आजकालच्या बदलत्या जीवनशैली व खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला वारंवार अॅसिडीटीच्या समस्येला तोंड द्यावे लागते.मसालेदार किंवा बाहेरचे पदार्थ खाल्यानंतर जेव्हा तुम्हाला घसा किंवा पोटात जळजळ,आबंट ढेकर,अपचन असा त्रास होतो तेव्हा तुम्ही त्यावर काहीतरी घरगुती औषध उपचार करता. मात्र हा त्रास वारंवार होऊ लागल्यास एखाद्या अॅन्टासाईडचा सॅशे पाण्यात विरघरळून पिणे तुम्ही सोईचे समजता.ज्यामुळे तुम्हाला अपचनापासून त्वरीत आराम मिळतो.पण ही अॅन्टासाईड वारंवार घेतल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा कधी तुम्ही नीट विचार केला आहे का?
पोटातील आम्ल पदार्थामुळे पचन सुधारते-
निरोगी जीवनासाठी आपली पचनसंस्था सुरळीत असणे खुप महत्वाचे असते.पोटामध्ये अन्नाचे योग्य पचन करण्यासाठी आम्ल पदार्थांची व्यवस्था नैसर्गिकरित्या केलेली असते.या आम्ल पदार्थांमधील हायड्रोक्लोरिक अॅसिड्स या घटकामुळे अन्नाचे पचन योग्य रितीने होते.यात केल्या जाणा-या प्रक्रियेमुळे अन्नातील पोषणमुल्ये शरीराला मिळतात.एका संशोधनानुसार या स्टमक अॅसिड्समुळे विषबाधा होण्यापासून बचाव होतो व पचनकार्य सुरळीत होते. हे नक्की वाचा पित्ताचा त्रास कमी करण्याचे 5 घरगुती उपाय
पोटातील आम्लाचा शरीरातील प्रतिकारशक्तीला फायदा होतो-
पोटातील आम्ल पदार्थ जंतू बाहेर टाकण्यास मदत करतात.पोटातील आम्लामधील उच्च पातळीच्या पीएच मुळे अन्नपदार्थ व पाण्यामधून पोटात गेलेल्या जंतूसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.त्यामुळे पोटाचे आरोग्याला हानिकारक जिवाणूंपासून रक्षण होते. नक्की वाचा : कोरफड – अॅसिडीटी आणि अल्सरवर रामबाण उपाय !
अॅन्टासाईडचा पोटातील आम्लावर होणारा दुष्परिणाम-
अपचनामुळे छातीत जळजळ,जठर व पोटामध्ये दाहासह जास्त प्रमाणात आम्ल तयार होते.या समस्येवर उपाय म्हणुन तुम्ही अॅन्टासाईड अथवा अॅसिड सप्रेसन्टस घेता.अॅन्टासाईड मध्ये असे घटक असतात ज्यामुळे पोटातील आम्ल कमी केले जाते.
पोटातील हे आम्लाचे प्रमाण वाढल्यास ते अन्ननलिकेतून पुन्हा घश्याकडे मागे फिरु लागते ज्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. GERD या समस्येमध्ये पोटामध्ये वायू निर्माण झाल्याने अन्न पदार्थांना पुढे सरकण्यास अडथळा होतो व ते अन्ननलिकेतून पुन्हा मागे फिरु लागतात.त्यामुळे एन्टासाईड घेतल्याने या समस्येवर त्वरीत आराम मिळतो.पण हा यावरचा खरा उपाय नसल्याने दिर्घकाळ केलेल्या या उपाय चे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. जाणून घ्या अॅन्टासिड वरचेवर घेणे योग्य आहे का ?
१.गॅस्ट्रोइनटेस्टीनल इनफेक्शन-
कमी प्रमाणातील पोटातील आम्लामुळे जिवाणूंची वाढ होते ज्यामुळे पोटातील आतडयांमध्ये इनफेक्शन होऊ शकते.यामुळे केवळ दाह होणे व इनफेक्शन होण्याचाच धोका नसतो तर यामुळे आतडी पचन व पोषण करण्यास असमर्थ ठरतात.वारंवार होणा-या समस्येमुळे पुढे गॅस्ट्रोइनटेस्टीनल इनफेक्शनचा देखील धोका निर्माण होतो.
२.अपोषण होणे-
जठर सूजल्याने होणा-या जळजळी मुळे पोटात अन्न पचन करण्यासाठी पुरेसे आम्ल तयार करणे कठीण होते.याचा तुमच्या पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो.यामुळे आतड्याला अन्नातील लोह,विटामिन बी १२ सारखी पोषणमुल्ये घेणे कठीण होते.(१) ही समस्या बळावल्यास पोटातील विकृती मुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
३.एच.पायलोरी इनफेक्शन-
पोटातील आम्लाचे प्रमाण कमी झाल्याने हेलीकोबॅक्टर पायलोरी या जिवाणूला नष्ट करण्यास शरीर असक्षम ठरते.ज्यामुळे पोटात या बॅक्टेरीयाची वाढ होऊन जठराला गंभीर सूज येते. (२) एच.पायलोरी इनफेक्शनचा पचन क्रियेवर विपरित परिणाम होतो.हा विकार बळावल्यास पुढे त्या रुग्णाला पोटात दाह व वेदना होतात.ज्यामुळे पोटात आम्ल पदार्थांचे सिक्रेशन व्यवस्थित न झाल्याने जठराचा कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो.
इतर परिणाम-
अॅन्टासाईडच्या प्रकारानूसार व त्यांच्या दिर्घकाळ वापराने मूत्रमार्गातील इनफेक्शन,ह्रदय व किडनीच्या समस्या,स्नायू कमकुवत होणे व क्रॅम्प येणे,मिल्क अल्कली सिंड्रोम,हाडांच्या समस्या निर्माण होतात.(३)
- अॅल्युमिनीयम एन्टासाईडच्या वापरामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते व ऑस्टिओपोरोसिस च्या वाढीचा धोका वाढतो.
- कॅल्शियम एन्टासाईडच्या दिर्घकाळ केलेल्या वापरामुळे लहान मुलांच्या हाडांमध्ये कॅल्शियम शोषणास अडथळा निर्माण होतो.
- सोडीयम बायकार्बोनेट एन्टासाईडमुळे रक्तातील सोडीयमची पातळी वाढते.
- काही लोकांमध्ये मल्टीपल स्क्लेरोसिस सोबत एच२ रिसेप्टर बॉकर्समुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित होऊ शकते.ज्यामुळे ते घेत असलेल्या औषधांचा परिणाम कमी होतो.(४)
- अॅसिड कमी करणा-या काही औषधांच्या सततच्या वापरामुळे होणा-या कॅलशियमच्या कमतरतेमुळे हाडे फॅक्चर होऊ शकतात(५,६)
- एका संशोधनानुसार यामुळे रक्तप्रवाहात जंतूसंसर्ग,न्यूमोनिया,लहान मुले व अर्भकामध्ये गॅस्ट्रोइनटेस्टीनल इनफेक्शन होण्याचा धोका असतो.(७)
- एका भारतीय संशोधनानुसार सतत होणा-या एसिडीटीमुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका १६ ते २१ टक्क्यांनी वाढतो.(८)
1. Lam JR, Schneider JL, Zhao W, Corley DA. Proton pump inhibitor and histamine 2 receptorantagonist use and vitamin B12 deficiency. JAMA. 2013 Dec 11;310(22):2435-42. doi: 10.1001/jama.2013.280490. PubMed PMID: 24327038.
2. McColl KE, el-Omar E, Gillen D. Helicobacter pylori gastritis and gastric physiology. GastroenterolClin North Am. 2000 Sep;29(3):687-703, viii. Review. PubMed PMID: 11030081.
3. Woodson GC. An interesting case of osteomalacia due to antacid use associated with stainablebone aluminum in a patient with normal renal function. Bone. 1998 Jun;22(6):695-8. PubMedPMID: 9626411.
4. Biswas S, Benedict SH, Lynch SG, LeVine SM. Potential immunological consequences ofpharmacological suppression of gastric acid production in patients with multiple sclerosis. BMCMedicine. 2012;10:57. doi:10.1186/1741-7015-10-57.
5. Lau YT, Ahmed NN. Fracture risk and bone mineral density reduction associated with protonpump inhibitors. Pharmacotherapy. 2012 Jan;32(1):67-79. doi:10.1002/PHAR.1007. Review. PubMedPMID: 22392829.
6. Cai D, Feng W, Jiang Q. Acid-suppressive medications and risk of fracture: an updated meta-analysis. Int J Clin Exp Med. 2015 Jun 15;8(6):8893-904. eCollection 2015. PubMed PMID: 26309543; PubMed Central PMCID: PMC4538134.
7. Chung EY, Yardley J. Are there risks associated with empiric acid suppression treatment of infantsand children suspected of having gastroesophageal reflux disease? Hosp Pediatr. 2013 Jan;3(1):16-23.Review. PubMed PMID: 24319831.
8. Shah NH, LePendu P, Bauer-Mehren A, Ghebremariam YT, Iyer SV, Marcus J, Nead KT, CookeJP, Leeper NJ. Proton Pump Inhibitor Usage and the Risk of Myocardial Infarction in the GeneralPopulation. PLoS One. 2015 Jun 10;10(6):e0124653. doi: 10.1371/journal.pone.0124653.eCollection 2015. PubMed PMID: 26061035; PubMed Central PMCID: PMC4462578.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock