एचआयव्ही हा एक भयंकर आजार आहे.हा आजार पुर्ण बरा होत नसल्याने रुग्णाची शरीर प्रकृती खालावत जाते.या रोगाबाबत असलेल्या अपु-या व चुकीच्या ज्ञानामुळे समाजात अनेक गैरसमज निर्माण होतात.एचआयव्ही बाधित व्यक्तीला व त्याच्या कुटूंबियांना या रोगाबाबत पुरेशी माहीती व त्यासाठी करण्यात येणा-या प्रगत उपचार पद्धती माहीती असतील तर हा आजार आटोक्यात येणे सोपे आहे..
HIV म्हणजे नेमके काय?
HIV म्हणजे हयूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस.या संसर्गामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते.हा संसर्ग एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या सेक्ससंबधातून,रक्तामधून,एचआयव्
एचआयव्ही जिवाणूंच्या संपर्कांमुळे लगेच एचआयव्हीची लागण होतेच असे नाही.शरीरातील म्युकोसाचा या जिवाणूंशी संपर्क होणे हे जरी असुरक्षित असले तरी धोकादायक असतेच असे नाही.प्रथम हे जिवाणू शरीरात शिरताच त्यांना आत जाण्यापासून प्रतिबंध केला जातो.त्यानंतर देखील त्या जिवाणूंचा शरीरात प्रवेश झालाच तरी शरीरातील रोगप्रतिकारक पेशी त्या जिवाणूंना नष्ट करतात.एचआयव्हीचा संपर्क झाल्यानंतर एक ते तीन दिवसांमध्ये हा प्रतिबंध होत राहतो त्यामुळे एचआयव्हीची लागण होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.त्यानंतर जर एचआयव्ही जिवाणूंनी रक्त आणि लिफ्याइटीक सिस्टिम द्वारा शरीराच्या इतर अवयवांमध्ये प्रवेश केला तर शरीराला कायमस्वरुपी एचआयव्हीची बाधा होण्यापुर्वी रक्तातील इम्युन्स सेल्स त्याचा प्रतिकार करुन त्या जिवाणूंना नष्ट करु शकतात.पण जर या सर्व पातळ्यांवर प्रतिबंध झाल्यावर देखील जर हे जिवाणू शरीरात शिरलेच तर त्यामुळे CD4 या रोगप्रतिकारक पेशींमध्ये एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग होतो आणि मग त्या पेशींचे प्रतिकार करणे थांबल्यामुळे या जिवाणूंची वाढ झपाट्याने होते.प्रतिकार शक्ती पेक्षा जिवाणूंची वाढ अधिक झाल्याने त्या व्यक्तीला कायमस्वरुपी एचआयव्हीची लागण होते.यामुळे त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते.
एड्स ही एचआयव्ही इनफेक्शननंतरची पुढील स्टेज आहे.जर एचआयव्ही बाधित व्यक्तीला त्वरीत योग्य उपचार मिळाले नाहीत तर त्यांची प्रकृती खालावते आणि त्याला एड्स हा भयंकर रोग होतो.या रोगात त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशींचे नुकसान झाल्याने त्याच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते व त्याला इतर अनेक इनफेक्शन होऊ लागतात.
जोडीदाराकडून एचआयव्ही इनफेक्शन टाळण्यासाठी सुरक्षेबाबत कोणती काळजी घ्यावी?
१.कॉन्डोम: कॉन्डोम वापरणे हा एचआयव्ही संसर्ग टाळण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.चांगल्या कॉन्डोमचा सेक्स करताना प्रत्येकवेळी वापर केल्यास एचआयव्हीचा धोका टाळता येतो.
कार्य-
मेल कॉन्डोम मुळे शुक्राणू स्त्रीच्या योनीमार्गात प्रवेश करु शकत नाहीत.तर फिमेल कॉन्डोममुळे स्त्रीच्या योनीमार्गामध्ये प्रवेश करण्यास शुक्राणूंना अडथळा निर्माण होतो.
किंमत-
तीन मेल कॉन्डोम-२५ रु.
तीन फिमेल कॉन्डोम-१०० रु.
२.पुर्व-सुरक्षेसाठी रोगप्रतिबंधक उपचार:
कॉन्डोमप्रमाणे या उपचारांचा वापर जोडीदारापासून एचआयव्हीचा संसर्ग टाळण्यासाठी करता येऊ शकतो.तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन इम्ट्रीसीटॅबीन आणि टेनोफोवियर या एन्टायट्रोवायरल गोळ्यांचा ठराविक डोस नियमित घेतल्यास एचआयव्हीचा संसर्ग टाळता येतो.
कार्य- ही औषधे एचआयव्ही जिवाणूंना नष्ट करतात त्याचप्रमाणे शरीरात परसण्यास प्रतिबंध करतात.
किंमत-तीस गोळ्या १४०० रु.
३.रोगाची लागण झाल्यानंतर करावयाचे रोगप्रतिबंधक उपचार:
एचआयव्ही जिवाणूंचा सबंध आल्यास संसर्ग टाळण्यासाठी PEP आणि एन्टायट्रोवायरल ड्रग्ज हे उपचार ७२ तासांच्या आत करणे गरजेचे असते.आरोग्य कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुईने दुखापत झाल्यास त्यांना हे उपचार करण्याचा सल्ला देण्यात येतो.त्यांचे प्रथमोपचार,एचआयव्ही टेस्ट व काऊंसलिंग देखील केले जाते.तसेच पुढील धोका टाळण्यासाठी एन्टायट्रोवायरल ड्रग्जचा २८ दिवसांचा कोर्स व नियमित हेल्थ चेकअप करण्यात येते.
कार्य- या उपचारांमुळे एचआयव्ही जिवाणूंची वाढ रोखली जाते त्यामुळे ते शरीरात अधिक पसरत नाहीत.
किंमत-३० गोळ्यांची किंमत ३००० रु.
एचआयव्ही किंवा एड्सवर आणखी कोणते उपचार केले जातात?
एचआयव्ही जिवाणू शरीरातील त्वचेच्या आतील टिश्यूज मध्ये पसरु नयेत यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना सहकार्य करणारे इन्टरवेन्शन्स उपलब्ध आहेत.त्याच प्रमाणे पुर्व-सुरक्षेचे रोगप्रतिबंधक उपचार करुन देखील या जिवाणूंची वाढ रोखणे व त्याच्या शरीरात पसरण्यावर प्रतिबंध आणता येतो.
ART-Antiretroviral treatment या उपचारांचा एचआयव्ही जिवाणूंची वाढ रोखण्यासाठी चांगला फायदा होते हे सिद्ध झाले आहे.या थेरपी सोबत आयुष्यभर दिवसभरात तीन एन्टायट्रोवायरल औषधे वेळेवर घेणे बंधनकारक आहे.या थेरपी मुळे रुग्ण निरोगी व अधिक आयुष्य जगू शकतो.तसेच या उपचारांमुळे त्याच्यामुळे इतरांना एचआयव्ही होणारा संसर्गाचा धोका कमी होतो
कार्य-या थेरपी मुळे एचआयव्ही जिवाणूंची वाढ थांबते व एड्स होण्याच्या धोका कमी होऊ शकतो.मात्र यासाठी जिवाणूंना प्रतिबंध करणा-या रोगप्रतिकारक पेशींच्या वाढीवर नियमित लक्ष ठेवावे लागते.
किंमत- या उपचारांचा खर्च रुग्ण घेत असलेल्या औषधांच्या प्रमाणांवर,रुग्णाचे वय व त्याच्या स्थितीवर अवलंबून आहे.
या उपचारांधील काही उणीवा-
- एचआयव्ही जिवाणूंची वाढ गुप्तपणे होत राहते.
- आयुष्यभर थेरपी व उपचार घेणे आणि दररोज चेकअप करणे बंधनकारक असते.
- आयुष्यभर घ्याव्या लागणा-या थेरपीचे दुष्परिणाम होऊ शकतात.
- औषधांचे कडक नियम पाळावे लागतात.
- काही औषधे सर्वच रुग्णांना सहन होतील असे नाही.
एचआयव्ही पुर्ण बरा होतो का?
एचआयव्ही हा आजार पुर्ण बरा होत नाही.एचआयव्ही बाधित व्यक्ती आयुष्यभर या आजाराने पिडीत राहते.असे असले तरी एचआयव्ही पुर्ण बरा करण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. आत्तापर्यंत हा आजार पुर्ण करण्यापेक्षा एचआयव्ही जिवाणूंच्या वाढीवर प्रतिबंध करण्यात यश मिळाले आहे.एचआयव्ही जिवाणू नेमके शरीरात कुठे व कसे लपून राहतात व त्यांना प्रतिकार करण्या-या शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती बाबत शास्त्रज्ञाचे सखोल संशोधन सुरू आहे.दोन प्रकारे या एचआयव्ही पुर्ण बरा करता येऊ शकतो.जर औषधांच्या सहाय्याने पेशींमध्ये किंवा टिश्यूज मधील एचआयव्हीच्या जिवाणूंचा संपुर्ण नाश करण्यात आला तर अथवा रुग्णाच्या डिएनए मध्ये बदल घडवून एचआयव्हीला विरोध केला गेला तर.
आत्तापर्यंत फक्त एकच व्यक्ती या रोगापासून पुर्ण बरी झाली आहे.त्याच प्रमाणे एका केस मध्ये एका बर्लिन एचआयव्ही ग्रस्त रुग्णाची बरे होण्याची आशा निर्माण झाली आहे.त्याच्यावर करण्यात येणा-या प्रगत उपचार पद्धतींमध्ये होणा-या सकारात्मक बदलांमुळे शास्त्रज्ञांना अजून एक एचआयव्ही ग्रस्त रुग्ण बरा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नक्की वाचा : एचआयव्ही / एड्स बाबत हे ’8′ गैरसमज आजच दूर करा
एचआयव्ही लस-
शास्त्रज्ञांचे एचआयव्हीला प्रतिबंध करण्या-या लस विकसित करण्यावर सध्या संशोधन सुरु आहे.
एचआयव्हीचे रुंपातर एड्समध्ये होण्यापासून संरक्षण-
एचआयव्ही रुग्ण पुर्ण बरा जरी नाही होऊ शकला तरी या जिवाणूंची लागण झाल्यानंतर त्याचे एड्स या भयंकर रोगात रुपांतर होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्याचप्रमाणे उपचाराने रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी शास्त्रज्ञांनी Nullbasic या प्रोटीन चा शोध लावला आहे.
पॅसिव्ह इम्युनोथेरपी-
(bNAbs)या एन्टीबॉडीज मुळे रुग्णाच्या शरीरातील एचआयव्हीच्या जिवाणूंची वाढ रोखली जाते.एका नवीन संशोधनानूसार या थेरपीमुळे एन्टायट्रोवायरल औषधांशिवाय एचआयव्ही जिवाणूंची वाढ थांबवता येऊ शकते.त्यामुळे आता या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम कमी होऊ शकतात.
MX2 जनूक -
शास्त्रज्ञांनी MX2 या नव्या जनूकाचा शोध लावला आहे ज्यामुळे एचआयव्ही जिवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर पसरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.या जनुकाचा विकास करुन अथवा त्यापासून औषध निर्माण करण्यात आल्यास एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना दिलासा मिळू शकतो.
जनूकीय सुधारीत पेशी-
एका नवी जनूकीय थेरपीची प्रथम चाचणी नुकतीच यशस्वी झाल्याने एचआयव्ही रुग्ण बरे होण्याची सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत.या चाचणी दरम्यान काही सुधारीत जनूकांमुळे रुग्णाच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीत वाढ झाली असल्याचे आढळले आहे.
मधमाशी पासून तयार करण्यात येणारे औषध-
एका संशोधनानूसार मधमाशीमध्ये आढळणा-या एका विशद्रव्याचा एचआयव्ही जिवाणूंना नष्ट करण्यासाठी वापर करण्यात येऊ शकतो.शास्त्रज्ञांच्या मते या द्रव्याचा वापर वजानल जेल साठी करता येऊ शकतो ज्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग टाळता येऊ शकतो किंवा एचआयव्ही बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
इम्युनोटॉक्सिन्स-
एका संशोधनात या टॉक्सिन्सचा माऊस मॉडेल वर प्रयोग करण्यात आला.ज्यामध्ये असे आढळले आहे की या थेरपीमुळे एचआयव्ही जिवाणूंची झपाट्याने वाढ करण्या-या पेशी नष्ट होतात.यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो किंवा त्याला जन्मभर औषधे घ्यावी लागणे कमी होऊ शकते.
रेडीओइम्युनोथेरपी-
या थेरपीमध्ये मोनोक्लोनल एन्टीबॉडीज चा वापर करण्यात येतो.क्लोनिंग पेशी या रोगप्रतिकारक शक्तीतील खुप महत्वाच्या पेशी आहेत.या थेरपीमध्ये इनफेक्टेड पेशींना शोधून रेडीएशनद्वारे नष्ट करण्यात येते.यामुळे एचआयव्ही जिवाणू नष्ट करता येऊ शकतात.
NeF प्रोटीन-
संशोधकांनी NeF या प्रोटीनचा शोध लावला आहे ज्याचा वापर औषधांमध्ये केल्यास एचआयव्हीपासून पुढील पिढीचे संरक्षण करता येऊ शकते.
VRC07-αCD3प्रोटीन-
रुग्णाने एन्टी एचआयव्ही औषधे घेणे बंद केल्यास त्याच्या पुन्हा शरीरात गुप्तपणे जिवाणूंची वाढ होते.मात्र शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या नवीन VRC07-αCD3 प्रोटीनमुळे असे होण्यास प्रतिबंध होतो.त्यामुळे एचआयव्ही पुर्ण बरा होऊ शकतो.हे प्रथिन गुप्त एचआयव्ही बाधित पेशींना शोधून त्यांना नष्ट करते.
Tenascin-C (TNC) प्रोटीन-
शास्त्रज्ञांच्या मते टीनसी या स्तनपानातील प्रोटीनमुळे एचआयव्ही बाधित मातेच्या बाळाला होणारा एचआयव्हीचा संसर्ग रोखता येऊ शकतो.एचआयव्ही बाधित आईच्या दुधातून अर्भकामध्ये एचआयव्ही जिवाणूंचे संक्रमण होते.यापासून बाळाचे संरक्षण करणे गरजेचे असते अन्यथा त्या बाळालाही आईचा संसर्ग होऊ शकतो.याबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
This article has been verified by Dr Mamatha M. Lala, Consultant – Pediatric HIV Telemedicine(UNICEF), Pediatric Center of Excellence – LTMMC & LTMGH, Sion, Mumbai. Medical Adviser &Consultant Pediatrician, Committed Communities Development Trust.