Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बाळाला मसाज करणे योग्य की अयोग्य ?

$
0
0

बाळाच्या जन्मामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी त्याचे पालक अनेक गोष्टींचे नियोजन करतात.तुम्ही देखील तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी नियोजन करीत असाल तर हा सल्ला जरुर वाचा. भारतीय परंपरेनुसार केल्या जाणा-या काही गोष्टी तुमच्या तान्हुल्यासाठी अयोग्य ठरु शकतात.याबाबतीत प्रमुख गोष्ट म्हणजे बाळाला मालीशवाल्या बाईंकडून मसाज करुन घेणे.घरातील मोठी माणसे ब-याचदा बाळाच्या आरोग्यासाठी अशा मालीशचा आग्रह करतात.त्यामुळे बाळाच्या आई वडीलां पुढे संभ्रमाची परिस्थिती निर्माण होतो.

यासाठी Leading Paediatrician, Neonatologist and Lactation Consultant DrZinal Unadkat आणिInternationally Certified Pregnancy, Lactation and Child Nutrition Counsellor सोनाली शिवलानी यांच्याकडून जाणून घ्या हा महत्वाचा सल्ला.

बाळाला मालीश करणे खरेच गरजेचे असते का?

डॉ झिनाल यांच्या मते बाळाला मालीश करावी की नाही हा त्या बाळाच्या आईवडीलांच्या वैयक्तीक निर्णय आहे.पण शास्त्रीय दृष्ट्या असा मसाज करण्याची काहीच गरज नाही.भारत आणि काही आशियायी देशांमध्येच फक्त  बाळाला मालीश करण्याची पद्धत आहे. सोनाली शिवलानी यांच्या मते बाळाला मालीश केल्याने त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते,हाडे मजबूत होतात,हातापायांचा आकार सुधारतो,नाक तरतरीत होते किंवा डोके गोल होते हे सर्व गैरसमज आहेत.मालीश केल्याने असे काहीही होत नाही.मसाज एक टच थेरपी आहे ज्यामुळे तुमचे बाळासोबत सुंदर नाते निर्माण होऊ शकते.मसाज मुळे बाळाला फक्त आनंद मिळतो व चांगली झोप लागते. हे नक्की वाचा नवजात बाळाला भेटण्यापूर्वी या ’6′ गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

मालीश केल्याने बाळाला काय समस्या होऊ शकतात?

डॉ.झिनाल यांच्या सल्ल्यानुसार जर बाळाला तुम्ही मालीश करणा-या बाईंकडून मसाज केला तर त्यांनी मसाज करताना दिलेल्या दाबामुळे तुमच्या बाळाला वेदना होऊन ते रडू लागते.अशा प्रकाराच्या दाबामुळे तुमच्या बाळाचा सांधा निखळण्याचा किंवा त्याच्या नाजूक हाडांमध्ये फॅक्चर होण्याचा धोका असू शकतो.या स्त्रीया केवळ पैशांसाठी घरोघरी जाऊन ही कामे करतात त्यामुळे अस्वच्छतेमुळे त्यांच्या अंगावरील जंतूचा संपर्क मसाज करताना तुमच्या बाळाला देखील होण्याची दाट शक्यता असते. हे नक्की वाचा गर्भात असताना बाळ करते या ’8′ इंटरेस्टिंग गोष्टी !

बाळाला मालिश कोणी करावे?

डॉ.झिनाल यांच्या मते मालिश हा बाळाला आराम मिळावा व त्याला बरे वाटावे यासाठी करण्यात येणारा एक प्रकार आहे.बाळाच्या पालकांनी अगदी हलक्या हाताने व प्रेमाने मसाज  केल्यास त्यांचे बाळासोबत एक छान नाते जोडले जाऊ शकते.तर सोनाली यांच्या मते देखील बाळाच्या सुरक्षेसाठी त्याचे आईवडील किवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती ( आजी,पणजी) त्याला नक्कीच मालिश करु शकतात.

बाळाला योग्य पद्धतीने मसाज कसा करावा?

डॉ झिनाल यांच्या सल्ल्यानुसार कोणतेही बाजारातील तेल न वापरता फक्त बोटांच्या आधारे बाळाला हलक्या हाताने मसाज करणे योग्य आहे.तर सोनाली यांच्या मते बाळाला शांत वाटेल  अशा कोणत्याही पद्धतीने सावकाश मसाज करणे योग्य ठरेल. जाणून घ्या बाळाला डायपर रॅशेसपासून वाचवण्याचे ‘५’ उपाय

बाळाला मसाज कोणत्या वयापर्यंत करु शकतो?

सोनाली यांच्या मते बाळाला आवडेल त्या वयापर्यंत मसाज करणे योग्य आहे.यासाठी पहिले काही दिवस बाळाला मसाज करुन बघा जर त्याला आवडले नाही तर मसाज करणे थांबवा.पण जर तुमच्या बाळाला तुम्ही केलेला मसाज आवडत असेल तर त्याला तुम्ही एक वर्षांपर्यत वेगवेगळ्या पद्धतीने मसाज करु शकता.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>