आज बाजारात गर्भनिरोधकाची अनेक साधने सहज उपलब्ध आहेत.पण बेसावधपणे त्यांचा वापर करणे नक्कीच धोक्याचे ठरु शकते.यासाठी प्रत्येकाच्या वय व प्रकृतीनुसार निरनिराळ्या साधनांचा वापर करणे गरजेचे असते.चुकीच्या साधनांच्या वापरामुळे तुमच्या प्रजननक्षमतेवर व आरोग्यावर विपरित परिणाम होतो.यासाठी या साधनांचा वापर करण्यापुर्वी ती तुमच्यासाठी योग्य आहेत का हे जरुर तपासा. याबाबतीत मुंबईतील Consultant Gynaecologist डॉ संगीता अग्रवाल यांचा हा सल्ला जरुर लक्षात ठेवा.
१. गर्भनिरोधक गोळ्या-
अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी हा एक सुरक्षित उपाय आहे. गर्भनिरोधक गोळ्या प्रोजेस्टेरॉन व इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन किंवा कॉम्बिनेशन पील्स या दोन प्रकारात उपलब्ध असतात.या दोन्ही प्रकारच्या गोळ्यांचा गर्भनिरोधनासाठी उपयोग होतो कारण त्यामुळे स्पर्म अंडाशयापर्यंत पोहचू शकत नाहीत.गर्भऩिरोधक गोळ्या आणि इमरजन्सी पील्सचा वापर टीनएज पासून पन्नाशी पर्यंतच्या महिलांना करता येतो.या गोळ्यांचा वापर टीनएज आणि तरुण मुली सुरक्षित सेक्सलाईफ अनुभवण्यासाठी अधिक प्रमाणात करतात.मात्र या गोळ्या मुलींनी त्यांची मासिक पाळी सुरु झाल्यानंतरच घ्यावात.जर तुम्हाला गर्भनिरोधनाचा हा मार्ग योग्य वाटत असेल तर कृपया याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.हा उपाय तरुण मुलींसाठी सुरक्षित असला तरी ३० वर्षांच्या पुढील कार्डिओ वैस्क्युलर विकार असणा-या किंवा धुम्रपान करणा-या महिलांसाठी त्रासदायक ठरु शकतो.त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या सुरु करण्यापुर्वी याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. जाणून घ्या गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
२. गर्भनिरोधक साधने-
गर्भधारणा टाळण्यासाठी भारतात कॉपर-टी या गर्भनिरोधक साधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो.असे असले तरी तरुण मुलींना व आई होण्यापुर्वी महिलांना डॉक्टर याचा वापर करण्याचा सल्ला देत नाहीत.कॉपर-टी योनीमार्गातून आत गर्भाशयावर बसवण्यात येते.कधीकधी यामुळे जखम होण्याची व रक्त येण्याची शक्यता असते.तज्ञाच्या मते चुकीच्या पद्धतीने लावण्यात येणा-या कॉपर-टी मुळे स्त्रीला कायमस्वरुपी वंधत्व येणा-या धोका असतो.त्यामुळे बाळ झाल्यानंतरच तुम्ही कॉपर-टी बसवण्याचा निर्णय घ्या.तज्ञांकडून कॉपर-टी बसवल्याने ती निकामी होण्याचे व इतर संभाव्य धोके टळू शकतात.अधिक सुरक्षेसाठी जर तुम्ही आई असाल व तुमचे वय २१ पेक्षा जास्त असेल तरच कॉपर-टी बसवण्याचा निर्णय घ्या.
३. वजानल रींग-Vaginal ring
प्रौढ महीलांपेक्षा तरुण मुलींसाठी वजानल रींग हा पर्याय अधिक सुरक्षित आहे.सुरक्षीत सेक्ससाठी गर्भनिरोधक गोळी घेण्याऐवजी तुम्ही वजानल रींगचा २१ दिवस वापर करु शकता.मात्र ज्यांना उच्च रक्तदाब,मधूमेह,मायग्रेन किंवा ज्यांचे वजन जास्त आहे अशा ३५ वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या महिलांना हा सल्ला दिला जात नाही.अशा महीलांना जर त्यांच्या डॉक्टरांनी वजानल रींग वापरण्याचा सल्ला दिला तरच त्याचा वापर करु शकतात.
प्रेग्नसीनंतर देखील वजानल रींग वापरण्यात येते.तसेच डिलीव्हरी नंतर २१ दिवस ही रींग वापरुन तुम्ही अनावश्यक गर्भधारणा टाळू शकता.मात्र असे असले तरी भारतात वजानल रींग सहज उपलब्ध नाही.
४. गर्भनिरोधक इंनजेक्शन-
बाळाच्या जन्मानंतर DMPA हे गर्भनिरोधक इंनजेक्शन आईला दिले जाते.मात्र याचा प्रभाव फक्त तीन महीनेच राहतो.त्यामुळे तीन महीन्यानंतर सुरक्षेसाठी पुन्हा ते घ्यावे लागते.२१ वर्षांपुढील मुलींसाठी हे इनजेक्शन सुरक्षित असते.असे असले तरी गर्भनिरोधक इंनजेक्शन भारतात सहज उपलब्ध नाही.या इंजेक्शनमुळे अनियमित मासीक पाळी,मासिक पाळीमध्ये स्पॉटींगचा त्रास होणे किंवा मासिक पाळीत रक्तस्त्राव प्रमाणापेक्षा अधिक होण्याची शक्यता असते. जाणून घ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय
५. कॉन्डोम-
महीलांमध्ये कॉन्डोमचा वापर कमी प्रमाणात करण्यात येतो.कारण या कॉन्डोमचा वापर करणे सुलभ व सोपे नसते.यामुळे महीलांना कॉन्डोम वापरण्यापेक्षा त्यांच्या जोडीदाराने सुरक्षेसाठी कॉन्डोम वापरणे श्रेयस्कर वाटते.मात्र जर तुम्हाला याचा वापर करणे शक्य असेल वयाच्या टीनएज पासून पन्नाशी पर्यंत तुम्ही त्याचा वापर करु शकता.हा पर्याय तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायद्याचा ठरु शकतो. हे नक्की वाचा असुरक्षित सेक्सनंतर घ्या हे ’3′ खबरदारीचे उपाय !
६. टयूबल लायगेशन-
चाळीस वर्षांपेक्षा मोठया व मेनोपॉजच्या आधी महीलांना या गर्भनिरोधकाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.या प्रक्रियेमध्ये महीलांच्या फेलोपियन टयुब्सनां बांधले जाते ज्यामुळे स्त्रीबीज गर्भाशयापर्यंत पोहचण्यास विरोध होतो.हा पर्याय अनावश्यक गर्भधारणा टाळून सेक्स लाईफचा आनंद घेऊ इच्छिणा-या प्रौढ महीलांसाठी फायद्याचा आहे.
विशेष सूचना-कृपया अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही यापैकी कोणताही मार्ग निवडू शकता.पण त्यापुर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हितकारक आहे.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock