिसतात.पण पॉर्न पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या स्त्री जोडीदार कडून अशा आकर्षक दिसण्याची अपेक्षा करता.त्यावेळी ती कितीही सुंदर असली तरी पॉर्नस्टार्स प्रमाणे आकर्षक व सेक्सी दिसत नाही व तुमची निराशा होते.ज्याचा परिणाम थेट तुमच्या सेक्स लाईफवर पडतो.

२.इंटीमेसी लेवल कमी होते-

सेक्सच्या ख-या आनंदासाठी दोघांनीही एकत्र येणे गरजेचे असते. मात्र पॉर्न सेक्स प्रमाणे आभासी सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भावनिक रित्या एकत्र येण्यास कमी पडता.पॉर्नप्रमाणे तुम्ही तिच्याशी फक्त शारीरिक संबंंध जुळवण्याचा प्रयत्न करता ज्यामध्ये भावनांचा सबंध येत नाही.स्त्रीयांसाठी मात्र सेक्स करताना भावनिक मिलन खुप महत्वाचे असते.असे न झाल्याने पुढे तुमचे सेक्सलाईफ बिघडत जाते.

३.जोडीदारासोबत भावनिक जिव्हाळा कमी असणे-

ब-याचदा पॉर्न बघणारे पुरुष त्याच्या जोडीदाराकडून त्या फिल्मप्रमाणे अग्रेसिव्ह व उत्तेजित सेक्सची अपेक्षा करतात.मात्र महिलांना अशाप्र्कारचा सेक्स करणे आवडत नाही.अशा प्रकारच्या सेक्समध्ये एकमेकांबद्दल भावनिक जिव्हाळा निर्माण न झाल्याने दोघांनाही त्यातून मिळणारा खरा आनंद घेता येत नाही.

४.जोडीदाराच्या ऑर्गेझमचा विचार न करणे-

पॉर्नच्या आहारी गेलेले पुरुष फक्त सेक्समधील स्वत:च्या आनंदाचा विचार करतात.मात्र सेक्स ही दोघांना आनंद देणारी गोष्ट असल्याने तुमच्या स्त्री जोडीदाराला सेक्समधला पूर्ण आनंद उपभोगता येत नाही व त्यामुळे याचा तुमच्या सेक्सलाईफवर वाईट परिणाम होतो.

पॉर्न बघणे हे चूकीचे नाही मात्र त्याच्या अतिआहारी जाणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते.त्या ऐवजी सेक्ससाठी उत्तेजना देणारे इतर अनेक चांगले उपाय आहेत त्याचा उपयोग करा.पॉर्न बघणे थांबवा व तुमच्या जोडीदाराकडे अधिक लक्ष द्या.याचा तुमच्या सेक्सलाईफ वर नक्कीच चांगला परिणाम दिसू लागेल. जाणून घ्या एकत्र ऑर्गेझम मिळवण्याच्या 5 खास टीप्स !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>