Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं

$
0
0

आनंदी असता असता दुस-या क्षणी अचानक दु:खी होण्याच्या भावनेला मूडस्वींग असे म्हणतात.तुमच्यापैकी अनेकांनी ब-याचदा या अवस्थेचा अनूभव घेतला असू शकतो.

मूडस्वींग आणि त्याचे धोकादायक परिणाम याविषयी सेल्विया प्लॅथ या अमेरिकेतील कवी,कादंबरीकार अणि लघुकथा लेखक यांनी सांगितले की त्यांना कधी कधी अचानक खुप आनंदी व अचानक खुप दु:खी झाल्याचा अनूभव येतो.अचानक अनूभवाला येणा-या या दोन्ही अवस्थांमुळे त्यांना वेड लागेल अशी भिती वाटते.

मूड ही मनाची एक भावनिक अवस्था आहे.तुमच्या आयुष्यात घडणा-या घडामोडींनूसार तुमच्या मनात निरनिराळ्या भावना उत्पन्न होतात.जेव्हा तुम्ही अत्यंत आनंदी असता त्यावेळी तुम्ही आयुष्यातील दु:खद घटना विसरुन जाता आणि अत्यंत दु:खी असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही सकारात्मक गोष्ट घडत नाही असे वाटते.

मूडस्वींग होणे ही वाईट गोष्ट नाही.तुमच्या मनात अथवा बाहेर घडणा-या ब-यावाईट गोष्टींना तुम्ही कसा प्रतिसाद देता त्यावर ही अवस्था अवलबूंन आहे.मात्र अचानक मूडस्वींग होण्याचा तुमच्या जीवनावर विपरित परिणाम होऊ शकतो.त्यामुळे तुम्ही मनोविकाराचे बळी ठरु शकता.

मूड नेमका का बदलतो याचे मूळ कारण अज्ञात आहे.शास्त्रज्ञांच्या मते मूडस्वींग मेंदू मधील रासायनिक प्रतिक्रिया किंवा रासायनिक असमतोला मुळे होत असावा.मूडस्वींग मध्ये चिंता-काळजी,व्यक्तिमत्व संपुर्ण बदलणे,गोंधळ होणे,तर्कज्ञान चुकणे,जलद संभाषण करणे ,एकाग्रता व आकलन शक्ती कमी होणे,अल्कोहोलच्या आहारी जाणे अशी लक्षणे दिसू शकतात.

मूडस्वींगची कारणे-

१.हॉर्मोनल बदल-

टीन एज मधील मुलांमध्ये मूडस्वींग ची समस्या अधिक जाणवते.या वयातील मुले अचानक खुप चिडतात,डिप्रेशन मध्ये जातात.या वयातील मुले त्यांच्या पालकांवर देखील वारंवार रागावतात.टीनएज मध्ये मुलांमधील सेक्स हॉर्मोन्सची पातळी वाढत असते त्यामुळे त्यांच्यामध्ये हे बदल होऊ शकतात.टीनएज मधील मुली व पौढ महिला यांच्या पीएमएस मुळे देखील त्यांचा मूड बदलू शकतो.एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन च्या पातळीत होणा-या तीव्र चढ-उतारांचा देखील हा परिणाम असू शकतो.

गरोदरपणात विशेषत: पहिल्या व तिस-या तिमाहीमध्ये महिलांमध्ये मूडस्वींग चे प्रमाण अधिक दिसून येते.गरोदरपणात होणारे हॉर्मोन्सच्या पातळीतील बदल,प्रेगन्सीबाबत उत्साह,थकवा,ताण-तणाव आणि एकूणच होणा-या शारीरिक व मानसिक बदलांचे हे एक कारण असू शकते.या अवस्थेत मूड सतत बदलत असल्याचा अनूभव अनेकजणींना येत असतो आणि हे खुपच स्वाभाविक असल्याने यात काळजी करण्याचे काहीच कारण नाहीत.

मेनोपॉजच्या अवस्थेत देखील महीलांना मूड वांरवार बदलत असल्याचा अनूभव येऊ शकतो.या अवस्थेत एस्ट्रोजनची पातळी कमी होत असल्याने हा त्रास जाणवतो.एका थेअरीनूसार एस्ट्रोजनची पातळी कमी झाल्याने झोपताना अंगामध्ये उष्णता निर्माण होऊन घाम येणे,रात्रीची झोपमोड झाल्याने मूडस्वींग होतो.दुस-या एका थेअरीनूसार आपल्या जीवनात वयातील व प्रत्येक भूमिकेतील होणा-या बदलांमुळे मूड स्वींग होऊ शकतो.त्याचप्रमाणे आणखी एका थेएरी मध्ये याचे कारण एस्ट्रोजनच्या खालवण्या-या पातळीचा परिणाम हॉर्मोन्स व भावनांच्या नियंत्रणावर होतो ज्यामुळे मूड स्वींग होण्याची शक्यता असते असे सांगितले आहे. [1]

हॉर्मोन्सच्या बदलामुळे होणा-या मूडस्वींग वर उपचार सहज उपलब्ध आहेत.तुमच्या लक्षणानूसार तुमचे डॉक्टर याबाबत तुम्हाला औषधे देतात.तसेच समुपदेशन व मानसोपचारांचा याबाबत चांगला फायदा होऊ शकतो.

२.काही पदार्थ व औषधांचा दुष्परिणाम-

ड्रग्स घेणा-या लोकांमध्ये मूडस्वींगची लक्षणे अधिक आढळून येतात.नशेच्या आहारी गेल्याने जीवनातील समस्या सुटत नसून त्या अधिकच वाढतात.अंमली पदार्थांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतो.सरुवातीला नशेचा आनंद देणा-या या अंमली पदार्थांचे हळूहळू व्यसन लागते.त्यामुळे मेंदूलाही त्या पदार्थांची सवय लागते व त्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.याचा परिणाम तुमच्या आकलन स्मरण शक्तीवर होऊ शकतो,तसेच मेदूंवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते व निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. [2]

जर तुम्हाला अंमली पदार्थांचे व्यसन लागले असेल तर त्वरीत ते सोडवण्यासाठी योग्य ते उपचार करा.या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.यासाठी तुमच्या कुटूंबाचा व मित्रमंडळींचा आधार घ्या.योग्य व अचूक मार्गदर्शनासाठी तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी अजिबात लाज बाळगू नका.

त्याचप्रमाणे काही ठराविक औषधोपचारांमुळे देखील मूड स्वींग होण्याची समस्या निर्माण होते-

  • डिप्रेशन किंवा बायपोलर डिऑर्डर मध्ये घेण्यात येणा-या एन्टी डिप्रेशन च्या औषधांमुळे तुमचा मूड विचित्र पद्धतीने स्वींग होऊ शकतो.असे असल्यास तुमचे डॉक्टर तुमची औषधे बदलतात.
  • उच्चरक्तदाबावर घेण्यात येणा-या लीसीनोप्रील सारख्या औषधामुळे रक्तातील सोडीयमची पातळी कमी होते तर पोटॅशियमची पातळी वाढते.यामुळे काही लोकांना या समस्येत डिप्रेशन व थकवा येण्याची शक्यता वाढते. [3]
  • एका संशोधनानूसार स्टीमवास्टेटीन व प्रवास्टेटीन या चाचण्यांमध्ये मूडस्वींग होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नसला तरी काळजी घेणे नेहमीच योग्य ठरते. [4]
  • जेन्टामिसीन आणि सीप्रोफ्लोजॅसींकन सारख्या एन्टीबॉडीज मुळे मूडस्वींग होऊ शकतो.
  • एडीएडी(ADAD)वर केल्या जाणा-या उपचारांमधील रिटॅलिन या आणखी एका औषधामुळे देखील मूड बदलण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

३. डिप्रेशन आणि बायपोलर डिऑर्डर-

डिप्रेशन आणि बायपोलर डिऑर्डर या मनाच्या विकारांमध्ये मूड स्वींगची समस्या निर्माण होते. डिप्रेशन म्हणजे जेव्हा तुमच्या मनामध्ये तीव्र दु:ख,नैराश्य आणि उदासिनतेची भावना मनात निर्माण होतात.जीवनात एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्युमुळे,एखाद्या असाध्य आजाराने ग्रस्त असल्यामुळे,किंवा नोकरी गमावल्यामुळे मेंदूमध्ये रासायनिक असंतुलन निर्माण होऊन नैराश्य येते.

काही प्रमुख लक्षणे-

  • मुड बदलणे, उदासिन वाटणे, अपराधीपणाची भावना
  • मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये जाण्यात रस न वाटणे किंवा आनंद देणारी कोणतीही गोष्ट कराविशी न वाटणे
  • आकलनशक्ती,स्मरणशक्ती आणि निर्णयशक्ती वर परिणाम होणे
  • लोकांपासून लांब रहाणे व आत्मघाती विचार येणे
  • थकवा व झोपेची समस्या
  • वेदना किंवा दु:ख इतरांना सांगता न येणे
  • भूक न लागणे किंवा खुप खाणे

एका आठवड्यापेक्षा अधिक काळ डिप्रेशन मध्ये असताना अचानक ऊर्जा पातळी असामान्य रितीने वाढल्यास बायपोलर डिऑर्डर होण्याची शक्यता असते.

काही प्रमुख लक्षणे-

  • शारीरिक ऊर्जापातळी अतिप्रमाणात वाढणे
  • आक्रमकपणा व संतप्तपणा वाढणे
  • भावनावश होणे,तर्काशिवाय बेफिकीरपणे वागणे

डिप्रेशन आणि बायपोलर डिऑर्डर होण्यामागील कारणे व त्यावर प्रतिबंधाचे कोणतेही उपाय नाहीत.तुमच्या कुंटूंबात कोणाला जर अशी समस्या असेल तर तुम्हाला याबाबत काळजी घ्यायला हवी.यासाठी त्वरीत औषधउपचार सुरु करा.याबाबत तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकतात.मनाचे विकार मानसोपचार व औषधांनी बरे करता येतात.

४.ताण-तणाव-

जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता त्यावेळी तुमच्या ह्रदय,फुफ्फुसे,पोट आणि इतर अवयावातून वाहणा-या रक्तप्रवाहात स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण होतात ज्याच्या परिणामामुळे तुमचा श्वास जलद गतीने होतो,ह्रदयाचे ठोके वाढतात,ऊर्जापातळीत बदल होतो,भावना व मेंदूच्या कार्यात बदल होण्याची समस्या निर्माण होते.काही वेळा कामाचा सौम्य ताण हा तुम्हाला अधिक कार्यशील करण्यास फायद्याचा ठरु शकतो.मात्र वारंवार होणा-या ताणतणाव व मूडस्वींग मुळे मेंदूमधील हॉर्मोन्सची पातळी अनियंत्रित होते.अशा मूडस्वींगमुळे तुम्हाला पुढे गंभीर समस्येला तोंड द्यावे लागू शकते. मेडीटेशन,ताई-ची,योगासने तुम्हाला या ताणातून मुक्त करण्यासाठी प्रभावी ठरु शकतात.कधीकधी एकांतात चालण्याने देखील अशा ताणतणावात आराम मिळतो. [5]

५.आहार व पथ्थे-

या समस्येवर एखादे चॉकलेट अथवा गोड पदार्थ जवळ बाळगा.या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील अत्यावश्यक अमायनो आम्लाची पातळी वाढते व तुम्हाला आराम मिळू शकतो.चांगल्या परिणामासाठी साखरेच्या पदार्थांऐवजी असे पदार्थ निवडा ज्यामुळे तुमच्या शरीराचे पोषण देखील होईल. मासे,प्लॅक्स सीड्स,अक्रोड,सोयाबीन मधील ओमेगा ३ चा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.राग,चिडचिड व उदासिनता ही तुमच्या शरीरात ओमेगा ३ ची कमतरता असल्याची लक्षणे आहेत.

PLOS मध्ये प्रसारित करण्यात आलेल्या एका जर्नलमधील संशोधनानूसार आपल्या आहाराचा व आपल्या मूडचा एकमेकांवर व पर्यायाने शरीरावर परिणाम होत असतो.या संशोधनानूसार प्राण्यावर अती साखर व अती फॅट्स असलेल्या पदार्थाचा प्रयोग केल्यामुळे त्यांच्यामध्ये याबाबत दुष्परिणाम आढळून आले आहेत. [6]

मूडस्वींग टाळण्यासाठी आहार संतुलित असणे गरजेचे आहे.योग्य आहार व पुरेसा व्यायाम केल्यास तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता.

६.काही वैद्यकीय अवस्था-

काही वेळा ब्रेन ट्युमर,स्ट्रोक,मनोविकार,मेंदूचे विकार,फुफ्फुसांचे विकार,कार्डिओ व्हॅस्क्युलर विकार,थायरॉईडची समस्या यामुळे मूडस्वींग होतो.यासाठी मूडस्वींग बाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका कारण कदाचित त्यामुळे तुम्हाला गंभीर शरीरिक व मानसिक समस्येला सामोरे जावे लागू शकते.

संदर्भ-

  1. Clayton AH, Ninan PT. Depression or Menopause? Presentation and Management of MajorDepressive Disorder in Perimenopausal and Postmenopausal Women. Primary Care Companion toThe Journal of Clinical Psychiatry. 2010;12(1):PCC.08r00747. doi:10.4088/PCC.08r00747blu.
  2. National Institutes of Health. Understanding Drug Abuse And Addiction. Drugabuse.gov. N.p., 2012.
  3. Dodiya H, Kale V, Goswami S, Sundar R, Jain M. Evaluation of Adverse Effects of Lisinopriland Rosuvastatin on Hematological and Biochemical Analytes in Wistar Rats. ToxicologyInternational. 2013;20(2):170-176. doi:10.4103/0971-6580.117261.
  4. Swiger KJ, Manalac RJ, Blaha MJ, Blumenthal RS, Martin SS. Statins, Mood, Sleep, andPhysical Function: A Systematic Review. European journal of clinical pharmacology. 2014;70(12):1413-1422. doi:10.1007/s00228-014-1758-y.
  5. Chen KW, Berger CC, Manheimer E, et al. Meditative Therapies for Reducing Anxiety: ASystematic Review and Meta-analysis of Randomized Controlled Trials. Depression and anxiety. 2012;29(7):545-562. doi:10.1002/da.21964.
  6. PyndtJørgensen B, Hansen JT, Krych L, et al. A Possible Link between Food and Mood:Dietary Impact on Gut Microbiota and Behavior in BALB/c Mice. Bereswill S, ed. PLoS ONE. 2014;9(8):e103398. doi:10.1371/journal.pone.0103398.

Read this in English

Translated By – Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>