Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Pregnancy कन्फर्म करण्यासाठी मदत करतात या ’3′टेस्ट !

$
0
0

जर तुमची मासिक पाळी चुकली असेल तर तुम्ही प्रेगन्ट असू शकता.तुम्ही खरेच गरोदर आहात का हे जाणून घेण्यासाठी या टेस्ट जरुर करा.आजकाल बाजारात प्रेगन्सी टेस्ट करण्यासाठी अनेक पर्याय उपदब्ध आहेत.त्यामुळे तुम्ही अगदी घरी देखील ही प्रेगन्सी टेस्ट करु शकता.किंवा यासाठी एखाद्या लॅबमधून रक्त किंवा युरीन टेस्ट करण्याचा पर्याय देखील फायद्याचा ठरु शकेल.

प्रेगन्सी टेस्ट मुळे गर्भाधारणा कशी समजते-

फर्टिलायझेशनच्या सहा ते बाराव्या दिवशी गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते.त्यामुळे रक्तातील एचसीजीचे (HumanChorionic Gonadotropin ) प्रमाण झपाट्याने वाढते.प्रेगन्सीच्या पहिल्या आठवड्यापासून आठ ते बारा आठवड्या पर्यंत हे प्रमाण दर दोन ते तीन दिवसांनी ते दुप्पट होत असते.त्यामुळे या काळात रक्त व युरीन च्या माध्यामातून प्रेगन्सी टेस्ट मध्ये ते आढळण्यास सोपे जाते.याशिवाय अल्ट्रा सोनोग्राफीद्वारे देखील गर्भधारणा समजू शकते.

प्रेगन्सी टेस्टचे प्रकार-

तीन टेस्ट द्वारे तुम्ही गरोदर आहात हे समजू शकते.

१. युरीन टेस्ट-

तुम्ही गरोदर आहात हे तपासण्यासाठी तुम्ही घरीच किंवा डॉक्टरकडे जाऊन युरीन टेस्ट करु शकता.घरी करण्यात येणारी युरीन टेस्ट करायला सोईची व ९७ टक्के अचूक असू शकते.जरी काही सेंसेटीव्ह प्रेग्नसी टेस्ट कीट मुळे मासिक पाळी चुकल्याच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला प्रेग्नसी आहे समजू शकत असले तरी ही टेस्ट तुम्ही तुमची मासिक पाळी चुकल्यानंतरच्या पुढील आठवड्यात सकाळी लवकर करा ज्यामुळे तुम्हाला अचूक रिझल्ट मिळेल.किटवर देण्यात येणा-या सूचना तंतोतंप पाळा.या कीट मध्ये टेस्ट स्ट्रीप व डीपस्टीक असू शकते.डीपस्टीकच्या सहाय्याने युरीन टेस्ट स्ट्रीप मध्ये सोडा.जर तुम्ही प्रेग्नट असाल तर तर त्यामध्ये प्रेगन्सीसाठी असलेल्या पर्यायामध्ये बदल होतील.

काही कीट मध्ये टेस्ट करणाच्या युनिटवर एक खळगा असतो.एका कपमध्ये युरीन घ्या आणि त्या कीटमधील सूचनेनूसार ड्रॉपरच्या सहाय्याने युरीन त्या खळग्यामध्ये सोडा.त्या कीटमध्ये दर्शवल्याप्रमाणे बदलावर लक्ष ठेवा.जर तुम्ही प्रेग्नट असाल तर टेस्ट पाझिटव्ह असेल आणि जर तुम्ही गरोदर नसाल तर तुमची टेस्ट निगेटिव्ह येईल.तुम्हाला या रिझल्ट बाबत शंका असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या. नक्की या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

टेस्टमध्ये चुकीचा निगेटिव्ह रिझल्ट मिळणे-

कधीकधी तुम्ही प्रेग्नट असला तरी तुमची टेस्ट चुकीचा रिझल्ट दाखवू शकते.जर प्रेग्नसी तुम्ही टेस्ट खुप लवकर केली तर असे होण्याची शक्यता असते.ओव्हूलेशनच्या ६ ते १२ दिवसांमध्ये hCG हॉमोन्स निर्माण होत असले तरी ते गर्भ गर्भधारणा झाल्याशिवाय आढळत नाही.मात्र काही सेंसेटिव्ह युरीन टेस्ट मध्ये तिस-या ते चौथ्या दिवशीच hCG हॉमोन्स आढळून येण्याची शक्यता असते.ओव्हूलेशनचा दिवस प्रत्येक सायकल मध्ये बदलत असल्याने त्याबाबत काहीही ठामपणे सांगता येत नाही.त्यात जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर तो दिवस सांगता येणे खुपच कठीण असते.ओव्हूलेशनचा दिवस अधिक चांगल्या रितीने जाणून घेण्यासाठी ओव्हूलेशन प्रेडीक्टर कीट किंवा चार्टींग बेसल बॉडी टेंपरेचर सारख्या निरनिराळ्या टेस्टचा वापर करा. जाणून घ्या प्रेगन्सीमध्ये चक्कर येण्याची कारणंं आणि उपाय

टेस्टमध्ये चुकीचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणे-

जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने टेस्ट केली तर कधीकधी टेस्ट मध्ये दाखवण्यात येणारा पॉझिटिव्ह रिझल्ट चुकीचा असू शकतो.टेस्ट केल्यानंतर ३ ते ४ मिनीटांनी रिझल्ट पहा.कीट घेताना त्याची एक्सपायरी डेट नीट तपासून घ्या.जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करीत असाल व त्या दरम्यान तुम्हाला hCG  इंजेक्शन देण्यात आली असतील तरी देखील तुमची प्रेगन्सी टेस्ट चुकीची येण्याची शक्यता आहे.काही कर्करोग व वैद्यकीय उपचारांमध्ये hCG ची निर्मिती झाल्यामुळे तुमचा प्रेग्नसी रिपोर्ट चुकून पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. 

२. ब्लड टेस्ट-

युरीन टेस्ट पेक्षा लवकर व अचूक रिझल्ट तुम्हाला ब्लड टेस्टमधून मिळू शकतो मात्र या पर्यायाचा वापर खुप कमी केला जातो.ओव्हूलेशनच्या सहा ते सात दिवसानंतर तुम्ही डॉक्टरांकडे अथवा एखाद्या लॅबमधून ब्लड टेस्ट केल्यास तुम्हाला गर्भधारणा आहे का हे समजू शकते.मात्र हा रिझल्ट समजण्यासाठी तेवढा वेळ तुम्हाला थांबावे लागते. नक्की वाचा गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

ब्लड प्रेग्नसी टेस्टचे दोन प्रकार आहेत.

क्वालीटेटिव्ह एचसीजी टेस्ट-

ही एक सामान्य रक्त चाचणी आहे.यात तुमची मासिक पाळी चुकल्याच्या दहा दिवसांनंतर तुमच्या रक्तात एचसीजी उपस्थित आहे अथवा नाही यावरुन तुम्ही प्रेग्नट आहात का नाही ते समजते. मात्र या चाचणी मध्ये गर्भधारणा झाल्याच्या तिस-या अथवा चौथ्या दिवसा आधी हे समजणे शक्य नसते.

क्वांटीटेटिव्ह एचसीजी टेस्ट-

या टेस्ट मध्ये तुमच्या रक्तातील एससीजीचे प्रमाण अगदी कमी असले तरी ते लगेच समजू शकते.त्यामुळे एक्टोपीक प्रेग्नसीची समस्या असल्यास ती या टेस्ट मुळे त्वरीत समजते.

डिटेक्टींग एर्ली प्रेग्नसी फॅक्टर EDF-

फर्टिलायझेशनच्या ४८ तासांमध्ये एर्ली प्रेग्नसी फॅक्टर हे प्रोटीन तयार होते.तुम्ही गरोदर आहात का हे पाहण्यासाठी हा पर्याय थोडा खर्चिक व वेळ लागणारा असू शकतो. हे नक्की वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

अल्ट्रा सोनोग्राफी-

तुमच्या शेवटच्या मासिक पाळी(LMP)च्या साडे चार आठवड्यांनी अल्ट्रासोनोग्राफीच्या माध्यमातून गर्भधारणा झाली आहे का हे समजू शकते.तसेच यामुळे तुम्ही किती आठवड्यांच्या प्रेग्नेंट आहात आणि तुमचे बाळ निरोगी आहे का हे देखील समजते.या माध्यमातून LMP च्या सातव्या आठवड्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाच्या ह्रदयाचे ठोके देखील ऐकू शकता. जाणून घ्या हे ’5′ पदार्थ हेल्दी असले तरीही गरोदरपणात खाताना काळजी घ्या !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles