मी एक 30 वर्षीय सेक्सश्युअली अॅक्टीव्ह स्त्री आहे. जर मी एखाद्या HIV positive पुरूषासोबत ओरल सेक्स केला तर मलाही HIV ची बाधा होऊ शकते का ?
Primus Super Specialty Hospital, New Delhi च्या Sr. Consultant Gynaecologist, डॉ. शॅली सिंघ यांच्या सल्ल्यानुसार, व्हर्जायनल किंवा अॅनल सेक्सच्या तुलनेत ओरल सेक्सच्या माध्यमातून HIV चा प्रसार होण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
ओरल सेक्स म्हणजे तुमच्या साथीदाराच्या जननेंद्रियाला (vagina or anus or penis) उत्साहीत करण्यासाठी तोंडाचा वापर करणे. त्यामुळे ओरल सेक्सच्या माध्यमातून एचआयव्हीचा प्रसार होण्याची शक्यता आणि धोकाही कमी असतो. परंतू जर तुमच्या तोंडामध्ये, हिरड्यांजवळ एखादी जखम, त्वचा फाटलेली असल्यास अशावेळेस एचआयव्ही चा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच जननेद्रियाजवळ फोड, जखम असल्यास त्याच्याकडून एचआयव्ही चा प्रसार होण्याची शक्यता असते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा लैंगिक आजार नसल्यास, गेल्या सहा महिन्यांच्या एचआयव्हीच्या ट्रीटमेंट दरम्यान व्हायरल लोड हा अनडिटेक्टेबल असल्यास एचआयव्हीचा प्रसार होण्याची शक्यता कमी असते. नक्की वाचा : HIV/AIDS बाबत या ’33′ प्रश्नांंबाबतचे समज-गैरसमज आजच दूर करा !
तुमच्या साथीदाराने तोंडामध्ये ejaculate न केल्यास एचआयव्हीचा प्रसार होण्याची शक्यता कमी असते.एचआयव्हीचा प्रसार हा केवळ एचआयव्ही बाधित रुग्णांच्या सेक्श्युअल फ्ल्युईड किंवा रक्ताशी आल्यास होऊ शकतो.
तुम्हांला एचआयव्ही प्रसाराचा धोका टाळायचा असल्यास पुरूषाला तुमच्या तोंडामध्ये ejaculate करू देऊ नका. अशावेळेस ejaculate च्या क्षणी कंडोमचा वापर करून किंवा स्त्रीयांनी तोंड बाजूला करावे. कंडोमचा वापर करून लैंगिक आजारांचा, हेपिटायाटीस व एचआयव्हीचा देखील धोका टाळता येतो.
ओरल सेक्स करणार असाल तर त्यापूर्वी दातांना ब्र्श करणे, जीभ साफ करणे टाळा. यामुळे तोंडामध्ये जखम होण्याची शक्यताअसते. तुम्हांला शंका आल्यास नियमित लैगिंक आजारांची चाचणी करा, योग्य कंडोमचा वापर करा. तसेच एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत सेक्स करत असल्यास सुरक्षेची काळजी नक्की घ्या. अन्यथा अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. ओरल सेक्सचा आनंद घेण्यासाठी खास ’5′ पोझिशन्स नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock