Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

HIV/AIDS बाबत या ’33′प्रश्नांंबाबतचे समज-गैरसमज आजच दूर करा !

$
0
0

२०११ साली NACO राष्ट्रीय एडस् नियंत्रण संघटनेच्या केलेल्या सर्वेक्षणानूसार भारतात जवळपास २.३ लशलक्ष लोक एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते.मात्र गेल्या तीन वर्षात एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निर्दशनास आले आहे.यासाठी एचआयव्ही बाधित लोकांना चांगले उपचार मिळणे व त्यांना जीवन आनंदाने जगण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.

एचआयव्ही एडस बाबत मनात येणारे काही महत्वाचे प्रश्न-

१. एड्स म्हणजे काय?

AIDS(Acquired Immune Deficiency Syndrome) एड्स म्हणजे एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग होणे.एचआयव्ही बाधित असण्याच्या शेवटचा स्टेज मध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्याला एड्स असे म्हणतात.एड्स हा एक गंभीर आजार आहे.

२. एचआयव्हीची लागण कशी होते?

एचआयव्ही बाधीत व्यक्ती असलेल्याशी सेक्स संबधातून,तोंडावाटे,डोळ्यांवाटे अथवा त्वचेवरील जखमेतून दुस-या निरोगी व्यक्तीला हा संसर्ग होण्याची शक्यता असते.

३. एचआयव्ही जीवाणू एका व्यक्ती मधून दुस-या व्यक्तीमध्ये कसे संक्रमित होतात?

HIV म्हणजेच हयूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस याचा संसर्ग असुरक्षीत सेक्सच्या मधून,एचआयव्ही बाधीत व्यक्तीच्या रक्ताच्या संक्रमणातून,एचआयव्ही संक्रमित सुयांचा वापर त्वचेवर गोंदणे अथवा औषध उपचारांसाठी केल्यास,ओरल सेक्समुळे आणि एचआयव्ही बाधित आईमुळे तीच्या होणा-या बाळाला होऊ शकतो.

४. एचआयव्हीचे जिवाणू डास किंवा किटकांच्या दंशामुळे पसरतात का?

एचआयव्हीचे जिवाणू डास किंवा किटकांच्या दंशामुळे पसरत नाहीत कारण हे जिवाणू शरीराबाहेर जास्त काळ जीवंत राहू शकत नाहीत.रक्त शरीराबाहेर पडल्यानंतर ते सुकल्यास हे जिवाणू देखील मरण पावतात.

५. एचआयव्हीचे जिवाणू कीस केल्याने किंवा हात मिळवणे,मिठी मारणे,एकच टॉयलेट वापरल्याने,एकाच ग्लासात पाणी प्यायल्याने किंवा एचआयव्ही बाधीत व्यक्तीला सर्दी किंवा खोकला झाल्यास त्याच्या संसर्गाने पसरु शकतात का?

एचआयव्ही चे जिवाणू घाम,लाळ, मूत्र किंवा अश्रू यामध्ये जीवंत राहू शकत नाहीत त्यामुळे ते त्यातून पसरत नाहीत.एचआयव्ही एड्स हा हात मिळवणे,मिठी मारणे,अन्नपदार्थ वाटून खाल्याने किंवा सर्दी किंवा खोकल्याच्या संसर्गाने पसरतो हा केवळ गैरसमज आहे. जाणून घ्या एचआयव्ही / एड्स बाबत हे ’8′ गैरसमज आजच दूर करा

६. एचआयव्हीच्या जिवाणूंची लागण झाल्यानंतर एड्स होण्यासाठी किती वेळ लागतो?

एड्स नेमका कधी होतो हे प्रत्येक व्यक्तीनुसार निरनिराळे असू शकते.मात्र लवकर उपचार न झालेल्या व्यक्तीमध्ये ५ ते १० वर्षात एड्स ची लक्षणे दिसू लागतात.काही लोकांमध्ये हीच लक्षणे १५ वर्षांनंतर देखील दिसतात.एचआयव्ही बाधीत व्यक्तीने ART(antretroviral therapy) घेतल्यास एचआयव्ही पासून एड्स होण्याचा धोका पुढे ठकलता येतो.

७. एचआयव्हीची लागण झाली आहे हे कोणत्या लक्षणांवरुन समजते?

एचआयव्हीची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार निरनिराळी असू शकतात.सुरुवातीला अशा व्यक्तींमध्ये ताप,डोकेदुखी,घसा खवखवणे अशी लक्षणे आढळतात.ही लक्षणे रुग्णामध्ये पहिल्या आठवड्यात दिसतात.नंतर पुढे ओरल ट्रश,महिलांमध्ये व्हर्जायनल इनफेक्शन,डायरिया,त्वचेवर रॅशेस येणे,वजन कमी होणे,गुप्तांगांमध्ये फोड येणे,नाकपुड्यांमध्ये सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात.

८. एचआयव्ही आणि एड्स मध्ये नेमका काय फरक आहे?

एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग झाल्याने रोग्याची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. याला एचआयव्ही बाधीत असणे असे म्हणतात.तर एड्स ही एचआयव्ही लागण झाल्यानंतरची शेवटची स्टेज आहे.तोपर्यंत रोग्याच्या संपुर्ण शरीरामध्ये जीवाणू पसरल्याने त्यांचे एडस या भयकंर रोगात रुपांतर झालेले असते.

९. प्रत्येक गरोदर महीलेने एचआयव्हीची टेस्ट करणे गरजेचे असते काय?

तज्ञ प्रत्येक गरोदर महीलेला एचआयव्ही टेस्ट करण्याचा सल्ला देतात कारण एचआयव्ही इनफेक्शनचे लवकर निदान झाले तर ART(antretroviral therapy)च्या सहाय्याने होणा-या बाळामध्ये एचआयव्ही चे संक्रमण रोखण्याचा प्रयत्न करता येतो.

१०. एचआयव्ही टेस्ट कोठे करता येतात?

छोट्या मोठया सर्व शहरांमध्ये सरकारतर्फे अनेक एचआयव्ही टेस्ट सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत.त्याच प्रमाणे आजकाल खाजगी रुग्णालये व डायग्नॉस्टीक सेंटर्समध्ये ही एचआयव्हीची चाचणी करण्यात येते.

११. एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाला परत सामान्य जीवन जगता येणे सहज शक्य आहे का?

एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावून तुमच्या या स्थितीबाबत त्यांना अधिक माहीती घ्या.ART(antretroviral therapy) आणि काही औषधे तसेच जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल केल्यास हा आजार बळावण्याचा धोका कमी करता येतो.थोडक्यात त्वरीत निदान झाल्यास योग्य उपचार करुन रुग्ण पुन्हा सामान्य जीवन जगू शकतो.

१२. रोगाचे निदान होण्यासाठी कधीपर्यत एचआयव्ही टेस्ट करणे गरजेचे असते?

एचआयव्हीची लक्षणे आढल्यास तीन महीन्यांच्या आत एचआयव्ही टेस्ट करणे गरजेचे आहे.कधीकधी टेस्ट निगेटीव्ह येण्याची शक्यता असते अशा वेळी समाधान न झाल्यास त्यानंतर पुन्हा सहा महीन्यांनी टेस्ट करावी.

१३. विंडो पिरिएड म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली आहे तरी पण त्याचा टेस्ट निगेटिव्ह येतो तेव्हा त्या दरम्यानच्या कालावधीला विंडो पिरिएड असे म्हणतात.

१४. एचआयव्ही टेस्ट करण्यापूर्वी कोणती विशेष काळजी घेणे गरजेचे असते का?

एचआयव्ही टेस्ट करण्यापूर्वी कोणतीही विशेष काळजी घेणे गरजेचे नाही.तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी ही टेस्ट करु शकता.

१५. एचआयव्हीचे निदान करण्यासाठी आणखी कोणत्या चाचण्या केल्या जातात?

यासाठी Elisa टेस्ट,एन्टीबोडी डिफ्रन्टशीएशन व वेस्टर्न ब्लॉट टेस्ट या चाचण्या केल्या जातात.त्याचप्रमाणे HIVRNA आणि PCR या डायग्नोस्टीक टेस्ट देखील एचआयव्ही चे निदान करण्यासाठी केल्या जातात.

१६. एचआयव्ही टेस्ट मधील कोणती टेस्ट कोणी करणे गरजेचे आहे हे कसे ओळखावे?

यासाठी एचआयव्हीची लक्षणे आढळल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांकडे जा.त्याक्षणी तुमच्या रोगाच्या असलेल्या स्थितीवरुन डॉक्टर तुम्हाला योग्य ती चाचणी करण्यास सांगतील.

१७. एचआयव्हीची लागण झालेली नाही हे खात्रीपुर्वक कसे समजेल?

तुम्हाला एचआयव्हीची लागण झालेली आहे असे वाटत असेल तर त्वरीत तुमची एचआयव्ही टेस्ट करुन घ्या.एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास तुमच्या समाधानासाठी परत सहा महीन्यांनी पुन्हा एचआयव्ही टेस्ट करु घ्या.आवश्यक्ता भासल्यास या रोगाचे योग्य निदान करण्या-या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.

१८. टेस्ट केल्यानंतर त्याचा रिझल्ट किती वेळामध्ये मिळू शकतो?

आजकाल अनेक ठिकाणी एचआयव्ही टेस्ट करणारी डायग्नॉस्टीक सेंटर्स उपलब्ध आहेत.ही टेस्ट करण्यासाठी कमीतकमी २० मिनीटे लागतात.पुढील प्रक्रिया तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटीव्ह आहे यावर अवलबूंन असते.तुमच्या टेस्टचा रिझल्ट येण्यासाठी एक आठवड्याचा कालवधी लागतो.

१९. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर एड्स मुळे मृत्यू येतो का?

एचआयव्ही पॉझिटिव्ह टेस्ट मुळे प्रत्येक व्यक्ती मरण पावते असे नाही.वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार व जीवनशैलीत सकारात्मक बदल करुन जीवन जगणे सुसह्य करता येते.

२०. जर एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आली तर याचा अर्थ एचआयव्हीची लागण झाली नाही असा होतो का?

कधीकधी काही परिस्थितीमध्ये चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता असते ज्याला विंडो पिरियड असे म्हणतात.यासाठी जरी टेस्ट निगेटिव्ह आली तरी पुन्हा तीन महीन्यांनी टेस्ट करावी.

२१. एचआयव्ही बाधित रुग्णाने सृदृढ राहण्यासाठी काय करावे?

एचआयव्ही बाधित रुग्णाने जीवन चांगल्या रितीने जगण्यासाठी तुम्हाला सांगण्यात आलेले औषध उपचार न चुकता घ्यावेत.उपचारांसोबत आनंदी रहावे,योग्य व संतुलित आहार घ्यावा व डॉक्टरकडे नियमित चेकअप साठी जावे.

२२. एचआयव्ही टाळण्यासाठी काही सुरक्षित उपाय आहे का?

एचआयव्ही टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे गरजेची आहे.यासाठी असुरक्षित सेक्ससंबध टाळा.त्याचप्रमाणे औषध उपचार घेताना वापरण्यात येणा-या साधसामग्रीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्या.

२३. एचआयव्ही बाधित व्यक्ती सेक्स करु शकते का?

एचआयव्ही बाधित व्यक्ती योग्य ती काळजी घेऊन सुरक्षित सेक्स करु शकते. असुरक्षित सेक्संबधातून एचआयव्हीची लागण होत असल्याने सेक्स करताना त्यांनी कॉन्डोमचा वापर करणे गरजेचे आहे.सेक्समधील आनंद उपभोगण्यासाठी अनेकजण फोरप्ले किंवा ओरल सेक्सचा मार्ग निवडतात.मात्र असे करताना सुरक्षेची खात्री नसल्यास डेंटल डॅमचा जरुर वापर करा.

२४. जर दोन्ही पालकांना एचआयव्हीची लागण झाली असेल तर बाळाला देखील एचआयव्हीची लागण होते का?

दोन्ही पालकांना एचआयव्हीची लागण झाली असेल तर बाळाला देखील एचआयव्ही लागण होण्याची दाट शक्यता असते.मात्र आजकाल प्रगत उपचार पद्धतीमुळे योग्य वेळी अचूक निदान झाल्यास औषधउपचार व योग्य काळजी घेऊन बाळाला एचआयव्ही होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.

२५. एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती च्या होणा-या बाळाला एचआयव्ही होण्याची शक्यता आहे का?

आईला एचआयव्हीची लागण झाली असेल तर बाळाला देखील एचआयव्ही लागण होण्याची शक्यता अधिक आहे.मात्र प्रगत वैद्यकीय उपचारपद्धतीने तुमच्या बाळाला एचआयव्ही होण्याचा धोका कमी करता येतो.यासाठी नियमित हेल्थ चेकअप करा,योग्य औषधे घ्या व तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करा.

२६. एचआयव्ही पुर्णपणे बरा होऊ शकतो का?

एचआयव्ही पुर्णपणे बरा होऊ शकत नाही.मात्र योग्य औषधउपचारांमुळे त्याची अधिक लागण होणे रोखता येते.हा रोग पुर्ण बरा करण्या-या योग्य एचआयव्ही लसीकरणाबाबत सध्या संशोधन सुरु आहे.लवकरच त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळण्याची आशा उत्पन्न झाली आहे.

२७. एचआयव्ही एड्स साठी औषधउपचार व्यतिरिक्त आणखी काही उपाय आहेत का?

आत्तापर्यंत यासाठी फक्त औषधउपचार व ART(antretroviral therapy) हे दोनच उपाय उपलब्ध आहेत.त्यासोबत योग्य तज्ञांचे मार्गदर्शन आणि मानसिक उपचार यामुळेही अनेक रुग्णांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले आहेत.जर अशा रुग्णाने योगासनांचा सराव केला,योग्य ती स्वच्छता बाळगली,योग्य व पोषक आहार व स्वच्छ पाणी घेतले तर हा आजार जास्त बळावत नाही.

२८. एचआयव्ही बाधित व्यक्तीने आयुष्यभर औषधे घेणे गरजेचे आहे का?

एचआयव्ही बाधित व्यक्तीने आयुष्यभर औषध घेणे गरजेचेच आहे.मात्र तुमच्या स्थितीनूसार त्यात योग्य ते बदल केले जाऊ शकतात.हा आजार बळावू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर कृपया नियमित हेल्थ चेकअप करणे व योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

९. हाय सीडीसी आणि वायरल लोड सिग्नीफाय मुळे काय होते?

CDC(centers for desease control and prevention ) नूसार जेव्हा एखाद्या माणसाचा CD4 200 cells/mm3 पेक्षा कमी होतो ज्याचा अर्थ त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. व हाय वायरल लोड चा अर्थ तुमच्या रक्तात जिवाणूंचे संक्रमण झाले आहे असा होतो.

३०. एचआयव्ही बाधित असणारी व्यक्ती ओरल सेक्स करु शकते का?

ओरल सेक्समुळे एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता फार कमी असते.मात्र यासाठी डेंटल डॅम सारखी योग्य ती सुरक्षेची साधने वापरणे फायद्याचे ठरेल.

३१. जर सेक्स करताना वापरण्यात आलेले कॉन्डोम त्यावेळी खराब झाले तर काय करावे?

अशा परिस्थितीत तुम्ही ७२ तासांच्या आत योग्य ती उपचार पदधत घेऊन एचआयव्ही पासून स्वत:चे रक्षण करु शकता.यासाठी त्वरीत तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांना सत्यपरिस्थिती सांगा.डॉक्टरांना तुमची PEP(podst exposure prophylaxis)करण्यास सांगा.जर काही कारणांनी तुम्हाला PEP करणे शक्य झाले नाही तर मात्र तीन महीन्यांनी एचआयव्ही टेस्ट करण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही.

३२. रुग्णाला एचआयव्हीच्या शेवटच्या टप्प्यात कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते?

एचआयव्हीची लागण झाल्यामुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्याला केपोसी सारक्रोमा,कॅनडिडायसिस,टीबी,नॉन-हॉडकिन्स लिमफएडिनोमा,न्यूमोस्टाईस्टीस न्यूमोनिया,सिटोमिगलोवायरस इनफेक्शन, मानसिक आजार, टोक्सोप्लाझमोसिस अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

३३. समलैगिंक,सेक्सर् वर्कर्स,ड्रग्ज घेणारी माणसे किंवा गरीब लोकांना याचा अधिक धोका असू शकतो का?

फक्त या लोकांनाचा एड्सची लागण होण्याचा धोका असतो हा एक खुप मोठा गैरसमस आहे.खरेतर कोणीही असुरक्षित सेक्स संबध ठेवले किंवा रक्ततपासणीसाठी योग्य ती काळजी घेतली नाही त्याचप्रमाणे एचआयव्ही बाधित आईपासून तीच्या होणा-या बाळाला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता अधिक असते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>