एखाद्या खास प्रसंगी तुम्ही मस्त तुमचा आवडता काळा ड्रेस घालता आणि अचानक तुमचे लक्ष तुमच्या खांद्यावर पडलेल्या कोंड्याकडे जाते.हा अनुभव अनेकांच्या वाटयाला येते.कोंड्यामुळे डोक्यामध्ये खाज देखील येते.जर तुम्ही देखील कोंड्याच्या समस्येने हैरान झाला असाल.मग या समस्येतून सुटका मिळवण्यासाथी शेहनाज हुसेन यांच्या या ब्युटी टिप्स नक्की आजमावून पहा.
१. केसांना गरम तेलाचा मसाज करा-
कोंडा कमी करण्यासाठी केसामध्ये गरम तेलाचा हळुवार मसाज करा . हा मसाज खूप लाभदायक ठरतो.कोमट तेलाच्या मसाजमुळे केसांमधील छिद्रे मोकळी होतात व तेलाचे योग्य पोषण झाल्याने केसांमधील त्वचा कोरडी होण्याची समस्या देखील दूर होते.यासाठी थोडे ऑलिव्ह ऑईल गरम करा आणि कापसाच्या सहाय्याने केसांच्या मुळांवर लावा.कोंडा जाण्यासाठी हाताने हळूवार केसांमध्ये मसाज करा.त्यानंतर टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घ्या व तो केसांवर गुंडाळा.टॉवेल पाच मिनीटे केसांवर ठेवा.मग पुन्हा गरम पाण्यातून पिळून काढा व डोक्याला गुंडाळा.असे कमीतकमी तीन ते चार वेळा करा.रात्रभर केसांमध्ये तेल राहू द्या.सकाळी केसांवर लिंबाचा रस लावा.अर्धा तासाने केस स्वच्छ धुवा.अशा प्रकारे आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा केसांना हॉट ऑईल मसाज थेरपी द्या व केसांचे आरोग्य वाढवा. जाणून घ्या रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने ते खरंच अधिक वाढतात का ?
२. व्हिनेगर सोल्यूशन-
केसांना शॅम्पू करण्यापुर्वी स्काल्पला दोन चमचे व्हिनेगरने मसाज करा.त्यानंतर सौम्य हर्बल शॅम्पूने केस धुवा.केसांना शॅम्पू केल्यानंतर पुन्हा दोन चमचे व्हिनेगर एक मग पाण्यात मिसळा व त्या पाण्याने केस धुवा.केसांच्या आरोग्यासाठी आठवड्यातून दोनदा स्वच्छ पाण्याने केस धुवा आणि शॅम्पूचा वापर कमी करा.
३. बेकींग सोडा-
तुम्ही बेकींग सोड्याचा मसाज देखील केसांवर करु शकता.सोडा लावल्यानंतर केस पाच मिनीटांनी स्वच्छ धुवा.या घरगुती उपायामुळे केसांच्या त्वचेवर जंतूसंसर्ग होत नाही.याचप्रमाणे मीठाचा देखील वापर तुम्ही केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी व केसांमधील त्वचेची छिद्र स्वच्छ करण्यासाठी करु शकता.मात्र त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा.
४. रोजमेरी तेल थेरपी-
५० मिली गुलाबाच्या पाण्यामध्ये पाच थेंब रोजमेरी इसेन्सशीयल ऑईल टाका.याचे व्यवस्थित मिसळलेले मिश्रण एका घट्ट हवाबंद बाटली मध्ये ठेवून द्या.प्रत्येक वेळी केसांना शॅम्पू केल्यानंतर ते कापसाच्या बोळ्याने केसांमध्ये लावा.लक्षात ठेवा इसेन्सशीयल ऑईल डायल्यूट केल्याशिवाय कधीही वापरु नका. हे नक्की वाचा केसातील कोंड्यामुळे कपाळावर येणार्या अॅक्नेंवर कशी कराल मात ?
५. मेथीच्या बीया-
एक चमचा मेथी मिक्सर मध्ये वाटून घ्या.मग हे मिश्रण दोन कप कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.सकाळी हे मिश्रण गाळून घ्या व त्या पाण्याने केस धुवा.
६. कडुलिंबाची पाने-
चार ते पाच कप पाण्यामध्ये दोन मुठभर कडूलिंबाची पाने टाका.रात्रभर पाने पाण्यात ठेवा.सकाळी त्यातील पाने बाजूला काढा व त्या पाण्याने केस धुवा.केसांमध्ये खाज येण्यापासून यामुळे चांगला आराम मिळतो.तसेच या पाण्याने केस धुतल्यामुळे केसांमधील त्वचा देखील निर्जतूंक व निरोगी राहते. याचप्रमाणे तुम्ही कडूलिंबाच्या पानांची पेस्ट देखील केसांच्या मुळांमध्ये लावून व अर्धा तासाने केस स्वच्छ धुवू शकता. जाणून घ्या सीताफळ हटवेल केसातील ‘कोंड्या’ची समस्या !
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock