Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या 3 श्वसन व्यायामांनी कमी करा वाढवा तुमचा आत्मविश्वास !

$
0
0

आत्मविश्वास ही जादुई गोष्ट आहे. ती तुम्हांला जितका आनंद देते तितकीच सकारात्मक उर्जा तुमच्या आजुबाजुच्या  व्यक्तींनाही देते. मग तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी मेहनत, चिकाटी सोबतच आत्मविश्वासही गरजेचा आहे. मग तो वाढवण्यासाठी योगा एक्सपर्ट रमण मिश्रा यांनी सुचवलेले हे काही श्वसनाचे व्यायाम नक्की करून पहा. तुम्हांला काळजी वाटत असल्यास, मानसिकरित्या अस्वस्थ वाटत असल्यास ही आसनं नक्की करून पहा.

द फोर्सफूल ब्रिथ (The forceful breath)

भीती, अस्वस्थता कमी करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर आहे. या व्यायामामुळे ताणतणाव कमी होतो. तात्काळ तुमच्यामधील आत्मविश्वासाची वाढायला सुरवात होते.

कसा कराल व्यायाम ?

  • ताठ उभे राहून दीर्घ श्वास घ्या.
  • हम्म…. असा आवाज करत सारा उच्छवास बाहेर टाका. असे नियमित 2-3 वेळेस करा.

लक्झरी ब्रिथिंग Luxury breathing

या व्यायामामुळे तुम्ही शांत व्हाल. तसेच कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची तुमच्यातील क्षमता वाढण्यास मदत होईल. यामुळे नर्व्हसनेस कमी होण्यास मदत होते. तसेच आजुबाजूच्या लोकांशी अधिक मोकळेपणाने बोलणे शक्य होईल.

कसा कराल हा व्यायाम :

  • ताठ उभे रहा  आणी दीर्घ श्वास घ्या.हात आकाशाकडे ताठ आणि सरळरेषेत ठेवा. हाताची बोटं शक्य तितकी मोकळी ठेवा.
  • तोंड मोठे उघडून जीभ बाहेर काढा.
  • हात मागे फिरवून पुन्हा मूळ स्थितीमध्ये या.
  • हा व्यायाम 2-3 वेळेस करा.

नाडी शोधन प्राणायम

मनावरचा ताण कमी करण्यासाठी तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा प्राणायम फायदेशीर ठरतो.

कसा कराल हा व्यायाम

  • पाठीचा कणा ताठ ठेवून खांदे सरळ रेषेत ठेवून बसा.
  • डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून आकाशाच्या दिशेने तळवा उघडा ठेवा.
  • दोन्ही भुवयांच्या उजव्या हाताच्या बोटांची तर्जनी आणि मधले बोट ठेवा.
  • अंगठा एका नाकपुडीवर आणि उरलेली दोन बोटं दुसर्‍या नाकपुडीवर ठेवा.
  • अंगठ्याने नाकपुडीवर हलका दाब द्या आणि दुसर्‍या नाकपुडीने श्वास घ्या.
  • श्वास सोडताना दोन बोटांनी नाकपुडीवर  दाब द्या आणि अंगठा सैलसर करून त्या नाकपुडीने श्वास सोडा.
  • असे 5-7 वेळेस करा.
  • नाडी शोधन प्राणायम करताना डोळे बंद ठेवा.

 

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>