Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आईकडून बाळाला संक्रमित होणार्‍या HIV च्या धोक्याबाबत ’10′प्रश्न व त्याची एक्सपर्ट उत्तरं !

$
0
0

एचआयव्ही किंवा एड्स हा एक प्राणघातक आजार आहे.एचआयव्हीचा संसर्ग अनेक माध्यमातून होतो.एचआयव्ही बाधित आईमुळे तिच्या होणा-या बाळाला याचा संसर्ग होऊ शकतो.मात्र आता प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे एचआयव्ही ग्रस्त आईच्या बाळाचे यापासून संरक्षण करणे शक्य आहे.या संक्रमणाबाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात.यासाठी मुंबईच्या आर्शिवाद हॉस्पिटलचे Dermatologist and HIV specialist डॉ.राज हजरानी यांच्या कडून या शंकाचे निरसन करु घेऊया.

१.आईकडून तिच्या बाळाला होणारा एचआयव्हीचा संसर्ग टाळता येतो का?

होय,जरी मातेच्या एचआयव्हीच्या संक्रमणाच्या स्थितीबाबत पुर्ण माहीती  नसली तरी ती तिच्या मुलाला होणारा संसर्ग नक्कीच टाळू शकते.यासाठी त्या मातेने तिच्या गायनेकॉलॉजिस्ट सोबत चर्चा करुन याबाबत अधिक माहीती व त्यासाठी असणारे पर्याय समजावून घ्यावेत.

२.आईपासून बाळाला होणारा संसर्ग नेमका कसा टाळता येतो?

जर एखाद्या गरोदर महीलेचे एचआयव्ही संक्रमण किती आहे हे माहीत नसेल तर तीला एन्टी-रीट्रोव्हायरल थेरपीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता असते.एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी प्रसूतीपूर्व देण्यात येणारी औषधे ही त्या मातेच्या एचआयव्ही संक्रमणाच्या प्रमाणावर व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात.यासाठी प्रसुतीनंतरही काही औषधे घ्यावी लागतात.बाळाला हा संसर्ग टाळण्यासाठी अशा मातांना स्तनपान तज्ञांच्या देखरेखी खालीच करावे लागते.जर एचआयव्ही बाधित आईचे गरोदरपण पुर्वनियोजित असेल तर तिच्या गर्भाला संसर्ग टाळण्यासाठी आधीपासूनच्या औषधे सुरु करावी लागतात.तसेच एचआयव्हीसाठी घेण्यात येणा-या औषधांचा गर्भावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी अधिक काळजी घेणे देखील गरजेचे असते.

३.एचआयव्ही ग्रस्त महीला तिच्या बाळाला स्तनपान करु शकते का?

एचआयव्ही ग्रस्त महिलेच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर ते अवलंबून असते.वर्ल्ड हेल्थ ऑरर्नाजेशन नुसार जर त्या मातेच्या दुधाला पर्याय म्हणून एखाद्या सुरक्षित महिलेच्या स्तनपानाची व्यवस्था होऊ शकली किंवा अशा स्तनपानाचा खर्च बाळाच्या आईला आर्थिक दृष्टीने परवडणारा असेल तर ती तीचे दूध बाळाला देणे टाळू शकते.गरीब महीलांना आर्थिकदृष्टा हा खर्च परवडत नसल्याने त्यांना बाळाला वाचवण्यासाठी स्तनपान करणायाशिवाय दूसरा मार्ग नसतो.उच्च-मध्यम वर्गीय महीलांना मात्र हा खर्च परवडत असल्यामुळे त्या त्यांच्या बाळाला स्तनपान करीत नाहीत.

४.गरोदरपणी एचआयव्ही टेस्ट करता येते का?

गर्भाला होणारा एचआयव्हीचा धोका टाळण्यासाठी गर्भवती महीलेने गरोदरपणाच्या प्रत्येक तिमाही मध्ये एचआयव्ही टेस्ट करणे गरजेची असते.त्याचप्रमाणे पहिल्या तिमाहीत करण्यात येणा-या सर्व टेस्ट मध्ये एचआयव्ही टेस्ट केली जातेच.एचआयव्हीचा संसर्ग गर्भाला होऊ नये यासाठी दोन्ही पालकांनी पहिल्या,दुस-या व तिस-या तिमाही मध्ये टेस्ट करुन घ्यावी.

५.गर्भवती महीलेकडून तिच्या बाळाला एचआयव्हीची लागण का होते?

एचआयव्ही संक्रमित गरोदर मातेच्या बाळाला एचआयव्हीचे संक्रमण झाल्यानंतर किंवा संक्रमणानंतर औषधउपचार न घेतल्याने किंवा गरोदर पणात कुपोषणामुळे संक्रमण होण्याचा धोका असतो.कधीकधी जेव्हा बाळाची आई एचआयव्ही निगेटिव्ह असते पण त्याचे वडील एचआयव्ही पॉझिटिव्ह असतात तेव्हा या संक्रमणातून बाळाला संक्रमित होण्यापासून वाचवणे हे डॉक्टरांसाठी आव्हात्मक असते.असे असले तरी डॉ.हजरानी यांच्या मते ART थेरपीने हे संक्रमण रोखता येणे शक्य असल्याने असे पालक एका सुरक्षित बाळाला जन्म देऊ शकतात.

६.एचआयव्ही औषधांमुळे हे संक्रमण थांबवता येते का?

एन्टीरीट्रोव्हायरल थेरपीने एचआयव्हीचे संक्रमण रोखता येते हे सिद्ध झाले आहे.मात्र ते ती माता किती प्रमाणात संक्रमित आहे यावर अवलंबून आहे.जर मातेचे संक्रमण आटोक्यात येण्यासारखे असेल तर या रोगाच्या प्रसाराचे प्रमाण शुन्य ट्क्के असू शकते.

७.गरोदरपणात ही औषधे घेणे कितपत सुरक्षित आहे?

गरोदरपणात एचआयव्हीचे संक्रमण रोखणारी बरीचशी औषधे अर्भकाच्या वाढीसाठी सुरक्षित असतात.मात्र इतर कोणत्याही औषधांप्रमाणे याही औषधांचे २ टक्के दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.पण या औषधांमुळे एचआयव्हीचे संक्रमण रोखले जाते या फायद्यापुढे औषधांचे साईड इफेक्टस नगण्य असल्याने ते सहन करणे शक्य होते.

८.गरोदर महीलेने औषधउपचार घेतले नाहीत तर तिच्या बाळाला एचआयव्हीचे संक्रमण होण्याचा किती धोका असतो?

हा धोका ३२ टक्के असू शकतो.म्हणजेच अशा १०० उदाहरणापैकी ३२ महिलांच्या बाळाला हा संसर्ग होऊ शकतो.यासाठीच तिस-या तिमाहीतही गरोदर महीलेची एचआयव्ही टेस्ट व तपासणी करणे गरजेची असते.

९.एन्टीरीट्रोव्हायरल घेणा-या महीलेच्या बाळाला एचआयव्हीचे संक्रमण होते का?

एन्टीरीट्रोव्हायरल घेतल्याने अनेकांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत.मात्र काही केसेसमध्ये औषधांच्या वापरानंतरही हा व्हायरल लोड थांबला नाही.त्यामुळे अर्भकाला संक्रमण होण्याचा धोका निर्माण होतो.असे  झाल्यास तज्ञ औषध व उपचार बदलण्याचा सल्ला देतात.

१०.अर्भकाचे संक्रमण थांबवण्याचा सर्वात उत्तम उपाय कोणता?

एचआयव्ही बाधित आईपासून अर्भकाचे संक्रमण थांबवण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगतलेले औषधउपचार न चुकता घेणे.

त्याच प्रमाणे या तीन प्रकारे तुम्ही हे संक्रमण थांबवू शकता.

  • प्रेगन्सी पुर्व तपासणीत एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ताबडतोब औषधे घेण सुरु करणे.
  • सिझेरियन डिलीव्हरीचा पर्याय निवडणे ज्यामुळे बाळाला संक्रमण होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
  • प्रसूतीपुर्व काळजी घेतल्याने आईपासून बाळाला होणारा संसर्ग टाळता येतो.
  • त्याचप्रमाणे अशा मातेने तीच्या आयुष्यभराच्या सुरक्षेसाठी व पुढील एड्स चा धोका टाळण्यासाठी न चुकता औषधे घ्यावीत.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>