हिवाळ्याच्या दिवसात त्वचा मुलायम राहावी याकरिता मॉईश्चरायझरचा वापर केला जातो. परंतू अनेकदा त्यावरील एक्सपायरी डेट न बघता त्याचा वापर केला जातो. यामुळे केवळ मॉईश्चरायझर कमी परिणामकारक ठरते असे नाही तर अनेकदा बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे खाज येते. मग नेमकी तुम्ही मॉईश्चरायझरची बाटली घेतली हे प्रत्येकवेळेस लक्षात ठेऊन त्यानुसार त्याची एक्सपायरी डेट लक्षात ठेवणे शक्य नसल्यास Contura clinic, Bangalore च्या डरमॅटोलॉजिस्ट डॉ. चैताली दिक्षीत यांनी दिलेला सल्ला नक्की जाणून घ्या.
रंग बदलल्यास – मॉईश्चरायझर किंवा स्किन प्रोडक्ट्स ही थेट सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा. तुमची क्रीम ब्राऊन किंवा पिवळसर रंगाची झाली असल्यास फेकून द्या. त्याचा वापर करणे टाळा. मॉईश्चरायझर थंड आणि थेट प्रकाशापासून लांब ठेवा. मॉईश्चरायझर विकत घेतानाच ते एअर टाईट ट्युब व योग्य रित्या सिल केलेले आहे. याची पडताळणी करा.
स्वरूप बदलणे - सर्वसाधारण मॉईश्चरायझरपेक्षा तुमचे मॉईश्चरायझर अधिक जाड किंवा पातळ झाले असल्यास त्याचा वापर टाळा.त्यामधील सोल्युबल केमिकल्स वेगळे होतात परिणामी त्याचा इफेक्ट कमी होतो. तसेच अॅन्टीऑक्सिडंट्स आणि रेटिनॉईड्स कमी झाल्याने त्याचा त्वचेवर परिणाम दिसून होत नाही.
एक्सपायरी डेट चेक करा – सामान्यपणे मॉईश्चरायझर सुमारे 18 महिने वापरणे सुरक्षित असते. त्यापेक्षा अधिक वेळ वापरू नका. तुम्ही मॉईश्चरायझर विकत घेतल्यानंतर त्यावरील एक्सपायरी डेट मार्करने ठळक करा किंवा इतर ठिकाणी लिहा.
वास बदलणं - मॉईश्चरायाझला खुबट वास येत असल्यास त्याचा वापर कटाक्षाने टाळा.
भेसळ - मॉईश्चरायझरमध्ये काळसर डाग दिसल्यास ते बॅक्टेरिया किंवा फंगसच्या वाढीमुळे दिसतात. अशाप्रकारचे मॉईश्चरायझर लावल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो. मॉईश्चरायझरमधील केमिकल्स खराब व्हायला सुरवात झाल्यास त्वचेवर यामुळे अॅलर्जी वाढू शकते. मॉईश्चरायझरमुळे त्वचा लालसर होते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock