मासिकपाळीच्या दिवसात पोटदुखीचा त्रास असो किंवा मूड स्विंग्स… अशा अनेक कारणांमुळे या दिवसात चिडचिड, त्रास वाढतो. मासिकपाळीच्या दिवसात वेदना होणं सामान्य असलं तरीही त्याला थेट गृहीत धरू नका. मासिकपाळीच्या दिवसातील कोणत्या स्वरूपातील वेदना ठीक आहेत हे जाणून घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरुंधती धर यांचा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
जर तुम्हांला सौम्य स्वरूपात क्रॅम्सचा त्रास होत असेल तर OTC painkillers च्या मदतीने तुम्ही तो नक्कीच आटोक्यात ठेवू शकता. त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. मासिकपाळी दरम्यान शरीरातील prostaglandins केमिकल्स गर्भाशयाला आकुंचित करतात. परिणामी पोटदुखीचा त्रास, अस्वस्थता आढळते.दाहशामक गोळ्यांनी prostaglandins वर नियंत्रण मिळवता येते. मात्र OTC पेनकिलर्स घेताना या ’5′ चूका कटाक्षाने टाळा !
- पेल्विक भागात वेदना आणि दाब वाढल्यासारखे वाटत असल्यास
पेल्विक भागाजवळ सतत दाब आणि वेदना जाणवत असल्यास फॅब्रॉईडचा त्रास असण्याची शक्यता असते. फॅब्रॉईडचा त्रास असणार्यांमध्ये मासिकपाळीदरम्यान 7 दिवस किंवा त्याहून अधिक काळ रक्तप्रवाह होण्याची शक्यता असते. तसेच मासिकपाळीदरम्यान रक्तप्रवाहाचे प्रमाणही अधिक असल्याने दर दोन तासांनी पॅड बदलण्याची गरज भासते. मासिकपाळीच्या दिवसात किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे? हे देखील नक्की जाणून घ्या.
- पोटाच्या खालच्या भागाजवळ, पाठीत, मांड्यांमध्ये वेदना जाणवणे
Endometriosis च्या त्रासामध्ये पोटाजवळ खालच्या बाजूला, पाठीत आणि मांड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. OTC pain killer च्या मदतीने वेदना कमी करता येऊ शकतात. पण यासोबत अधिक प्रमाणात रक्तप्रवाह होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच मासिकपाळीच्या दिवसांत हे ’6′ पदार्थ टाळाच ! म्हणजे त्रासही कमी होईल.
- पेल्विक पेन सोबतच ताप आणि मूत्रविसर्जनाच्या वेळी वेदना होणं
पेल्विक पेनसोबतच ताप किंवा मूत्राविसर्जनाच्या वेळेस जळजळ जाणवत असल्यास हे pelvic inflammatory disease (PID)चे लक्षण आहे. अनेकदा gonorrhoea किंवा chlamydia सारख्या लैंगिक आजारांकडे लक्ष,उपचार न केल्यास त्यातून वाढणारी समस्या आहे. त्यामुळे या समस्यांचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock