जसजसा थंडीचा पारा खाली जाईल तसे वातावरणात झालेल्या बदलांमुळे काही आजार डोके वर काढते. वातावराणात थंडावा वाढल्यानंतर खोकला, सर्दीचा त्रास वाढतो. प्रामुख्याने लहान मुलांना सर्दी- खोकल्याचा विळखा लवकर पडतो. अशावेळी त्यांच्या आहारातील व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ अधिक वाढवावेत. यामुळे लहान मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. वाहते नाक किंवा सौम्य प्रमाणात सर्दी असल्यास लगेजच त्यांच्यावर औषधांचा मारा करू नका. सतत किंवा लहानशा आजारपणांसाठी अॅन्टी बायोटिक्स देणं त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. अशावेळी हिवाळ्यात सर्दी-खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करावेत. तसेच बाजारातील वेपोरब आणण्याऐवजी घरच्या घरी वेपोरबही बनवता येऊ शकते. यामुळे हानीकारक केमिकल्सपासून मुलांचा बचाव होतो. तसेच घरगुती उपाय अधिक सुरक्षित असतात. नक्की वाचा: तुळस – सर्दी, तापावर प्रभावी घरगुती उपाय
कसा बनवाल घरच्या घरी वेपोरब ?
घरी वोपोरब बनवण्यासाठी तुम्हांला केवळ 3 घटकांची गरज असते.
- तूप – अर्धा कप
- 8-10 पाकळ्या सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
- निलगिरी तेल किंवा टी ट्री ऑईल काही थेंब
वेपोरब बनवण्याची कृती -
- गॅसच्या मोठ्या आचेवर तूप गरम करून त्यावर लसाणाच्या पाकळ्या टाकाव्यात.
- लसूण काळा होऊ द्यावा.
- एखाद्या डब्ब्यात वितळलेले नीट गाळून ओतावे. मात्र त्यामध्ये लसूण पडणार नाही याची काळजी घ्या.
- हे तूप थोडा वेळ थंड होऊ द्यावे.
- तूप साधारण रूम टेम्परेचरला आल्यानंतर त्यामध्ये निलगिरी किंवा टी ट्रि ऑईलचे काही थंब मिसळा.
- डब्बा बंद करून सूर्यकिरणापासून लांब ठेवा.
तूप पुन्हा गोठल्यानंतर त्याचे स्वरूप बामसारखे होईल. त्यामुळे ते त्वचेवर लावणे सोपे होते. या घरगुती बाममुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. लसणामधील allicin घटक अॅन्टी बॅक्टेरियल असल्याने सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात. निलगिरी किंवा टी ट्री ऑईल हे सर्दीमुळे चोंदलेले नाक, घसा, छाती मोकळी करण्यास मदत करते. या घरगुती आणि सहज सोप्या उपायांनी लहान मुलांच्या सौम्य सर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. तसेच जाणून घ्या लहान मुलांच्या डोकेदुखीला कसे हाताळाल ? आणि वाफ घेऊन नाक मोकळे करण्यास मदत करतील हे ’5′ मसाल्याचे पदार्थ !
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock