भारतात दरवर्षी ३७.७ दशलक्ष माणसे दूषित पाण्यामुळे होण्या-या आजारांचे बळी ठरतात.या दूषित पाण्यामुळे होणारे काही आजार अॅन्टीबायोटीक्स व इतर औषधांमुळे बरे होतात.पण या आजारांना टाळण्यासाठी काळजी घेणे हाच उत्तम मार्ग असू शकतो.
दूषित पाण्यामध्ये आर्सेनिक आणि कॅडमियम,झिंक आणि मर्क्युरी (पारा) अशा जड धातूंचे घटक असतात.ज्यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रियेमध्ये व्यत्यय,मज्जासंस्था व किडनी च्या कार्याचे नुकसान होते.अशा पाण्याच्या सेवनामुळे कोलन,लिव्हर,किडनी व फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे दूषित पाण्यात आर्सिनिक ०.०१ मिग्रॅ/ली.प्रमाणात आढळते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या गाईडलाईन नुसार पश्चिम बंगाल,बिहार,उत्तर प्रदेश,झारखंड आणि छत्तीसगड या ठिकाणी तर आर्सिनिकचे प्रमाण ०.०५ मिग्रॅ/ली इतके अधिक आढळून आले आहे.शास्त्रज्ञांच्या मते पाण्यातील आर्सेनिकच्या प्रमाणामुळे रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने H1N1 स्वाईन फ्लू देखील संसर्ग होण्याचा धोका असतो.या पाण्यात सामान्यपणे धूळीचे कण,वाळू,चिकणमाती,गंज आणि पाण्यात विरघळणारे सोडीयम क्लोराईड हे अशुद्ध घटक आढळतात.
यामुळे मग सहाजिकच सुरक्षित पाणी पिण्यासाठी पाणी नेमके स्वच्छ कसे करावे हा प्रश्न निर्माण होतो?
भारतात थेट नळाचे पाणी पिणे अजिबात सुरक्षित नाही.महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे अनेक शहरात चांगले पाणी पुरवण्यात येत असले तरी ते पिण्यायोग्य नाही.त्यामुळे दुषित पाण्याचा धोका टाळण्यासाठी पाणी पिण्यापुर्वी ते स्वच्छ करणे गरजेचे आहे.
# उकळलेले पाणी-
पाणी स्वच्छ करण्याचा सोपा व परिणामकारक उपाय म्हणजे पाणी उकळून प्या.
१.पाणी गढूळ असल्यास एका स्वच्छ फडक्याने ते गाळून घ्या.
२.पाणी कमीतकमी एक मिनीट चांगले उकळून घ्या.जर तुम्ही जमिनीपासून ६,५०० फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर राहत असाल तर पाणी तीन मिनीटे उकळणे गरजेचे आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननुसार पाणी एक मिनीट उकळणे म्हणजे त्याला पूर्ण उकळी येईपर्यंत उकळणे असा होतो.
३.त्यानंतर ते पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्यावे मात्र ते थंड करण्यासाठी कधीही बर्फाचा वापर करु नये.
४.असे पाणी चांगल्या स्वच्छ भांड्यामध्ये ते ओतून ठेवावे.
उकळलेल्या पाण्यामुळे पाण्यातील दूषित घटक कमी होत असले तरी एका संशोधनानुसार पाणी उकळल्यानंतरही काही प्रमाणात पिण्यायोग्य होतेच असे नाही. विशेषत: विहीरीचे पाणी उकळल्यास त्यातील आर्सेनिक व इतर धातूचे घटक कमी होत नाहीत.त्याचप्रमाणे नळाच्या पाण्यातील धातूंचे घटक देखील उकळल्यानंतर नष्ट होत नाहीत.
एका संशोधनानुसार दिल्लीमध्ये अशा पाण्यामध्ये आर्सेनिकचे प्रमाण प्रति दशलक्ष ०.०१ इतके अधिक आढळले आहे.या संशोधनाच्या अहवालानूसार या पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण अधिक असण्याचे कारण जमिनीखालील पाणी मिसळणे किंवा तुटलेल्या,गळक्या जलमार्गातून मिसळणारी अशुद्धता असू शकते.आर्सेनिकमधील विषामुळे डोकेदुखी,मळमळ व छातीत दुखणे या समस्या निर्माण होतात.कालांतराने यामुळे निरनिराळे कर्करोग,स्ट्रोकक व मधूमेह होण्याचा देखील धोका निर्माण होतो.
# रासायनिक जंतूनाशकांचा वापर-
सामान्यत: क्लोरीन, पोटॅशियम परमॅग्नेट, आयोडीन आणि तूरटी यांचा पाणी शुद्ध करण्यासाठी वापर करण्यात येतो.यामुळे सर्व साथीच्या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यास मदत होते.क्लोरीन व शुधू टॅबलेट मुळे भांड्यांमधील रोगसंयुगाचा नाश होतो.मात्र ही रसायने आर्सेनिक व इतर धातूंना नष्ट करण्यासाठी प्रभावी ठरत नाहीत.
यासाठी २० लीटर पाण्यामध्ये एक शुधू टॅबलेट टाका.त्यानंतर तीस मिनीटांनी ते पाणी पिण्यासाठी योग्य होते.ही गोळी विरघळण्यासाठी एक ते दोन मिनीटे लागतात.
सामान्य तापमानातील एक लीटर पाण्यामध्ये एक आयोडीनची गोळी टाका.मात्र यामुळे एक समस्या होऊ शकते कदाचित या पाण्याची चव तुम्हाला आवडू शकत नाही.त्याचप्रमाणे हे पाणी थायरॉईड समस्या किंवा गर्भवती महिलांसाठी हितकारक देखील नाही.
अॅल्युमिनीयम पोटॅशियम सल्फेट किंवा पोटॅश तुरटीचा वापर गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी करण्यात येतो.यासाठी असे पाणी मोठ्या भांड्यांमध्ये असावे.तुरटी फिरवल्यानंतर गाळ तळाला जमा होण्यासाठी एक तास वाट पाहवी लागते.त्यानंतर स्वच्छ पाणी दुस-या चांगल्या भांड्यात काढून ठेवावे. या स्वच्छ पाण्याला निर्जतूंक करण्यासाठी क्लोरीन अथवा आयोडीन टॅबलेटचा वापर जरुर करावा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या सुचनेनूसार या पद्धतीचा वापर घरगुती पिण्याच्या पाण्यात कमी केला जातो.कारण त्यासाठी प्रशिक्षित कर्मचा-यांची आवश्यक्ता असते.
# बाटलीबंद पाण्याचा वापर-
सीलबंद बाटलीतील पाणी पिणे हा नेहमीच रोगमुक्त राहण्याचा सुरक्षित व सोपा मार्ग वाटू शकतो
ट्रॉम्बेतील भाभा एटोमिक रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी मुंबईतील १८ वेगवेगळ्या बाटलीबंद पाणी विकणा-या ब्रॅन्डचे नमुने तपासले.तेव्हा त्यांना त्यामध्ये निर्जंतूकीकरण,ब्रोमाईडचे प्रमाण एब्लूएचओने प्रमाणित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आढळले.
शिवाय यासाठी जमिनीखालील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने त्यामध्ये पाण्यामधील धातूंमधील विष असण्याचे प्रमाण अधिक असते.एवढेच नाही तर २००३ साली दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स एन्ड इनवॉर्नमेंटने यामध्ये किटकनाशके असल्याचे सिद्ध केले आहे.त्यामुळे जर तुम्ही दिर्घकाळ या पाण्यावर अवलंबून राहीलात तर तुम्हाला साथीचे रोग व धातूमधून विशबाधा होण्याची शक्यता आहे.मात्र जर घरी वॉटर प्युरिफायर नसेल किंवा तुम्ही घराबाहेर असाल तर तुम्हाला बाटलीबंद पाण्याशिवाय पर्यायच नसतो. जाणून घ्या पिण्याच्या पाण्यासाठी करा या ’5′ आरोग्यदायी आणि आकर्षक बाटल्यांची निवड !
बाटलीबंद पाणी पिण्यासाठी काय कराल-
१.लोकल मॅन्युफॅक्चर वॉटर बॉटलचा वापर कधीही करु नका.असे निर्माते पाण्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काळजी घेत नाहीत त्यामुळे बिसलरी,किनले,एक्वाफिना अशा सुप्रसिद्ध ब्रॅन्डच्या पाण्याच्या बाटल्याचा वापर करा.अशा कंपन्या पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत योग्य सुरक्षा घेतात.
२.पाणी सिलबंद आहे का याची नीट दक्षता घ्या.
३.पाण्याच्या बाटली वरील मॅन्युफॅक्चरींग व एक्पायरी डेट जरुर पहा.
४.पाण्याची बाटली बाहेरुन देखील स्वच्छ आहे याची खात्री करुन घ्या.कारण आतील पाणी स्वच्छ असले पण बाटली बाहेरुन खराब झाली असेल तर ती निर्जंतूक असेल याची खात्री देता येत नाही.
५.पाण्याच्या बाटलीवर देण्यात आलेल्या सुचनांचे पालक करा.जसे की पाणी पिल्यानंतर रिकामी बाटली क्रश करा नाहीतर त्या बाटलीचा पुर्नवापर केल्या जाण्याचा धोका असतो.
# घरामध्ये फिल्टर अथवा प्युरिफायरचा वापर करणे-
घरातील पाणी स्वच्छ करण्यासाठी फिल्टर अथवा वॉटर प्युरिफायर वापरणे नेहमीच फायद्याचे ठरते.बाजारात अनेक प्रकारचे फिल्टरर्स अथवा वॉटर प्युरिफायरर्स उपलब्ध आहेत.
फिल्टर अथवा वॉटर प्युरिफायरचे कार्य-
१.पाण्यातील अतिरिक्त मीठ काढून टाकणे.
२.पाण्यातील धुळीचे कण व सुक्ष्म,अशुद्ध घटकांचा नाश करणे.
३.पाण्यात आवश्यक जीवनसत्वे व खनिजे उपस्थित ठेवणे.
फिल्टर अथवा प्युरिफायर पाण्यातील अशुद्ध घटक गाळून घेतात त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाणी उपलब्ध होते.मात्र सर्व फिल्टरर्समुळे पाण्यातील जंतू नष्ट होत नाहीत.प्युरिफायर मुळे फ्लोरिन,आर्सेनिक व इतर जड धातू नष्ट होतात. हे नक्की वाचा कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल
फिल्टर अथवा वॉटर प्युरिफायरमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो-
एक्टीव्ह कार्बन फिल्टर-
या पद्धतीमध्ये पाण्यात क्लोरीनयुक्त वायू सोडला जातो ज्यामुळे किटकनाशके,मृत वनस्पती,सुकलेली पाने गाळली जातात.अशा कार्बन फिल्टर्सनां जंतूंचा नाश करण्यासाठी आतून चांदीचे अस्तर लावण्यात येते.
बायोसॅन्ड फिल्टर-
असे फिल्टर धुळीचे कण आणि रोगजंतूचा नाश करुन एका वेळी १२ ते १८ लीटर पाणी फिल्टर करु शकतात.
आर ओ फिल्टर-
हे तंत्रज्ञान पाण्यातील हानिकारक खनिजे व रोगजंतूचे विर्सजन करते.यात पाण्यातील खनिजे नष्ट झाल्याने पाण्याची चव सुधारते.मात्र काही उत्पादनातील दोष व झीज यामुळे पाणी १०० टक्के निर्जंतूक होईलच असे नाही.
त्याचप्रमाणे आरओ फिल्टरर्समुळ पाण्यातील शरीरासाठी आवश्यक असणारी खनिजे देखील नष्ट केली जातात. जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे !
लॉंग एक्सचेंज रेजींस फिल्टर-
जड पाण्यातील खनिजे व मीठ कमी करुन पाणी पिण्यायोग्य सौम्य करतात.
युवी फिल्टर-
यामध्ये अतिनील किरणे पाण्यातील हानिकारक रोगजनकांच्या आत प्रवेश करुन त्यांच्यातील डीएनए चा नाश करतात.
अल्टा व्हायलेट प्युरिफिकेशनचा उपयोग-
- ते केमिकल फ्री असते.
- पाण्याला केमिकलची चव अथवा गंध येत नाही.
- अतिशय प्रभावीपणे पाण्यातील रोगजनकांचा नाश करतात.
या प्युरिफायर मध्ये काही काळाच्या वापरानंतर अडथळा निर्माण झाल्यास वारंवार युवी ब्लब बदलावा लागतो.असे असले तरी या तंत्रज्ञानामुळे पाणी १०० टक्के स्वच्छ होते.तसेच त्यातील धुळी कण,रसायने,चव,गंध व रंग काढून टाकली जातात.
यासाठीच ब-याच ब्रॅन्डमध्ये आरो व युवी अशा दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock